मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १४ वा| श्लोक १७ ते १८ अध्याय १४ वा आरंभ श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ ते ९ श्लोक १० ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २२ श्लोक २३ श्लोक २४ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ३७ श्लोक ३८ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ६१ अध्याय १४ वा - श्लोक १७ ते १८ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १७ ते १८ Translation - भाषांतर यस्य कुक्षाविदं सर्वं सात्मं भाति यथातथा । तत्त्वय्यपीह तत्सर्वं किमिदं मायया विना ॥१७॥जैं तुझिया मुखांतून । तुझिये कुक्षीमाजि जाण । दिसे ब्रह्मांड संपूर्ण । यथार्थपण न मोडतां ॥५१॥तैसेंचि बाहीर संचलें असे । परस्परें विपरीत न दिसे । तैं बिंबलें हें कैसें । साच मानसें भावावें ॥५२॥सात्म म्हणिजे तुजही सहित । विश्व दिसतसे वदना आंत । मायेवांचूनि हें अघटित । कैसें यथार्थ मानावें ॥५३॥तुजमाजि विश्व बिंबलें असतें । तरी तें अवघें विपरीत दिसतें । त्यामाजि तुजही न देखिजतें । हें अघडतें मायुक ॥५४॥गंगेमाजि बिंबे रवि । तेथ गंगा न बिंबे जेंवि । तूंचि तुजमाजी सावयवीं । तैं माया केंवि न म्हणावी ॥३५५॥यशोदेसीच दाविली माया । काय म्हणों जी विश्वनिलया । प्रत्यक्ष लोचना माझिया । आजि या समया माजिवडें ॥५६॥कौतुक दाऊनि विचित्रपरी । यशोदेहूनि निपटा परी । माझी प्रज्ञा केली हरि । तैं वैखरी वदतसे ॥५७॥अद्यैव त्वदृतेऽस्य किं मम न ते मायात्वमादर्शितमेकोऽसि प्रथमं ततो व्रजसुहृद्वत्साः समस्ता अपि । तावंतोऽसि चतुर्भुजास्तदखिलैः साकं मयोपासितास्तावंत्येव जगंत्यभूस्तदमितं ब्रह्माद्वयं शिष्यते ॥१८॥ब्रह्मा म्हणे जी पुरुषोत्तमा । तुज वेगळी कोणें आम्हां । घालूनि अविद्येचिया भ्रमा । दाविली गरिमा मायेची ॥५८॥या विश्वाचें मायिकपण । आतांचि दाविलें मजलागून । कीं नव्हे तें तव विंदान । असाधारण गोविंदा ॥५९॥म्यां अज्ञानें करूनि कपट । वत्सें हरिलीं वत्सपांसहित । तेव्हां काननें दुर्घट । एकला एकट हुडकिसी ॥३६०॥पुढती गोवत्सपगण । सालंकृत परिवारून । केलें व्रजपुरीं क्रीडन । मत्त्रुटिमान पर्यंत ॥६१॥पाहों जातां निश्चयेंसी । भ्रांत झालों निजमानसीं । सत मिथ्या कोणती कैसी । विवेकासी अनुमज ॥६२॥वत्सें वत्सप पदाभिमानें । म्यां लपविलीं मायागुणें । एथें केव्हां आणिलीं कोणें । ये विचारणे लागलों ॥६३॥तया भ्रमाच्या निरसना । करावया तूं जगज्जीवना । चतुर्भुजा पीतवसना । अवघ्या जणां प्रकटिलें ॥६४॥सृष्टिकर्ता मी एक विधि । ऐशी होती अहंबुद्धि । देखोनि तव माया निरवधि । नलगे शुद्धि मजमाजीं ॥३६५॥शंखचक्रगदापाणी । सालंकृत सर्वाभरणीं । श्रीवत्सांक कौस्तुभमणि । जैसे तरणि प्रकटले ॥६६॥विष्णु केवळ माझा जनक । हा मी ब्रह्मा याचा तोक । ऐसें देखोनि अनेक । बुद्धिविवेक हारपला ॥६७॥अनंत विष्णूचिया मूर्ति । तितुक्या ब्रह्मांडांचिया पंक्ति । तिहीं सहित माझ्या व्यक्ति । तितुक्या पृथक उपासिती ॥६८॥ऐसें देखोनि निर्बुजलों । पूर्वस्मृति अंतरलों । लिखितचित्रापरी ठेलों । पाहों विसरलों परावर ॥६९॥जेंवि उदुंबरफळींचे जंतु । ध्रुवमंडळीं होती प्राप्त । ते निर्बुजती गगना आंत । तेवीं अद्भुत मज झालें ॥३७०॥महासिद्धीच्या अनेक पंक्ति । महाभूतांचे समूह किती । काळस्वभावादि आकृति । वोळंगती पृथक्त्वें ॥७१॥मी केवळ रजोगुण । एथ अनंत त्रिगुणगण । माझी केतुली आंगवण । गुण परिपूर्ण पहावया ॥७२॥निर्गुण एकचि निर्विकार । एथ अनंत सद्गुणप्रचुर । पाहतां नलगे पारावार । अचिंत्य अगोचर अलक्ष्य ॥७३॥एवढी जेथ अचिंत्यशक्ति । तेचि तुझी हे वत्सप व्यक्ति । जैसी तूर्येमाजीं जागृति । प्रकटूनि मागुती सामावे ॥७४॥नीवारशूकाग्राहूनि तन्वी । पीतप्रभा जे अणूहूनि अण्वी । अपार सृष्टी दावूनि लपवी । जेवीं लाघवी तुरीया ॥३७५॥ब्रह्मांड भरूनि प्रकाश । दावूनि लपवी जेवीं दिनेश । कीं समष्टीचा स्वप्नाभास । लपे निःशेष चिन्मात्रीं ॥७६॥बीजीं सामावला वट । कुंडीं गुप्त हव्यवाट । कीं संहारबीजामाजि प्रकट । महानृसिंह सांठवे ॥७७॥तैशा अनंत ब्रह्मांडकोटी । प्रकटूनि पुढती ठेविल्या पोटीं । ते हे कृष्णाकृति धाकुटी । पाहतां दृष्टि वेधल्या ॥७८॥अनंतब्रह्मांडांचें बीज । तें तूं ब्रह्म अधोक्षज । ऐशी प्रतीति झाली मज । मायाचोज उमजोनी ॥७९॥एथ तूं म्हणती अरे विधि । शुद्ध चैतन्य जें निरवधि । तें म्यां दाविलें निरुपाधि । तूं कां उपाधि मानिसीं ॥३८०॥अमृतोदधीतें मृगजळ । मानूनि करितोसि निष्फळ । माझें चिद्रूप केवळ । प्रपंच टवाळ मानिसी ॥८१॥माझें ऐश्वर्य परम अमळ । प्रपंच अविद्यात्मक समळ । ध्वांत आणि रविमंडळ । तुळिती केवळ ज्ञानांध ॥८२॥तरी हें सत्य कैवल्यधामा । मी वरपडलों अविद्याभ्रमा । म्हणोनि तुझी हे वास्तव गरिमा । नुमजे अधमा मोहांधा ॥८३॥तूं अद्वितीय निष्प्रपंच । तेथ अनेकत्व कैंचें साच । धरूनि अवतार नीच उंच । लीला अवाच्य प्रकटिसी ॥८४॥पूर्वजन्माचे संस्कारीं । प्राणी जन्मती संसारीं । तूं निष्क्रिय निर्विकारी । लीलावतारी स्वइच्छ ॥३८५॥हें दो श्लोकीं निरूपण । पश्चात्तापें करी द्रुहिण तेथ सावध कुरुभूषण । करी श्रवण शुकमुखें ॥८६॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP