मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी| कोण बोलवते ? मी माझ्याशी निव्वळ भ्रांती गंमत हिशोब अंदरकी बात ही नोकरी आहे विश्वास मी आणि ही सबब एळकोट बारीकसारीक गोष्टीमधचे समर्थन मी कोण ? ही आपली खुशाल हसत आहे ताडी आठवण चोरायचा ? आणि तो कुणाचा ? भलता नाद पाखरे यूसलेस छे, व्यवहार ढोंगी जग सहज बोलणी अगत्य आपली किंमत मुद्दामच ! आपला मार्ग कीस न् कीस अमावस्या ‘ मिस्टिक ’ अनुभव जिवंत जोडपी धड निजूसुद्धा खरे कारण निनावी प्रत्यक्ष त्याच्या वडिलांना विचारले होते आपल्या नाडीचे ठोके टोचणी नको पण - तुलाच कमीपणा पुढे काय ? असे बोलवते तरी कसे ध्येयात्मक वाचन कोण बोलवते ? स्वतःबद्दल स्वतःची कविता बंडखोर पशू भाव महत्त्वाकांक्षेपायी कोण बोलवते ? नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे Tags : diwakarदिवाकरनाट्यछटामराठी कोण बोलवते ? Translation - भाषांतर कसे बोललो... का - ही - समजत नाही... !आता म्हणजे परीक्षेला बसणारी बाई... पुस्तक त्यांना ते नेमलेले ! अन् त्यांनाच म्हणायचे... बायरनचे ‘ चाईल्ड हॅरॉल्ड ’ समजत का नाही तुम्हाला ?अन् ऐकल्याबरोबर दचकल्या काय त्या !क्च् ! काय म्हणावे याला... ! हा... चाचपडत बोलण्याचा परिणाम का हलकटपणा... !इतके काही...काय इतके काय नाही ! अशाने... पुढे ‘ पाऊल टाकू की नको... टाकू की नको ? ’ अस्से... होऊन जाते !कोण विचित्र आयुष्य हे ! मनापासून... अगदी मनापासून बोलावेसे वाटते ! पण ते तर साधत नाही... परवडत नाही ! अन् मग हे अस्से... !जाऊ दे बोवा !पण... मी म्हणतो... त्यांना विचारायच्या आधी... तुझ्या लक्षात कसे नाही आले ?नाही बोवा अगदी मागमूस नाही !चमत्कार आहे ! तुलाही बोलावेसे वाटत नाही, मलाही वाटत नाही... असे असून... काही... काही वेळेला का रे ? कावराबावरा होऊन भोवताली असा पहातोस आहेस सा ?मला वाटते... ! हो ! मला वाटते... आपणा दोघांच्याही नरड्यांना फास आहेत !काय ! भोवताली... तिसरे कोणी तरी वावरते आहे खास !अरे बा-परे !! N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP