मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमद् आद्यशंकराचार्य| अध्याय तेविसावा श्रीमद् आद्यशंकराचार्य श्री शंकराचार्य वंदना अनुक्रमणिका अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्विसावा अध्याय सत्ताविसावा श्री शंकराचार्य आरती श्री शंकराचार्य वंदना - अध्याय तेविसावा निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र. Tags : marathipothishakaracharyaपोथीमराठीशंकराचार्य अध्याय तेविसावा Translation - भाषांतर जगद्गुरु श्री आदि शंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । वंदिते द्या आधारा ॥१॥दिग्विजय यात्रेचे त्रोटक वृत्त । तत्वज्ञानाचे छोटेसे सार । कांचीत गुरुपीठाचा संकल्प । वर्णिले मागील अध्यायी ॥२॥दिग्विजय यात्रेची दिशा बदलून । ठेविले कांचीचे प्रस्थान । आचार्यांची आज्ञा घेऊन । निघाला आधी राजशेखर ॥३॥आचार्यास नको थोडाही त्रास । सर्वांचा यास्तव्व प्रयास । आचार्यांसी एकच ध्यास । श्रेष्ठत्व पावावे अद्वैत ॥४॥करिता केव्हांही शास्त्रार्थ । पंथोपपंथांसी मूळ साधन । सांगून करिती समाधान । आपल्यांत घेती मिळवून ॥५॥सर्व नद्यांचा सागरी लय । तैसे सर्व केशवमय । मध्य मूर्ती मानून ब्रह्ममय । मांडावे पूजेत पंचायतन ॥६॥शैव, वैष्णव किंवा सौर्य । शक्ति अथवा गाणपत्य । पंथ हे भेदांचे अपत्य । जाणोनि कराव अभेद ॥७॥ब्रह्म भासते सृष्टीरुपाने । भेद बनती जीवकल्पने । कल्पना सोडता अभेद बाणे । उरते केवळ अद्वैत ॥८॥सर्वांस समजावे तत्वज्ञान । आचार्य देती स्पष्टीकरण । सुंदर साधे विवेचन । करती सिद्धांत, नियमांचे ॥९॥यात्रा पोचली कांचीनगरी । धावले नगरजन प्रवेशद्वारी । नंदीवर्मन् राजा स्वागत करी । भाग्य उजळले कांचीचे ॥१०॥नगरी होती नाना मंदीर । कामाक्षी मंदीराचे स्थान आगळे । आचार्याम्नी स्वये कोरिले । श्री चक्र, देवीच्या कर्णफुली ॥११॥चंद्रमौलीश्वराचे दर्शन । महात्रिपूरसुंदरीचे यथार्थ पूजन । आचार्य पुसति प्रयोजन । नगरीच्या धामधूमीचे ॥१२॥नंदीवर्मन् तथा सुरेश्वर । नम्रता आत्यंतिक धरुन । आचार्यास प्रार्थिती विनवून । करावी सर्वांची इच्छा पूर्ण ॥१३॥सर्वज्ञ पीठाचे चालले काम । सर्वांच्या मुखी आपुले नाम । कांची बनावे आपुले धाम । चरणी सर्वांची विनवणी ॥१४॥आचार्य करिती हास्यविनोद । पुसति “ यात्रेचा हाच कां बोध । संन्याशास कसा घराचा शोध । तो तर सदा अनिकेत ” ॥१५॥सुरेश्वर म्हणति हासून । “ अनिकेत जरी तुम्ही आचार्य । भक्तशिष्यांना हवा ना आश्रय । निर्मिलेत ना चार मठ ॥१६॥शिष्यांनाही वाटते मनोमन । असावे एक गुरुपीठ । राजशेखरांचीहि इच्छा उत्कट । बनते आहे कांची पीठ ॥१७॥कांचीतील पाचवे पीटः । मानतील सर्व गुरुपीठ । सर्वज्ञांचे सर्वज्ञपीठ । मोक्षपुरीतील जणूं मुकुट ” ॥१८॥आचार्य वदती हासून । “ राजैश्वर्य येता सहाय्यास । बद्ध करु पाहता संन्याशास । यातूनहि शोधेन मुक्तिमार्ग ” ॥१९॥एकांती करीती विचारमंथन । अनेकातून शोधले एकत्व । तैसे कांची मठ मूळ तत्व । व्हावे इतर पीठांचे मूळपीठ ॥२०॥आवश्यकता पडेल भविष्यांत । मठाधिपती चारी दिशातून । कांची मठात एकत्र येऊन । धर्मप्रसाराचे घेतील निर्णय ॥२१॥सर्व आहेत जमलेले । उत्साहाने कांही ठरविले । आनंदाने कामास लागले । आता पुरवावा बालहट्ट ॥२२॥आचार्यांचा मिळता होकार । उत्साहाला आले उधाण । सर्वज्ञ पीठावर आरोहण । केव्हां करतील आचार्य ? ॥२३॥चौल देशाच्या राजाने । दवंडी देवविली सर्वत्र । अखेरचे हे शास्त्रार्थ सत्र । कुणीही यावे वादास ॥२४॥अनेक पंडित उभे वादास । परी शर्ण जाती अखेरीस । अद्वैतवादी शंकराचार्यांस । विनविती करावे पीठारोहण ॥२५॥इतुक्यात आला एक समूह । ताम्रपर्णीतीरस्थ ब्राह्मणांसह । या आठ वर्षाच्या बालकासह । म्हणती करावा शास्त्रार्थ ॥२६॥आचार्य म्हणती, “ अवश्य । सर्वज्ञ ठरेल बालक जर । बसेल हाची पीठावर । कोणीही न मानावा संदेह ” ॥२७॥सुरु झाला शास्त्रार्थ । तीन दिवस सतत वाद । आचार्य साधती सुसंवाद । प्रसन्न मनी बालकावर ॥२८॥तीव्र बुद्धी, वादकौशल्य । आचार्य करिती कौतुक । परी अखेर झाला नतमस्तक । विनवी मानावे मजसि शिष्य ॥२९॥संपला अखेरचा वाद । सर्वज्ञत्व ठरले निरपवाद। उठले श्री शंकराचार्य भगवत् पाद । सर्वांची विनंती मानून ॥३०॥आचार्य निघाले पीठासन्निध । जमलेले मुनी, पंडित, विद्वान । पदोपदी आचार्या वंदून । अर्पिती आपापली भेट ॥३१॥सरदार मानकर्यांसमवेत । नंदीवर्मन्, सुधन्वा, राजसेन । माना लाववून, कर जोडून । उभे मार्गात कटाक्षार्थ ॥३२॥सामान्य जनांस कळले पूर्ण । विरागी संन्याशाचे श्रेष्ठपण । पंडीत, राजे धरिती चरण । सर्वस्व करिती त्या अर्पण ॥३३॥पद्मपादाचार्यांचा हात धरुन । आनंदे पीठारुढ होऊन । सुवर्णासन केले पावन । एकमेवाद्वितीय संन्याशानें ॥३४॥कोणी करिती वाद्यांचा गजर । कॊणी करिती जयघोष । कोणी उधळति सुवर्णपुष्प । कैसा वर्णावा तो समारंभ ॥३५॥‘ जगद्गुरु श्री भाष्यकार । जय पूज्य पादवर्य । ब्रह्मात्मैक्यं बोधय स्वामीन् अद्वैताचार्य ’ । घोष चाले मार्गावर ॥३६॥हस्तामलक, त्रोटक, सुरेश्वर । हाती धरती छत्र, चामर । स्वर्णदीप, तोरण, मकर । बिरदावली आणि आयुधे ॥३७॥आचार्यांना करुनि दंडवत । प्रसन्न चित्ते गाती स्तवन । सामान्यांचे गायन, नर्तन । कलाकारही करिती वंदन ॥३८॥घोष करिती वरचेवर । ‘ जय जय शंकर । हर हर शंकर । कांची शंकर, कामकोटी शंकर ’ ॥३९॥समारंभाची करिता सांगता । सर्व शिष्यांना उपदेश । राजमंडळास धर्मादेश । आणि इतरा आशीर्वाद ॥४०॥चारी शिष्यांना देती निरोप । पूर्वीच रचले मठाम्नाय । सर्वांसी आहे ते मान्य । त्याचेच घ्यावे मार्गदर्शन ॥४१॥शिष्य जरी संन्यासी । होती तरीही कासावीस । केव्हां घडेल पुन्हा सहवास । जगद्गुरुंचे प्रसन्न दर्शन ॥४२॥मृदू अंतःकरणाचे आचार्य । उरी धरिती शिष्य । स्पर्श तो मंगल दिव्य । शिष्यांस करी आश्वासित ॥४३॥हस्तामलक, त्रोटक, पद्मपादाचार्य । निघती साधाया पुढील कार्य । शृंगेरी पीठाचे सुरेशराचार्य । थांबती गुरुंच्या आज्ञेने ॥४४॥सांगती त्यास मनोगत । “ सुरेश्वरा, याही पीठावरी । नेमला पाहिजे उत्तराधिकारी । नाही उरला फार अवधी ॥४५॥अंतीम वाद ज्याच्याशी केला । तोच शिष्य मी निवडला । मनी कांही बेत केला । पटते पाहा कां योजना ॥४६॥गुरुपीठावर नेमला बालक । प्रौढ बसले शिष्यपीठावर । न उद्भवो कोणते अवडंबर । यामुळे पुढे भविष्यात ॥४७॥संन्यासदीक्षा देऊन त्याला । जरी पीठाधीश केला । तरी प्रतिपाळ पाहिजे केला । त्याचा तुम्ही सुरेश्वर ॥४८॥संसार अर्धाच टाकून । संन्यास घेतला, तूं शिष्यवर । मनी तुझ्या वात्सल्य अपार । वर्षवावे या बालकावर ” ॥४९॥सुरेश्वर झाले सद्गदित । ऐकतां गुरुमाऊलीचे मनोगत । जाणुनि माझे हृद्गत । सुप्त वासना केली तृप्त ॥५०॥ऐसा होता सुसंवाद । बालकास दिले दीक्षानाम । ‘ श्री चरणेन्द सरस्वती सर्वज्ञात्म ’ । सोपविले सुरेश्वराचार्यांचे हाती ॥५१॥आत्मपूजार्थ जे पाचवे लिंग । चन्द्रमौलीश्वर नामे योगलिंग । श्री सुरेश्वराचार्यांचे हातून । दिधले श्री चरणेन्द्र सरस्वतीस ॥५२॥काय घडले भविष्यांत । आचार्यांचे उदात्त जीवनात । मिळतो कां कांही इतिहास । जाणावे पुढील अध्यांयी ॥५३॥इति श्री आदि शंकर लीलामृत । तेविसावा अध्याय येथे समाप्त । कृपा होवो सदा प्राप्त । ग्रंथ होवो पूर्ण सार्थ ॥५४॥शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु । N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP