मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी| पुढे काय ? मी माझ्याशी निव्वळ भ्रांती गंमत हिशोब अंदरकी बात ही नोकरी आहे विश्वास मी आणि ही सबब एळकोट बारीकसारीक गोष्टीमधचे समर्थन मी कोण ? ही आपली खुशाल हसत आहे ताडी आठवण चोरायचा ? आणि तो कुणाचा ? भलता नाद पाखरे यूसलेस छे, व्यवहार ढोंगी जग सहज बोलणी अगत्य आपली किंमत मुद्दामच ! आपला मार्ग कीस न् कीस अमावस्या ‘ मिस्टिक ’ अनुभव जिवंत जोडपी धड निजूसुद्धा खरे कारण निनावी प्रत्यक्ष त्याच्या वडिलांना विचारले होते आपल्या नाडीचे ठोके टोचणी नको पण - तुलाच कमीपणा पुढे काय ? असे बोलवते तरी कसे ध्येयात्मक वाचन कोण बोलवते ? स्वतःबद्दल स्वतःची कविता बंडखोर पशू भाव महत्त्वाकांक्षेपायी पुढे काय ? नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे Tags : diwakarदिवाकरनाट्यछटामराठी पुढे काय ? Translation - भाषांतर - काही पुसू नकोस ! सात आठ वर्षांपूर्वी त्या... सरकारी कचेरीत होतो, तेव्हाही... असेच... अन् त्या शाळेतही कैक वेळा ?असेच ! सारखे तास अन् तास...विचार ! विचार ! अन् तोही पाठीमागचा... अन् पुढचा ! चालू गोष्टीबद्दल...सुखाची असली, तर ती ‘ चालली !... चालली ! ’ असे म्हणून घाबरायचे... !तीच दुःखाची असली तर ?त...र ‘ काय बोवा ? खरेच !! ’ असे म्हणत तिचा विसर पाडण्यासाठी धडपडायचे... !आणि मागच्याकडे धापा टाकीत जायचे ! पण तिथे काय ! ‘ अरेरे !... गेले !... पुनः नाही !! ’ असे तळमळत...‘ पुढे काय ?... पुढे काय ! ’ असे म्हणून लगेच डोके उकरायला लागायचे ! राम !... राम !...सदा ! पुढे काय ? ’ दहा वर्षांपूर्वीही तोच प्रश्न... चार वर्षांपूर्वीही तोच... अन् आजही तोच !! जन्मास येण्यापूर्वीही... ?तोच !अन् प्राण सोडण्यापूर्वी ?तोच !सरणात कवटी फुटली तरी... "‘ पुढे काय !! ’म्हणजे हे... !चालायचेच !... चालायचेच !... चालायचेच ! N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP