मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १४ वा| श्लोक ३६ ते ३७ अध्याय १४ वा आरंभ श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ ते ९ श्लोक १० ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २२ श्लोक २३ श्लोक २४ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ३७ श्लोक ३८ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ६१ अध्याय १४ वा - श्लोक ३६ ते ३७ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ३७ Translation - भाषांतर तावद्रागादयः स्तेनास्तावत्कारागृहं गृहम् । तावन्मोहोंऽघ्रिनिगडो यावत्कृष्ण न ते जनाः ॥३६॥सदृढ ब्रह्मचर्यादि नेम । यथोक्त करूनि गृहस्थाश्रम । वानप्रस्थादि सक्लेश कर्म । जे निष्काम आचरले ॥८॥रागद्वेषादि तस्कर । घातक षड्वैर्यांचा मार । त्यांचा करोनिया संहार । झाले निष्ठुर निर्मम जे ॥९॥पायीं श्रृंखला ममता मोह । गृहरूपें जें कारागृह । तेथ विचंबतां सस्नेह । बळें निस्नेह जे झाले ॥८१०॥तोडूनि मोहाचें पदबंधन । फोडूनि ममताबंदिसदन । सर्वसंन्यासें भरलें रान । जिंकूनि मन मुनिवर्य ॥११॥पावावया मत्सन्निधि । सबाह्य खंडली सर्वोपाधि । त्यांसि जे मत्प्राप्तिसिद्धि । मी निरवधि ओपितसें ॥१२॥व्रजौकसांची अनृणावाप्ति । ते म्यां ओपितां आत्मप्राप्ति । तूं कां मानिशी अपर्याप्ति । ऐसें श्रीपती जरी म्हणसी ॥१३॥तरी ऐकें गा वत्सपवेषा । त्यासीच रागादि देती क्लेशा । जे ग भजती तुज परेशा । भेददुराशा सांडोनी ॥१४॥तोंवरीच ते रागादि दोष । तस्कररूपें देती क्लेश । जंववरी तव भक्तीचा लेश । न करी प्रकाश हृत्कमळीं ॥८१५॥तंववरीच देहगेह । गोंवी होऊनि कारागृह । तंवचि अंघ्रिनिगड मोह । जंव न जडे स्नेह तव भजनीं ॥१६॥अभेदभजनें निजांतर । भरतां गृहचि हरिमंदिर । राग होय प्रेमादर । मोह तो अंकुर करुणाएचा ॥१७॥भक्तियोगें जो सुखलेश । तेथ जाऊनि बैसे द्वेष । भेद देखोनि उपजे त्रास । तैं नाशी रोष त्या द्वैता ॥१८॥सर्वात्मकत्वें लोभावेश । ओपी पूर्णत्वाचा तोष । निर्मद अमत्सरांचे पोष्य । मदमत्सर म्हणविती ॥१९॥कृष्णा तावकी जनता नाहीं । तोंवरीच हे बाधक पाहीं । तंव जनाचे लागती पायीं । करिती सर्वही परिचर्या ॥८२०॥ज्याच्या भयें कर्मसंन्यास । करूनि सोशिती वनवास । भयदा भजनें त्या केलें दास । हा विशेष भजनाचा ॥२१॥नाकीं कानीं कां नेत्रबुबुळीं । गुह्योपस्थीं जिव्हामूळीं । लक्ष ठेवूनि योगी बळी । जिंकिती फळी शत्रूंची ॥२२॥म्हणोनि तें खंडज्ञानें । दृश्यद्वेषाच्या अभिमानें । विगतरागही भरती रानें । संगाभेणें जनांच्या ॥२३॥भक्त अन्वयबोधशाली । सबाह्य लक्षूनि श्रीवनमाळी । भेदभ्रमाची करूनि होळी । सुखसुकाळीं क्रीडती ॥२४॥म्हणोनि ऐशिया व्रजौकसांसी । मज नेणवे काय देसी । किंवा त्यांच्या आनृण्यासी । स्वयें अवतरसी जरि म्हणों ॥८२५॥यांसि द्यावया योग्य नाहीं । यास्तव पुत्रादिरूपें पाहीं । मी अवतरोनि त्यांचे गेहीं । होईल कांहीं उत्तीर्ण ॥२६॥प्रपंच निष्प्रपंचोऽपि विडंबयसि भूतले । प्रपन्नजनतानंदसंदोहं प्रथितुं प्रभो ॥३७॥निष्प्रपंच जो तूं शुद्ध । सप्रपंचही नटसी मुग्ध । भक्तच्छंदें क्रीडा विविध । करिसी आनंद ओपावया ॥२७॥भूमंडळीं मर्त्यलोकीं । सम दाविसी सामान्य तोकीं । अथवा विडंबासारिखी । क्रीडा नाटकी प्रकटिसी ॥२८॥त्यासि इतुकेंचि कारण । प्रपन्न म्हणिजे निजांघ्रिशरण । जनता ते त्याची मंडळी पूर्ण । ते सुखसंपन्न करावया ॥२९॥अनेक आनंदाचा राशि । आनंदसंदोह म्हणिजे त्यासी । तो प्रकटावया प्रपन्नापाशीं । स्वयें क्रीडसी विडंबें ॥८३०॥प्रभो या संबोधनाचा अर्थ । अनंतमायावी समर्थ । स्वभक्तऋणाच्या परिहारार्थ । करिसी अनंत नटलीला ॥३१॥हें तों तुझें अमोघ देणें । परी माझिया चित्तालागीं न मनें । किमर्थ म्हणतां नारायणें । माझें बोलणें ऐकावें ॥३२॥अनन्यभावें अवंचक । जे कां भक्त निष्कामुक । त्यांचा कपटें जाल्या तोक । उत्तीर्ण विवेक केंवि घडे ॥३३॥एथ कपट म्हणसी काय । तरी देवकीसी म्हणोनि माय । तीसि बांधोनि पुत्रस्नेहें । जासी लवलाहें गोकुळा ॥३४॥एथ यशोदानंदासी । पुत्रस्नेहें बांधलेंसी । सांडूनि मथुरे जेव्हां जासी । दुःखराशी तैं यांतें ॥८३५॥यांतें रक्षीन संकटीं । म्हणसी तरी ते न घडे गोठी । संकटें तुझेचि लागलीं पाठी । हीं उफराटीं तुज रडती ॥३६॥लालनमिषें तव सेवन । तेणें आधींचि वाढे ऋण । कैसा होशील उत्तीर्ण । मजलागून हें न कळे ॥३७॥व्रजौकसांचा सातां श्लोकीं । महिमा बोलिला चतुर्मुखीं । तो उपसंहारूनि आपुलेविखीं । पुढें ती श्लोकी प्रार्थितसे ॥३८॥म्हणे तूं स्वामी श्रीभगवान । तुझे अचिंत्य अनंत गुण । काय देशी त्यां म्हणोन । मजलागून उमजेना ॥३९॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP