मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमद् आद्यशंकराचार्य| अध्याय चौथा श्रीमद् आद्यशंकराचार्य श्री शंकराचार्य वंदना अनुक्रमणिका अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्विसावा अध्याय सत्ताविसावा श्री शंकराचार्य आरती श्री शंकराचार्य वंदना - अध्याय चौथा निर्मला गणेश जोशी विरचित श्रीमद् जगद्गुरु श्रीमद् आद्यशंकराचार्य यांचे पोथी चरित्र Tags : marathipothishakaracharyaपोथीमराठीशंकराचार्य अध्याय चौथा Translation - भाषांतर जगद्गुरु श्री आदि शंकरा । वर्णावे आपुल्या अवतारा । अल्प ही कामना पूर्ण करा । वंदिते द्या आधारा ॥१॥कैसी भारताची पूर्वस्थिती । महेश्वर प्रकटले कोणत्या रीति । जन्मकथा श्री आदि शंकराची । वर्णिली मागील अध्यायी ॥२॥जे जे बाळाच्या श्रवणी । शंकर धरी तकाळ स्मरणी । सर्व करिती वाखाणणी । एकपाठी म्हणून ॥३॥बोल बोबडे मुखातून । जैसी संगीताची उठे धून । गोड शांत स्वरातून । वाटे वर्षते अमृत ॥४॥बोबडेपण संपले सहज । ऋचा मंत्र श्लोकांची उपज । स्पष्टोच्चारे प्रकटे तेज । आश्चर्यचकित होती जन ॥५॥सुवर्णकांतीची फळे रसाळ । तेजस्वी परी वाणी मधाळ । ऐकत राहावी अनंतकाळ । वाटे वाणी शंकराची ॥६॥थोर पोर कोणी असू दे । सर्वांसी शंकर हवा वाटे । प्रेमभरे प्रत्येका भेटे । परी अंतरी सदा अलिप्त ॥७॥कोणा न कळे कां वृत्ति असंग । व्यवहारात प्रकटे प्रेमसंग । आनंद संतोषाचे विविध रंग । साही रिपूंशी मात्र निःसंग ॥८॥शिवगुरु देती नित्य संथा । आर्याम्बा सांगे लोककथा । श्रवणी पडती वेदकथा । पुराणकथाही सार्थ ॥९॥शिबगुरु योजिती उपनयन । अलौकिक बुद्धि जाणून । पाचवे वर्षी व्रतबंधन । संस्कारासी योग्य समय ॥१०॥पुत्रप्राप्ति उतारवयातील । पित्यासी करी उतावीळ । कारण जाणे आपुला काळ । आता आला समीप ॥११॥द्यावा पुत्रास उपदेश । परी जाणती तो विश्वेश । कोण्या अधिकारे आदेश । देऊ मी बाळा शंकरा ॥१२॥परी पुत्रमोह अनावर । शिवगुरु म्हणति “ ये ये शंकर । बाळा जाणे मजसि दूर । आता आहे अनिवार्य ” ॥१३॥शंकर पुसे लडिवाळपणे । “ सांगा तात कोठे जाणे ” । शिवगुरु सांगती “ आता पोचणे । शाश्वत पद ते गाठणे ” ॥१४॥शंकर पुसे पुन्हा हासून । “ कां ते सांगा मजसि तात ” । पिता सांगे पुत्राप्रत । देह आपुला अशाश्वत ॥१५॥शंकर पुसे ‘ शाश्वत काय ’ । शिवगुरु वदति ‘ आत्मा शाश्वत ’ । बाळ बोले “ कळले तात । मजसि सारे कांही ” ॥१६॥शिवगुरु पुसति ‘ काय कळले ’ । शंकर बोले गंभीरपणे । ‘ तुम्हा न कोठे जाणे येणे । आत्मा तर अमर ’ ॥१७॥अलौकिक बुद्धिचे ते बोल । पित्यास लाभले रत्न अमोल । हृदयी आनंदाचा कल्लोळ । आवरताहि आवरेना ॥१८॥आपुला शंकर जरी लहान । जाणतो मूळ तत्वज्ञान । आतां सांगावे उकलून । मृत्यूचे ते सत्य रुप ॥१९॥‘ साक्षात् मृत्यू दिसता पुढती । सारेजण हतबद्ध होती । डोळे अपौले मिटून घेती । जाणती ना मृत्यूचे मन ॥२०॥परी तुज बाळा सांगतो । मृत्यू दिसता नको घाबरु । अरे तो तर सर्वांचा सुहृदु । राहतो सदैव बरोबर ॥२१॥जन्मासवे येते मरण । हातात हात गुंफून । हृदयास हृदय जोडून । जीवनभर देण्या साथ ’ ॥२२॥शिवगुरुंचे चरण वंदूनिया । शंकर गेला खेळावया । शिवगुरुंची रोमांचित काया । सात्विक भावे निःश्वास ॥२३॥शिवगुरुंचे होता निधन । सर्वास वाटे आपण दीन । झालो शिवगुरुंवाचून । कोण पुढे सांभाळील ? ॥२४॥आर्याम्बेसही दुःख भारी । कैसे जगावे पतीचे माघारी । अल्पवयी पुत्र असता परी । धर्माज्ञा नाही सती जाण्या ॥२५॥पुत्र जरी आपुला सर्वज्ञ । परी गुरुगृही गेल्यावीण । गुरुकुल परंपरा राखेल कोण । आर्याम्बा विचार करी सखोल ॥२६॥आर्याम्बेच्या शुद्ध वर्तनाने । सर्वास सापडे पुढील वाट । शंकराच्या व्रतबंधाचा थाट । करिती सर्व बिनबोभाट ॥२७॥पुत्रसंगतीचा सोडून मोह । सत्शील आर्याम्बा अति सुजाण । कर्त्यव्याचे करण्या पालन । झाली सर्वतोपरी सिद्ध ॥२८॥उपनयनाचा दिव्य संस्कार । शंकर निघे सोडून घर । विद्येस्तव गुरुकुली संचार । करणे प्राप्त कांही काळ ॥२९॥स्वीकारुनि पहिला ब्रह्मचर्याश्रम । ब्रह्मचर्येचे करी पालन । मनोभावे गुरुंचे आज्ञापालन । शंकर बटुचे व्रती जीवन ॥३०॥साठवुनि मनी मातेचे रुप । पाही गायत्रीत जरी अरुप । भिक्षा मागे मंत्र उच्चारुन । ‘ ॐ भवति भिक्षां देही ’ ॥३१॥दूर करुनि माया छत्र । हाती घेऊनि भिक्षापात्र । घेई अन्न आणि ज्ञान मात्र । वेदान्ती शंकर निरासक्त ॥३२॥गुरुगृही पाठ घेता । भोवताली कांही घडता । शंकराचे मनी चिंता । सत्यासत्य कैसे जाणावे ॥३३॥विद्याध्ययन कैसे झाले । जग कैसे अनुभविले । विद्याव्रती शंकरे काय केले । जाणावे पुढील अध्यायी ॥३४॥इति श्री आदि शंकर लीलामृत । चवथा अध्याय येथे समाप्त । कृपा व्हावी सदा प्राप्त । करण्या ग्रंथ पूर्ण सार्थ ॥३५॥शुभं भवतुं । शुभं भवतुं । शुभं भवतुं । N/A References : N/A Last Updated : March 19, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP