मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १४ वा| श्लोक २६ ते २७ अध्याय १४ वा आरंभ श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ ते ९ श्लोक १० ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २२ श्लोक २३ श्लोक २४ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ३७ श्लोक ३८ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ६१ अध्याय १४ वा - श्लोक २६ ते २७ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते २७ Translation - भाषांतर अज्ञानसंज्ञौ भवबंधमोक्षौ द्वौ नाम नान्यौ स्त ऋतज्ञभावात् ।अजस्रचित्यात्मनि केवले परे विचार्यमाणे तरणाविवाहनी ॥२६॥ज्ञानी तरले भवाब्धि । हें करणेंचि नलगे प्रसिद्धि । अपूर्व ऐकिली पैं शाब्दीं । तरल्या परी तरले हे ॥२१॥तरी भवें करूनि बंध मोक्ष । नामें ख्यात जे प्रत्यक्ष । तें विवरितां होऊनि साक्ष । पृथक दक्षा नेक्षिती ॥२२॥सत्य ज्ञान स्वरूपाहूनी । भिन्न विवरितां नसती दोन्ही । जैसे दिवस आणि रजनी । नेणे तरणि वस्तुतः ॥२३॥येथ आशंका कराल ऐशी । तरी कां मूढत्व आत्मयासी । सत्य सन्मात्र स्वप्रकाशीं । चोरी कैशी एवढी ॥२४॥ह्या आशंकेचें उत्तर । केवळ पारमार्थिक विचार । यास्तव रहस्य करणें सार । सहसा दुष्कर न मनावें ॥५२५॥अर्थ ऐसें धनासि नांव । विषयावाप्ति सुखसंभव । तेणें साधे म्हणोनि जीव । आसक्त सर्व धनासी ॥२६॥विषयसुख तें नाशवंत । क्षणामाजीं पावे अंत । याचें साधनरूप जो अर्थ । तैं तो अनर्थ दुःखद ॥२७॥म्हणोनि अक्षय सुखाची राशि । फावोनि निःशेष दुःखा निरसी । त्यासीच आख्या परमार्थ ऐसी । लागलें श्रुतीसी ठेवणें ॥२८॥विषयसुखद जो कां अर्थ । लोकीं चोरूनि ठेविती गुप्त । वास्तव केवळ हा परमार्थ । कां पां स्वरत न झांकिती ॥२९॥मोठा अपलाप कां कीजे । तें निरूपिलें ऐशिये वोजे । विषयनिष्ठासि कोठूनि उमजे । देहात्म वाजे निद्रिस्तीं ॥५३०॥एरव्हीं जें कां अजस्र चित्तीं । जें अखंडानुभव स्वरूप म्हणती । तये शुद्धपरब्रह्मीं नसती । बंध निर्मुक्ति दोन्हीही ॥३१॥शुद्धसन्मात्र स्वप्रकाश । तेथ अज्ञाना कैंचा वास । अज्ञान नातां भवबंधास । ठाव निःशेष असेना ॥३२॥जेथ मिथ्या बंध अज्ञान । तेथ कैंचा मोक्ष कैंचें ज्ञान । अभाग्य सभाग्य उभयावीण । सुखसंपन्न श्री जैशी ॥३३॥ऐसे जे कां स्वात्मतृप्त । सत्यज्ञानात्मक जे नित्य । ते तरलेचि संतत । तरल्यापरी तरताती ॥३४॥मृगें मृगजळें भ्रांत होती । मानव जळाची परी जाणती । तेणें म्रांत ते न होती । रश्मि म्हणती जळ मृषा ॥५३५॥एवं बंध मोक्ष ज्ञानाज्ञान । स्वरूपीं नाहींच निपटून । येणें निश्चयें जे अभिज्ञ । ते तरलेचि जाण तरल्यापरी ॥३६॥ऐशी ज्ञाननिष्ठांची कथा । तरी बंधमोक्ष कवणा माथां । म्हणसी तरी तें ऐक आतां । म्हणे विधाता कृष्णातें ॥३७॥त्वामात्मानं परं मत्वा परमात्मानमेय च । आत्मा पुनर्बहिर्मृग्य अहोऽज्ञजनताऽज्ञता ॥२७॥ब्रह्मा अक्रोधें करी विस्मय । अहो केवढें हें आश्चर्य । आपणा आपुली नेणोनि सोय । नाना ठाय हुडकिती ॥३८॥अन्यथाज्ञानें अध्यारोप । त्या अपवादें करूनि लोप । वास्तव उमजतां स्वस्वरूप । आपेंआप संप्राप्त ॥३९॥परमार्थज्ञानें आत्मप्राप्ति । वृथा अध्यारोपें निवृत्ति । आग्रह करणें अपवादार्थीं । किमर्थ ऐसें म्हणाल ॥५४०॥तरी भ्रमें रत्नहाराचा लोप । करूनि प्रकटिला सर्पारोप । त्याचा अपवाद न होतां रूप । वास्तव कदापि न प्रकटे ॥४१॥तेंवि आत्मयाच्या ठायीं । अध्यस्त अन्यस्फूर्ति पाहीं । उठोनि चैतन्या करी देही । भवप्रवाहीं मग पडे ॥४२॥अपवाद त्या जीवत्वाचा । न करितां आत्मा सत्य कैंचा । भव विवर्त कळल्या साचा । आत्मत्वाचा सुखलाभ ॥४३॥ऐसें निकरेंशीं विधि म्हणे । तुज परमात्मयातें परावेपणें । देहाबाहेरी वेगळें जाणें । आपण होऊनि देहमात्र ॥४४॥ऐशी मूर्खाची मूर्खता । तेचि विवळ परिसा आतां । स्वप्रकाश आत्मा स्वयें असतां । देहात्मता अध्यासी ॥५४५॥अविद्येच्या भ्रमेंकरूनी । दारापुत्रादि स्वयें मानी । क्षेत्रवित्तादिअभिमानी । होऊनि ग्लानि पावतसे ॥४६॥तये ग्लानीच्या निवृत्ति । इच्छी नाथिल्या संपत्ति । परमात्मयाची सकाम भक्ति । विषयप्राप्तीलागिं करी ॥४७॥नानापरीचे करी नियम । देवतांतरीं धरी प्रेम । परमात्मा जो पुरुषोत्तम । म्हणे कर्मफलदाता ॥४८॥भावी परमात्मा सदेह । देहधर्मादिप्रवाह । त्यासि लावी कवळूनि मोह । करी रोह भजनाचा ॥४९॥हस्तपादादि अवयव । साङ्ग संपन्न भावी देव । स्नातास्नात इत्यादि सर्व । देहभाव त्या लावी ॥५५०॥देव भुकेला तान्हेला । देव लेइला नेसला । देव कोपला संतोषला । हा गलबला वाढवी ॥५१॥देव स्वर्गीं सत्यभुवनीं । कैलासीं कां विष्णुसदनीं । देव आहे शेषशयनीं । नानास्थानीं भावितसे ॥५२॥देव विष्णु कीं शंकर । देव शक्ति कीं भास्कर । देव इंद्र वैश्वानर । कीं साचार गणपति ॥५३॥कोण देव कामना पुरवी । कोण दुःखा पराभवी । कोण तारी भवार्णवीं । निष्ठा जीवीं बहुविध ॥५४॥आत्मा सच्चिदानंदकंद । स्वयें विसरोनि कवळी भेद । दाही दिशा करी शोध । तेंचि विशद परियेसा ॥५५५॥शाश्वत मानी देहगेह । पुत्रदारास्वजनसमूह । त्याचे ठायीं धरूनि स्नेह । महामोह वाढवी ॥५६॥भोंवतीं मिळती रांडापोरें । म्हणती धैर्य न टाकिजे नरें । उद्यां देव करील बरें । नाना प्रकारें बुझविती ॥५७॥शास्त्रज्ञानाचा प्रकाश । विषयलोभें मानी तोष । सच्चिदानंद मानूनि यास । करी दोष स्वैरत्वें ॥५८॥तंव हें नाशवंत दृश्य । क्षणक्षणा पवे नाश । तेणें होय कासावीस । शोक विशेष वाढवी ॥५९॥पुन्हां तैसाचि हव्यास धरी । भरे कामाच्या दुर्भरीं । ऐसा जाचे सहस्रवरी । परी अंतरीं न त्रासे ॥५६०॥मग म्हणे हा मृत्युलोक । नाशवंत दुःखदायक । स्वर्गीं अक्षय चित्सुख । सुकृतें याज्ञिक भोगिती ॥६१॥ऐशीं लोकलोकांतरें । अक्षय चित्सुख मानूनि फिरे । तंव तें न लभोनि भेदभरें । उपजे मरे पुनः पुन्हा ॥६२॥सच्चित्सुख मी स्वयेंचि आत्मा । हें नुमजोनि पावे भ्रमा । बाहेरी अक्षय चित्सुखाचा प्रेमा । भेदें अधमा कैम जोडे ॥६३॥नाभिदेशीं कस्तूरिका । नेणोनि कुरंग भ्रमे देखा । आत्मप्रतिबिंबें बालका । जेंवि उदकामाजीं पतन ॥६४॥कीं स्वकंठींचा विसरोनि मणि । दिगंतीं प्रवर्ते गवेषणीं । गृहीं हरवूनि धुंडे रानीं । ते हे करणी मूर्खाची ॥५६५॥आपणाहूनि आत्मा पृथक । तो हा कथिला मूर्खविवेक । आतां प्रत्येक प्रणव होऊनि एक । करिती विवेक तो ऐका ॥६६॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP