मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी|
महत्त्वाकांक्षेपायी

महत्त्वाकांक्षेपायी

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


तुला तसे खास वाटू लागले आहे ! यात काही... शंका नाही .
ते कसे काय ?
दिवसेंदिवस आपणाला... अधिकाधिक क्षुद्र व्हावे लागले आहे !... अन् ते... माझ्यामुळे !
हो असेच म्हणायचे ! निदान या जन्मापुरते तरी असे वाटू लागले आहे खास !
हो... नाहीतर इतका भित्रेपणा... इतकी निराशा मागे कधी माझ्या...
कारण बरोबर आहे - आता आपले... वय काय आहे ?
वय ?
असा दचकलास का ?
‘ वय ? तुहे वय किती ? ’... हरहर किती रडविणारा प्रश्न हा !
आणि म्हणूनच क्षुद्र !... क्षुद्र व्हावे लागते आहे ! असा तळमळतो आहे मी ! हुस्स !... चालला !... तुझा आधार सुटत चालला !... देवा !
घे ! आता देवाकडेच धाव घे !... कारण - मागे कधी... ?
मागे म्हणजे... तू अठरा एकोणीस वर्षांचा होतास तेव्हा ना ?
हो तेव्हाच... त्या वेळेला नाही आठवण आली कधी देवाची ?
कशी होईल ? ‘ मी मोठा आहे... मी मोठा होणार... मी मोठा व्हायलाच जन्माला आलो आहे ! ’ यानेच जर सारखा मी...
‘ मोठा ! ’ मोठा म्हणजे किती मोठा ?
किती ! - किती ?
जगापेक्षाही ?
हं !
देवा - देवापेक्षाही ?
आणखी देव कोण ?
काय ?... इतका तू... !
नाही ! नाही ! आता नाही !!
यापुढेही !...
निदान तू मरेपर्यंत... तुझी राख होईपर्यंत तरी नाही !
माझी राख !... होईल ! केव्हा तरी खास होईल... पण... !
असे काय ! -
मला तुझे पाय धरू दे ! कारण क्षणाचाही नेम नाही... म्हणून मरायच्या पूर्वी तरी... मला क्षमा कर !... तुला खाली खेचले ! तुला मी रडविले !... मला क्षमा कर ! बाबारे ! मला क्षमा कर !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP