मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमद् आद्यशंकराचार्य| अध्याय आठवा श्रीमद् आद्यशंकराचार्य श्री शंकराचार्य वंदना अनुक्रमणिका अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्विसावा अध्याय सत्ताविसावा श्री शंकराचार्य आरती श्री शंकराचार्य वंदना - अध्याय आठवा निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र Tags : marathipothishakaracharyaपोथीमराठीशंकराचार्य अध्याय आठवा Translation - भाषांतर जगद्गुरु श्री आदिशंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । प्रार्थिते द्या आधारा ॥१॥संन्यास घेण्या सम्मती । मातेने शंकरा कैसी दिधली । कथा संक्षेपे वर्णिली । सप्तमाध्यायी श्रद्धेने ॥२॥संन्यासदीक्षा गुरुकडून । घेणे वाटे शंकरा उचित । परोक्ष ज्ञान जरी प्राप्त । वावी अपरोक्षानुभूती ॥३॥संन्यास म्हणजे काय । सम्यक् न्यास म्हणजे संन्यास । जे ते योग्य तेथे ठेवण्यास । हवे वैराग्य आणि ज्ञान ॥४॥श्रीगोविंदयतींच्या शोधास । मज जाणे उत्तरदिशेस । मातेची व्यवस्था करण्यास । हवा थोडा कालावधी ॥५॥अग्रहाराचा हक्क कुलास । चालविण्या कुटुंब चरितार्थ । आवश्यक तितुके द्रव्य अर्थ । मिळेल मातेस, चिंता व्यर्थ ॥६॥बोलावुनि आप्त इष्टास । सांगोनि व्यवस्था शिष्टांस । मातेस न पडोत सायास । विनवी शंकर प्रत्येका ॥७॥परी मातेचे थकले शरीर । आचरता नित्याचे व्यवहार । जाणे रोज नदीवर । कैसा त्रास चुकणार ? ॥८॥हळूं, हळूं, थांबत, थांबत । सावकाश पाऊल उचलत । वृद्धत्वावर करीत मात । आर्याम्बा गाठी पूर्णाकांठ ॥९॥शंकर होईल खिन्न पाहुनि । आई होईल कां बापुडवाणी । कोणास सांगेल आणा पाणी । काय करावा उपाय ? ॥१०॥एकांती चिंतन करी शंकर । कर्ता करविता तो ईश्वर । त्यालाच उचलणे चिंताभार । मी तर भक्त पामर ॥११॥परमेश्वराची करी आळवणी । जाणतोस ना सारी कहाणी । पूर्णेस आणावे येथे अंगणी । टळावे कष्ट आईचे ॥१२॥प्रार्थना ऐकता म्हणती कोणी । कैसी ही विचित्र मागणी । नदी कैसी येईल अंगणी । हवी कराया समजावणी ॥१३॥दुसरे कोणी देती स्मरण । शंकरे धरिता लक्ष्मीचरण । स्तवने झाली ब्राह्मणा प्रसन्न । तैसेच कांही घडेलही ॥१४॥लोकप्रवादा दुर्लक्षुनि । अनन्यभावे ईश्वरा वंदूनि । शंकर करी आर्त विनवणी । पूर्ण निष्ठा धरुनि मनी ॥१५॥पावसाळ्याचे होते दिवस । पूर्णेस आला महापूर । दगडबांधे करित दूर । धावे पात्र बदलुनि ॥१६॥बघता बघता प्रवाह आला । आर्याम्बेच्या घराशी वळला । स्तंभित करी सकलाला । सेवेस्तव जणु आसुसला ॥१७॥शंकर झाला सद्गदित । मायेसह पूर्णेस पूजित । परमेश्वरासी जोडूनि हात । म्हणे कृपा आपुली अपार ॥१८॥निरोप घेऊनि मातेचा । समय कालडी सोडण्याचा । गंभीर तैसा उत्कटतेचा । प्रसंग एकमेवाद्वितीय तो ॥१९॥एकाकी मी आजपासूनि । आई नको आणू मनी । चाललो जरी संन्यास घेऊनि । कर्तव्या न विसरेन ॥२०॥असो दिवस अथवा रात्र । आधारास्तव जर स्मरशील । धावत येईन मी तत्काल । सार्थ करीन तुझे बोल ॥२१॥रुढी असतील कांही । संन्याशास अधिकार नाहीं । परी वचन देतो आई । करीन तुझे अंत्यसंस्कार ॥२२॥आता देई आशिर्वाद । पित्याचे होवो पूर्ण स्वप्न । वैदिकधर्माचे सुस्थापन । वेदमातेचे फिटोत पांग ॥२३॥उदासीन तरीहि प्रसन्न । आर्याम्बेचे भरले नयन । कर्तव्यदक्ष अंतःकरण । उमटले बोल ‘ विजयी भव ’ ॥२४॥घेवोनि मोजके सामान । सकल जनांचे आशीर्वचन । शंकरे ठेविले प्रस्थान । उत्तरदिशेने प्रवास सुरु ॥२५॥पूजावा केशवराज प्रथम । सोडन्यापूर्वी ग्राम धाम । पूजावे दैवत सार्वभौम । मंदिरी प्रवेशला शंकर ॥२६॥ पुजारी सांगे हात जोडून । पूर्णेने बदलता पात्र । मंदीर झाले उपेक्षित । कैसे होईल पुन्हा स्थापित ॥२७॥शंकर सांगे पुजार्यास । कर्ता करविता केशवराज । तुमचे आमुचे एक काज । श्रद्धेनें करावे पूजन ॥२८॥भोवताली जमले भाविक जन । त्या सर्वांशी प्रेमे बोलून । स्वतः मूर्ती सुस्थानी स्थापून । जिर्णोद्धाराचा शुभारंभ ॥२९॥उध्वस्त वैदिक धर्मास । पुनरपि करण्या प्रस्थापित । जीवनकार्याची सुरुवात । केशवराज हे निमित्त ॥३०॥उत्तर दिशेस कोणीकडे । गोविंदयती राहती तिकडे । शंकराचे पाऊल पडे । दृढपणे गुरुंच्या शोधार्थ ॥३१॥होता ऐकून शंकर । गोविंदयतींचे चरित्र सुंदर । साक्षात पातंजलीचा अवतार । मानिती त्यांना आदरे ॥३२॥यतिवरांचे शोधून स्थान । मनःपूर्वक त्यांना विनवून । संन्यासदीक्षा त्यांचेकडून । घ्यावी आपण विधीपूर्वक ॥३३॥चालला वेगे शंकर । शांत धीर आणि गंभीर । कृतनिश्चय मनी खंबीर । अवर्णनीय पदक्षेप ॥३४॥मस्तकाचे केलेले मुंडन । भगवे वस्त्र परिधान । दंड कमंडलु हाती धरुन । साकारले जणूं चैतन्य ॥३५॥इतक्या बालवयात संन्यास । कोणी दिधला असेल यास । येवढे तीव्र तपसायास । कोणत्या उद्देशे करीत हा ॥३६॥पहाता शंकराचे अद्भुत बाल्य । सर्वांचे मनी उपजे वात्सल्य । वाटे हा आपुलाच पाल्य । प्रेमे अर्पिती भिक्षा त्यास ॥३७॥परी न थांबे कोठे शंकर । चालत राही तो झरझर । नगरे अरण्ये करी पार । ध्येय ना विसरे क्षणभर ॥३८॥नामस्मरण अथवा चिंतन । सदाशिवाचे करी भजन । किती चाललो नुरे भान । देह थकता विश्राम ॥३९॥शिव शिव म्हणे वाचे । सच्चिदानंद रुप तयाचे । आठवीत प्रेमे मनी साचे । उल्हसित राखी वृत्ति सदा ॥४०॥बहर येई कवित्वाला । छंद लागला वाणीला । वारंवार गाई चरण पहिला । चिदानंदरुपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥४१॥मनी जो चरण स्फुरला । तीच सोबत शंकराला । धीर देई चित्ताला । मार्ग चालता एकला ॥४२॥गोविंदयती भेटले कां ? । वृतान्त काय त्या भेटीचा । कथा भाग शंकर चरित्राचा । जाणावा पुढील अध्यायी ॥४३॥इति श्री आदि शंकर लीलामृत । आठवा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । करण्या ग्रंथ पूर्ण सार्थ ॥४४॥शुभं भवतुं । शुभं भवतुं । शुभं भवतुं । N/A References : N/A Last Updated : March 19, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP