मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १४ वा| श्लोक ४६ ते ५० अध्याय १४ वा आरंभ श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ ते ९ श्लोक १० ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २२ श्लोक २३ श्लोक २४ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ३७ श्लोक ३८ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ६१ अध्याय १४ वा - श्लोक ४६ ते ५० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४६ ते ५० Translation - भाषांतर ततो हसन्हृषीकेशोऽभ्यवहृत्य सहार्भकैः । दर्शयंश्चर्माजगरं न्यवर्तेत वनाद् व्रजम् ॥४६॥मग श्रीकृष्णें हास्यवदन । करूनि न प्रकटी विंदान । सारूनि गडियांसी भोजन । व्रजाभिगमन आदरिलें ॥८८॥अघासुराचें जीर्णचर्म । वत्सपां दावूनि मेघश्याम । व्रजप्रवेशाचा संभ्रम । मुनिसत्तम कथितसे ॥८९॥बर्हप्रसूननवधातुविचित्रितांगः प्रोद्दामवेणुदलशृंगरवत्सवाढ्यः । वत्सान् गूणन्ननुगगीतपवित्रकीर्तिर्गोपीदृगुत्सवदृशिः प्रविवेश गोष्ठम् ॥४७॥मयूरबर्हांचा माथां स्तबक । प्रसूनें तुरुंबिलीं पृथगनेक । विविधधातूंचें रेखिले अंक । शोभाविषेष विचित्र ॥८९०॥सदळ जाळी पृष्ठभागीं । गगन गर्जे वेणुशृंगीं । नादोत्सवाढ्य श्रीशाङ्गीं । नानारंगीं शोभला ॥९१॥वत्सें मधुरोक्ति हांकित । स्वकरें पृष्ठि कुरवाळित । परमोत्साहें संबोधित । अनुग्रह करित होत्साता ॥९२॥विष्णूभोंवते महर्षि । कीं गंधर्व इंद्रापाशीं । तैसे संवगडे श्रीकृष्णाशीं । गाती कीर्ति उत्साहें ॥९३॥छाया जैशी रूपामागें । तैसे अनुग कृष्णासंगें । पवित्र कीर्ति तत्प्रसंगें । गाऊनि सर्वांगें निवताती ॥९४॥नित्य नूतन कृष्णक्रीडे । पाहती अनुयायी संवगडे । ते ते कृष्णाचे पवाडे । कृष्णापुढें वर्णिती ॥८९५॥जे कीर्तीच्या श्रवणमात्रें । पुन्हा मुकिजे संसारयात्रे । तीं तीं कृष्णाचीं चरित्रें । परम पवित्रें वर्णिती ॥९६॥पूतना केवळ राक्षसी । विश्वासघातिनी कल्मषराशि । तेही गेली सायुज्यासी । ऋषीकेशसंस्पर्शें ॥९७॥पादस्पर्शें शकटा मुक्ति । पतनें तृणावर्ता शांति । यमलार्जुनाची ऊर्ध्वगति । गडी वर्णिती आनंदें ॥९८॥ऐसा अनेकपवित्रकीर्ति । अनुगीं गाइला श्रीपति । तो प्रवेशतां व्रजाप्रति । पुढें धांवती गोपिका ॥९९॥ऐकोनि वेणुविषाणगजर । तर्णकांचे हुंकारमिश्र । श्रवणीं पडतां अतिसत्वर । प्रेमें अंतर उचंबळे ॥९००॥सुरभिगंधें चंचरीक । कुसुमकानना सन्मुख । धांवती तैशा प्रेमोत्सुक । गोपी हरिमुख पाहती ॥१॥एक व्रजाबाहिर जाती । एकी दारवठां उभ्या ठाती । एकी प्रांगणीं अपांगप्रांतीं । कृष्ण प्राशिती निजनेत्रीं ॥२॥गोपीनेत्रांसि उत्साहकर । ज्याचें दर्शन मनोहर । व्रजीं ऐसा तो नंदकुमार । सवत्स सानुचर प्रवेशला ॥३॥इतुकें कथनाचें कारण । राया ऐकें सावधान । वत्सप वत्सें झाला कृष्ण । तो आजि भिन्न निवडला ॥४॥वत्सप वत्स होतां कृष्ण । तैं त्या स्वस्वसुतीं प्रेमा गहन । आजि निवडला असतां भिन्न । स्वजन सदन विसरल्या ॥९०५॥गोपीप्रेमा यथापूर्व । कृष्णीं जडला हें अपूर्व । कृष्णमायेचें लाघव । कथिलें तुज राया ॥६॥अद्यानेन महाव्यालो यशोदानंदसूनुना । हतोऽविता वयं चास्मादिति बाला व्रजे जगुः ॥४८॥बालक सांगती व्रजीं मात । महासर्पें आमुचा घात । करितां त्याचाचि करूनि अंत । कृष्णें समस्त रक्षिले ॥७॥त्या सर्पाचें कलेवर । लांब रुंद सविस्तर । आपणां गिळिलें तो विचार । व्रजीं समग्र मुखीं कथिला ॥८॥बाळक म्हणती आजि येणें । नंदयशोदानंदनें । अघ मर्दूनि आम्हां प्राणें । त्यांपासून रक्षिलें ॥९॥नंदनंदनें म्हणती एक । यशोदानंदनें म्हणती आणिक । किंवा यशोदाआनंदक । त्या श्रीकृष्णें रक्षिलों ॥९१०॥कुमारपणीं अघमोक्षण । तें पौगंडीं व्रजीं कथन । कैसें म्हणूनि केला प्रश्न । तें शंकानिरसन झालें कीं ॥११॥तंव राजा म्हणे जी व्यासात्मजा । शंका फेडिली बरवे वोजा । परी आणीक एक प्रश्न माझा । तो मुनिराजा समजावा ॥१२॥तरी पूर्विल्या स्वपुत्रांही परीस । गोगोपींचा स्नेह विशेष । कृष्णीं किमर्थ हा उद्देश । मज अशेष बोधावा ॥१३॥ब्रह्मन् परोद्भवे कृष्णे इयान्प्रेमा कथं भवेत् । योऽभूतपूर्वस्तोकेषु स्वोद्भवेप्वपि कथ्यताम् ॥४९॥औरसाहूनि परोद्भवीं । प्रेमा वाढला कवणे भावीं । ऐशी शंका मजलागोनी । ते निरसावी स्वामीनें ॥१४॥पूर्वील आपुलेही पुत्र असती । त्यांवरी नसेचि ऐशी प्रीति । जे परोद्भवा कृष्णाप्रति । प्रीति करिती गोगोपी ॥९१५॥ऐकोनि राजाचा हा प्रश्न । वक्ता श्रीशुक सर्वज्ञ । करी नृपाचें समाधान । तें अभिज्ञ परिसोत ॥१६॥श्रीशुक उवाच - सर्वेषामपि भूतानां नृप स्वात्मैव वल्लभः । इतरेऽपत्यवित्ताद्यास्तद्वल्लभतयैव हि ॥५०॥आत्मप्रियत्वें सर्व प्रिय । हें बोधावया व्यासतनय । पांचां श्लोकीं हा अभिप्राय । यथान्वय निरोपी ॥१७॥कृष्ण सर्वांचा आत्माराम । म्हणोनि त्याचे ठायीं वास्तव प्रेम । येर पुत्रादि हेमधाम । यांचें प्रेम तदर्थ ॥१८॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP