मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमद् आद्यशंकराचार्य| अध्याय तेरावा श्रीमद् आद्यशंकराचार्य श्री शंकराचार्य वंदना अनुक्रमणिका अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्विसावा अध्याय सत्ताविसावा श्री शंकराचार्य आरती श्री शंकराचार्य वंदना - अध्याय तेरावा निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र. Tags : marathipothishakaracharyaपोथीमराठीशंकराचार्य अध्याय तेरावा Translation - भाषांतर जगद्गुरु श्री आदिशंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । प्रार्थिते द्या आधारा ॥१॥श्री विश्वेश्वरानें होऊन प्रकट । आचार्यांसी कैसी दाविली वाट । गैर रुढींचा करवा नायनाट । वर्णिले द्वादश अध्यायी ॥२॥प्रसंग गेला घडून । आचार्य करिती एकांती मनन । माझ्या विचारांतील कांही न्यून । गेले ईशकृपे सरुन ॥३॥पुन्हां सुरु नित्यनेम । घाटावर अध्ययन अध्यापन । सर्वास करावे विद्यादान । योग्यतेनुरुप ॥४॥उरकुनि गंगेचे स्नान । चढता गंगेचा घाट । कानी व्याकरणाचा पाठ । स्वर वार्धक्ये जर्जर ॥५॥शंकराचार्य पाहती थबकून । कोणी एक वृद्ध ब्राह्मण । सर्व शक्ति एकवटून । करीत बसला घोकंपट्टी ॥६॥वृद्धाच्या हाती नुरले बळ । निसटले हातांतून पंचपात्र । पायर्यांवरुन गडगडत । शब्द उमटे ठण् ठण् ॥७॥आचार्य मनी दाटे करुणा । पंचपात्र देत ब्राह्मण । हासून करिती गोड भजना । चर्पटपंजरिका नाम सार्थ ॥८॥वृद्धा, आता नको व्याकरण । समीप येत आहे मरण । आतां सांग रक्षिल कोण । तुजला गोविंदावाचून ॥९॥धरुनि धनाची कामना । आप्तेष्ट हे होती गोळा । परी होता लोळागोळा । कोणी ना विचारतील ॥१०॥लोक कोण, आपण कोण । प्रपंच मिथ्या आता जाण । सोडूनि सारे माझे मी पण । करावे नामस्मरण ॥११॥व्रते दान वा उपासना । तीर्थाटन वा पुण्यस्नाना । करी न जाणता आत्मज्ञाना । मोक्षप्राप्ति कदापी ना ॥१२॥आचार्यांचा स्वर मधुर । भावभक्तिला आला पूर । सहजच कंठी उमटे सूर । नारायण नारायण ॥१३॥निमित्त झाला वृद्ध ब्राह्मण । सहजचि घडले तत्वनिरुपण । नको घालवू हरीभजनाविण । मानवा रे आपुले जीवन ॥१४॥झाली वर्षे दोन सहस्रांवर । चर्पटपंजरिका स्तोत्रचि सुंदर । आजहि तोषवि अंतर । भज गोविन्दम् ॥१५॥महिमा नामाचा जरी थोर । सहस्त्र नामे श्री विष्णूस । योग्य कोणते परी स्मरणास । गोविंद किंवा नारायण ॥१६॥सामान्यांचे साधे प्रश्न । त्यांचे करणे समाधान । विष्णुसहस्त्रनामाव । करिती भाष्य सर्वप्रथम ॥१७॥प्रत्येक नांवाचा योग्य अर्थ । स्पष्ट करिती शब्दांची गुंफण । अथवा सांगून व्याकरण । तेणे होई सोपे स्मरण ॥१८॥रचिली पुढे ती अनेक भाष्ये । मानिती विद्वान त्या सर्वश्रेष्ठ । त्यांचीच झाली मुहूर्तमेढ । विष्णुसहस्त्रनाम भाष्यानें ॥१९॥छोट्या मोठ्या कार्यातून । विशाल कार्याचा श्रीगणेशा । करवुनि घ्यावा तुम्ही महेशा । आचार्य विनविती परमेश्वरा ॥२०॥सामान्यपणे लोक म्हणति । कैसी अपूर्व काव्यस्फूर्ति । भाषा किती ओघवती । लालित्यपूर्ण रसाळ कृति ॥२१॥जैसी जैसी वाढे कीर्ति । गावोगावींचे निपुणमति । शिष्य व्हावया धावूनि येती । आचार्यांपाशी प्रतिदिन ॥२२॥ऐसा वाढता शिष्यगण । परस्परांत चाले वरचढपण । आचार्यांसि प्रिय कोण । आपल्यातील मी की तो ॥२३॥शिष्यांच्या मनी जरी भाव । गुरुसी व्हावे प्रिय आपण । अगाध गुरु निष्ठेवीण । होईल कैसा भाव पूर्ण ॥२४॥एखाद्या प्रसंगानिमित्ते । गुरुनिष्ठेचे दर्शन घडावे । गुरु शिष्य नाते स्पष्ट व्हावे । सर्व संशय संपुष्टा जावे ॥२५॥आचार्यांच्या मनीचा विचार । प्रत्यक्षांत आणणार ईश्वर । त्याचेच कार्य तो करणार । योग्य समयी पृथ्वीवर ॥२६॥एके दिवशी शिष्य सनंदन । उभा होता पैलतीरावर । शंकराचार्य म्हणति येई लवकर । खोळंबा सार्या कामाचा ॥२७॥नव्हती काठावरती नाव । पोहण्याचा नव्हता सराव फार । हाक मारिता गुरुवर । सनंदन धावला सत्वर ॥२८॥अपूर्व निष्ठा आचार्यांवर । सनंदन म्हणे गुरु तारणार । साहसे पाय ठेवी पाण्यावर । सांगे ओरडून आलो आलो ॥२९॥लोक म्हणति कैसा अविचार । होणार नाही पैलपार । नक्कीच हा बुडणार । पात्र गंगेचे कां आहे उथळ ॥३०॥सनंदन जेथे ठेवी पाऊल । तेथेच प्रकटे विशाल कमळ । वेगे पावला आचार्यांजवळ । लक्ष्मीनृसिंहाची सारी कृपा ॥३१॥लोक म्हणती खरोखर । गुरुच शिष्या तारणार । पैल पार करणार । ज्याची निष्ठा अपार ॥३२॥शिष्यास जडला सेवेचा नाद । गुरु घालिती जेव्हां साद । सनंदनाचा झाला पद्मपाद । धावला वेगे गुरुकडे ॥३३॥जाणती मनी शंकराचार्य । ईश्वरे नेमिला सनंदन । करावया माझे रक्षण । शिष्यरुपी माझे जवळ ॥३४॥आचार्यांचा जीवनक्रम । काशीवासियांसी परम सुखद । परी आचार्यांच्या मनी खेद । कां भेटेना माता भवानी ॥३५॥काय घडला प्रसंग । पूर्ण झाली कामना कैसी । अद्भुत रसाळ वृत्तांतासि । जाणावे पुढील अध्यायी ॥३६॥इति श्री आदि शंकर लीलामृत । तेरावा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । ग्रंथ होवो पूर्ण सार्थ ॥३७॥शुभं भवतु । शुभं भवतु । शुभं भवतु । N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP