मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमद् आद्यशंकराचार्य| अध्याय बारावा श्रीमद् आद्यशंकराचार्य श्री शंकराचार्य वंदना अनुक्रमणिका अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्विसावा अध्याय सत्ताविसावा श्री शंकराचार्य आरती श्री शंकराचार्य वंदना - अध्याय बारावा निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र. Tags : marathipothishakaracharyaपोथीमराठीशंकराचार्य अध्याय बारावा Translation - भाषांतर जगद्गुरु श्री आदि शंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । वंदिते द्या आधारा ॥१॥आशीर्वाद गुरुंचे घेऊनि । काशी गाठी नर्मदा सोडूनि । अनुभग लाभला यात्रेतुनि । वर्णीला मागील अध्यायी ॥२॥विश्वेश्वराचे दर्शन घेणे । भावे भवानिसी विनवणे । भोवती जे घडे ते पाहणे । त्रिकाल गंगास्नान ॥३॥हाच नेम श्री शंकराचार्यांचा । काशीस येता सुरु झाला । वरपांगी सर्वांना विरंगुळा । प्रवासा अन्ती प्राप्त झाला ॥४॥आचार्यांना एकच ध्यास । प्रसन्न होवो शूलपाणी । भिक्षा देवो आई भवावी । वैराग्य आणि ज्ञानाची ॥५॥सर्व शिष्य भक्तांसाठी । करिती श्रद्धेने अनुष्ठान । घाटावर चाले प्रवचन । नित्य गंगेसाठी अध्ययन ॥६॥श्रवणार्थ जमति जिज्ञासु । शिष्यभावाने ज्ञानपिपासु । संन्यासदीक्षेस्तव मुमुक्षु । नित्य शंकराभोवती ॥७॥सर्वांचे करिती समाधान । वेदान्तविचारी नसावे न्यून । त्यासाठी सतत चिंतन । आणि चाले आत्मशोध ॥८॥जैसा विचार तैसाचि आचार । हाच शुद्ध व्यवहार । वेदान्ताचा करण्या प्रसार । आचार्य पाळिती निष्ठेने ॥९॥निर्वाणषट्काचे अंतरंग । अनुभविले जे गुरुकृपेने । लोकांपर्यंत यथार्थपणे । कैसे केव्हां पोचेल ? ॥१०॥प्रत्येकाचे स्वस्वरूप । तेथे नाही जातिभेद । ऐसे सांगति चारी वेद । कैसे पटावे सर्वांस ? ॥११॥एके दिवशी शिष्यभक्तांसह । मनी हाच विचार करीत । गर्दीतून वाट काढीत । निघाले विश्वेश्वर दर्शना ॥१२॥आधीच वाट लहान । जा ये करिती थोर सान । शिवाशिवाचे राखीत भान । सर्वांची चालली लगबग ॥१३॥दिसतां आचार्यांचा जथा । वाट देती आदरुन । दूर होती आपण होऊन । भाविक भक्त इतर जन ॥१४॥मार्गांत एका बोळापाशी । चार कुत्री हाती धरुन । एक चांडाळ वाट अडवून । उभा दिसे शांत रीति ॥१५॥रुढीस धरुनि आचार्य । म्हणति, चांडाळा, होई दूर । शब्द येती कानावर । परी वाट सोडेना ॥१६॥उच्चस्वरे सांगे शंकर । “ मार्ग माझा मोकळा कर । चांडाळ तूं दूर सर । दूर सर, दूर सर ” ॥१७॥न करता वाट मोकळी । चांडाळ पुसे शंकरासि । “ कोणास दूर सर म्हणसि । सांग जरा समजावुनि ॥१८॥मी अज्ञानी चांडाळ । न समजे हा भेदाचा खेळ । तुझा माझा कां नाही मेळ । सांग कैसे व्हावे दूर ॥१९॥तुझ्या माझ्या देहात । फरक कोणता निश्चित । अन्नच असते ना पोशित । अस्थिमांसमय देह आपुले ॥२०॥आहे जर सर्वत्र एक । चेतविणारे चैतन्य । मग कां करणे दोघा भिन्न । कोण शिव कोण अशिव ? ” ॥२१॥ऐकतां प्रश्न चांडाळाचे । सर्वजण भांबावले । म्हणति हे चांडाळ माजले । कैसे प्रश्न हे उर्मट ॥२२॥परी आचार्य मनी उमजले । वेदान्ताचे मर्म सगळे । चांडाळमुखे स्पष्ट झाले । अंतर्यामीचा शिव प्रकटला ॥२३॥धावुनि धरती चरण । चांडाळास जाती शरण । म्हणती गुरुसमान आपण । सर्वांसमक्ष दिधला बोध ॥२४॥‘ देहाच्या बाह्य उपाधिमुळे । अज्ञाने भेदाभेद सगळे । जीवाने व्यर्थ हे कल्पिले । अंतर्यामी एकचि शिव ॥२५॥हे तत्व ज्यासी कळले । कोणतेहि जाति लिंग असले । त्याची मी वंदीन पाऊले । मजसि तो गुरुसमान ॥२६॥या घटनेचा मूळ भाव । अद्वैत तत्वाचा अनुभव । मनी राखावा सद्भाव । र्तरीच मिळेल खरी वाट ’ ॥२७॥संतोषे हासे चांडाळ । शंकरास उठवी आलिंगून । बघता बघता गेला मिसळूण । गर्दीत कोठे दिसेना ॥२८॥लोक पुसती “ काय घडले । स्पृश्यास्पृश्यतेचे बंधन ढिले । सर्वांसमक्ष आपणचि केले । काय कारण सांगावे ” ॥२९॥आचार्य सांगती सर्वास । रचुनि मनीषापंचक स्तोत्रास । विसरावे बाह्य रुपास । जरी जाणणे सत्य रुप ॥३०॥सामान्यास पटावे तत्व । म्हणति प्रकटले महादेव । घेऊनि अमंघळ चांडाळ भाव । कृपा करण्या सर्वांवरी ॥३१॥अरे अहिंसेचे माजवून बंड । बौद्ध मतवाद्यांचा अहंगंड । अस्पृश्यतेचे निर्मि पाखंड । मांसाहारी जना ठेवी दूर ॥३२॥करिता खोल विचार । माणसापासून माणून दूर । करणारी रुढी क्रूर । हळूंहळूं सर्वत्र फैलावली ॥३३॥अस्पृश्यता व्हावी अमान्य । जाणावे अंतरीचे चैतन्य । मोडावी रुढी अज्ञानजन्य । म्हणुनि प्रकटले विश्वेश्वर ॥३४॥घेऊनि विश्वेश्वराचे दर्शन । आपापल्या मार्गे जाती जन । अंतरी घुमे आचार्य वचन । भेदाभेद अमंगल ॥३५॥शंकराचार्य मनी प्रसन्न । गैररुढींचे करण्या खंडन । कोणत्याहि रुपे भगवान । होईल मज सहाय्यवान ॥३६॥ऐसे मनोरम प्रसंग । काशीक्षेत्री घडले कित्येक । परी त्यातील प्रत्येक । प्रकटवी वैदिक धर्म ॥३७॥किती काळ गेला काशीत । प्रकटति सप्तरंग जीवनात । कैसे होई कार्य वृद्धिंगत । जाणावे पुढील अध्यायी ॥३८॥इति श्री आदि शंकर लीलामृत । बारावा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । ग्रंथ होवो पूर्ण सार्थ ॥३९॥शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु । N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP