मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १४ वा| आरंभ अध्याय १४ वा आरंभ श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ श्लोक ७ ते ९ श्लोक १० ते १३ श्लोक १४ ते १६ श्लोक १७ ते १८ श्लोक १९ ते २० श्लोक २१ ते २२ श्लोक २३ श्लोक २४ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ श्लोक २९ ते ३० श्लोक ३१ ते ३२ श्लोक ३३ श्लोक ३४ ते ३५ श्लोक ३६ ते ३७ श्लोक ३८ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ६१ अध्याय १४ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीमद्गोविंदसद्गुरुमूर्तये नमः ॥ गोविंदसद्गुरु प्रणतांचिया । तुज नमो जी देवतानिचया । हृदया वसवूनि आमुचिया । स्वपदाचिया प्रेमा दे ॥१॥गोशब्दार्थें परादि वाणी । वेत्ता स्वसत्तासंवेदनीं । गोविंद या हेतु म्हणोनि । वदला मूर्ध्नि श्रुतीच्या ॥२॥शब्द आकाशींचा म्हणती । ऐशी लौकिकी जरी वदंती । तरी घागरीं मडकीं आत्मस्थिति । चर्चा करिंती परस्परें ॥३॥सत्यें प्रकाशिलें ऋत । तें परादिवैखरीपर्यंत । शब्द शब्दार्थी वर्ते सूनृत । येर अनृत भवभान ॥४॥सूनृत सत्येंसी अभिन्न । सत्य सन्मात्र चैतन्य । सत्यज्ञानमनंतपूर्ण । ब्रह्मनिर्वाण कैवल्य ॥५॥बीजापासूनि निघे मोड । तो बीजेंसी अनिवड । पुढें पुढें वाढोनी वाढ । करी निवाड बीजत्वा ॥६॥बीज दाऊनि भूस हरपे । वस्तु दाऊनि शब्द लपे । प्रपंच मोजितां शब्दमापें । निजात्मरूपें स्वयें उरिजे ॥७॥म्हणोनी शब्दपाठी पोटीं । शब्दवितां तूं वेदमुकुटीं । गोविंदनामें करूनियां ठी । उमजे गोठी सदसद् ॥८॥परंतु शरणागताविण । तुझें सर्वत्र दुर्लभपण । कूर्मी प्रसवलियावांचून । सुधावलोकन न फवे कीं ॥९॥म्हणोनि सद्गुरो प्रणतपाळा । तुझिये कृपेचा सोहळा । भक्तां लाभे सप्रेमळा । इतरां कुशलां तो न फवे ॥१०॥विष्णु सर्वज्ञ व्यापकपणें । परी तो तुझेनि स्वांतःकरणें । विपरीत स्फूर्तींचें जाणणें । लेऊनि रक्षणें प्रवर्ते ॥११॥सत्यसंकल्प भूमिके - । माजि जो परमानंद पिके । तो चंद्रमा न मोवेखे । विश्व पीयूखें निववीत ॥१२॥इत्यादि देवतासमूह । प्रचुर चिन्मात्रनिग्रह । अमोघ सुकृताचा संग्रह । तवानुग्रह त्या सुभगां ॥१३॥सद्गुरूपासूनी ब्रह्मविद्या । ..................... । न सोडी कल्पांतीं अविद्या । जे कां निंद्या निंदत्वीं ॥१४॥उदकीं बुडोनि कोरडा । जैसा मृगजळींचा पाणबुडा । कीं भानु नोळखे प्रकट पुढां । तेंवी उघडा जात्यंधु ॥१५॥तैसे अविद्यासंवृत सर्वज्ञ । त्यांचेंचि ऐसें भेदज्ञान । येर अभेदभावें जे अनन्य । ते नेणती भिन्न गुरु ब्रह्म ॥१६॥शर्करा पूजूनिया यथाविधि । मिष्टता मागे वरसिद्धि । ऐशी ज्याची कोमल बुद्धि । तो गुरु आराधी ब्रह्मार्थ ॥१७॥सद्गुरूवेगळें भावी ब्रह्म । त्याचा आकल्प न वचे भ्रम । ध्यानाराधनें आमुचा काम । श्रीपादप्रेम स्वामीचें ॥१८॥चकोरां चंद्रेंसि वोळखी । करणें तन्मात्रीं अलुकी । निजांघ्रीं प्रेमा नैसर्गिकि । वरें पोरवी मम प्रभो ॥१९॥हें ऐकोनि म्हणती गुरु । स्तवनांमिसें हा प्रेमादरू । येर्हवीं कृपेचा पाझरू । स्तवनोद्गारू हा स्फुरवीं ॥२०॥जैसि मुकुलितें कुमुदवनें । फांकवी चंद्राचें चांदिणें । तेवी प्रेमाचें अभिलाखणें । स्फुरे वर (?) नको ॥२१॥तरी हा सप्रेम कृपायोग । अनादिसिद्ध नैसर्गिक । परस्परें अचुक ऐक्य । येर मायिक नेणती ॥२२॥म्हणोनि तुझा सफळचि काम । सांडूनि प्रार्थनासंभ्रम । स्वीकारूनि आज्ञा नियम । व्याख्यान सुगम चालवीं ॥२३॥दशमामाजी चतुर्दश । ब्रह्मस्तुति परम रहस्य । अर्थ उकलूनि सुगमभाष्य । कीजे आदेश हा येथ ॥२४॥ऐसे आज्ञेच्या वाक्सुमनीं । वर्षतां सद्गुरु साम्राज्यदानी । दयार्णवाच्या नम्र मूर्ध्नि । तों त्या प्रसूनीं पूजिला ॥२५॥मग म्हणे जी देशिकेंद्रा । लपवीं स्थापूनि वक्त्रत्वमुद्रा । घालूनि अवधानामृत चारा । ग्रंथविचारा विवर ॥२६॥तथास्तु म्हणोनि अमृतकरें । मौळ स्पर्शोनि स्नेहसुभरें । मुख निरीक्षता आदरें । निरा अक्षरें मुहुरलीं ॥२७॥आतां तेणें रसाळपणें । ब्रह्मस्तुतीचें उपलवणें । घेऊनी अवघीं करणज्ञानें । श्रवणीं थाणें वसों द्या ॥२८॥अद्भुत देखोनी कृष्णमहिमा । मोहग्रस्त झाला ब्रह्मा । पूर्व आगंतुक स्मरणधर्मा । निश्चय कर्मा असमर्थ ॥२९॥मग हंसावरूनि पृथ्वीवरी । स्ववपु कनकदंडापरी । लोटूनि अष्टाक्ष अश्रुधारीं । श्रीकृष्णांघ्री अभिषेकी ॥३०॥नंदनंदन कवळपाणि । प्रकट देखिला जैसा नयनीं । त्यातें नमूनि त्याचे स्तवनीं । पद्मयोनि प्रवर्तला ॥३१॥पहावया कृष्णमहिमान । आपण आचरलों दौर्जन्य । तेणें सभय कंपायमान । करी स्तवन साशंक ॥३२॥स्तवूं परमात्मा सुरवर्य । क्षमा करवूनि निज अनार्य । तदनुग्रहें सृजनकार्य - । करणीं धुर्य पुन्हा झाला ॥३३॥इतुकी कथा चतुर्दशीं । शुक निवेदी औत्तरेयासी । मुमुक्षु भोक्ते त्या रसासि । तिंहीं पंक्तीसि बसावें ॥३४॥जेणें नाट्यें वेधिला विधि । वेधें भोगूनि सुखसमाधि । पुढती लोहोनि मनोबुद्धि । मग ते वंदीं निज ध्येय ॥३५॥तें विधीचें उपास्य ध्यान । परिसें परीक्षिति सावधान । श्रोतीं मनाचें करूनि नयन । श्रवणीं रिघोन तें पहावें ॥३६॥ N/A References : N/A Last Updated : April 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP