मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी|
मुद्दामच !

मुद्दामच !

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


- गावात म्हणे देवीची साथ आली आहे ?
- आली असेल.
- अरे, मग आपल्या मुलाला देवी काढशील की नाही ?
- काही जरूर नाहीम
- म्हणजे !
- तुला काय करायचे आहे त्याच्याशी ? आपला गप बैस !
- अरे, तर आजारी पडून त्या पोराच्या जीवाला काही भलते सलते झाले म्हणजे मग ?
- होऊ दे झाले तर ! त्याला मी मुद्दामच तसा ठेवला आहे, झाले आता !
- म्हणजे पोर मरावे अशी तुझी इच्छा आहे ?
- हो आहे.
- अरे बापरे !
- असा दचकू नकोस. खरोखरच तशी माझी इच्छा आहे.
- प्रत्यक्ष आपल्या मुलाचा खून !
- खून ? तो कसा ?
- अरे, तर मूल मरावे, अशी इच्छा करणे, हा तरी एक खूनच आहे की ! इच्छेत काय किंवा कृतीत काय, एकच !
- काय वाटेल ते म्हण !
- पण तुला असे वाटते तरी का ?
- कारण - मी की नाही अगदी खचलो आहे... आणि त्या बिचार्‍याला मी कधी सुखाचे दिवस दाखवीन... असे मला काही...
- नको, रडू नकोस !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP