मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी| असे बोलवते तरी कसे मी माझ्याशी निव्वळ भ्रांती गंमत हिशोब अंदरकी बात ही नोकरी आहे विश्वास मी आणि ही सबब एळकोट बारीकसारीक गोष्टीमधचे समर्थन मी कोण ? ही आपली खुशाल हसत आहे ताडी आठवण चोरायचा ? आणि तो कुणाचा ? भलता नाद पाखरे यूसलेस छे, व्यवहार ढोंगी जग सहज बोलणी अगत्य आपली किंमत मुद्दामच ! आपला मार्ग कीस न् कीस अमावस्या ‘ मिस्टिक ’ अनुभव जिवंत जोडपी धड निजूसुद्धा खरे कारण निनावी प्रत्यक्ष त्याच्या वडिलांना विचारले होते आपल्या नाडीचे ठोके टोचणी नको पण - तुलाच कमीपणा पुढे काय ? असे बोलवते तरी कसे ध्येयात्मक वाचन कोण बोलवते ? स्वतःबद्दल स्वतःची कविता बंडखोर पशू भाव महत्त्वाकांक्षेपायी असे बोलवते तरी कसे नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे Tags : diwakarदिवाकरनाट्यछटामराठी असे बोलवते तरी कसे Translation - भाषांतर शीः ! नकोच बोवा... !हे काय मध्येच ?आपण नाही येत त्याच्याकडे !आता चांगला त्याच्या घरापर्यंत आला आहेस... अन् मध्येच नकोच पण !... चल ! फिर मागे...पण असे बिथरायला झाले काय ?कपाळ तुझे आणि माझे !असे काय, सांगशील तर खरे !किती किळसवाणे... ! अन् अश्लील बोलत होते काल ते ! अजून... अजून माझ्या डोक्यात... छे !...अरे पण तू तर नाहीस ना... !अरे मी नसलो म्हणून काय झाले ? ऐकलेले तर - !जाऊ दे रे ! कालचे काल ! आज काय त्याचे !‘ आज काय त्याचे ? ’ कोण इथे घाण साचून बसली आहे... अन् म्हणे... !असेल ! जायला काय... ?कसे जायचे रे ! म्हणे ‘ जायला काय... ? ’ गेलो तिथे अन् त्याची बायको दृष्टीस पडली म्हणजे मग !... कोणत्या नजरेने पाहायचे त्यांच्याकडे ! असल्या घाणेरड्या... अन् किळसवाण्या... ?क्च् !! विलक्षण आहे बोवा !असेल !.... नाही... त्यांच्यापुढे जायची... आपली नाही छाती होत !काही तू म्हणतोस तेही...तर काय रे ! अन् मी म्हणतो, इतके कसे या लोकांना काही... ! आपल्या घरात बायका असतात नसतात... त्यांच्याबद्दल काहीच कसे यांना... !!वाटते !... वाटते !! N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP