मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी|

निनावी

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


- फार छान अंक काढला आहे नाही ?
- चांगलाच आहे यात शंकाच नाही.
- या मासिकाचे नेहमीच अंक चांगले असतात. हा आपला एक स्पेशल आहे, ही गोष्ट सोडून द्या.
- यात काय संशय ! नाही तर तुमचे ते डफरू ‘ रंजन ’ !
- हं
- लिही त्याला लिही ! म्हणावे मासिक चालवायचे तर असे चालवावे ! नाहीतर तुमचे भिकार कुठले ! बंद करा म्हणावे !
- खरेच लिहू का ?
- खरेच लिही !
- पण... कशाला उगीच.
- नाही नाही, आजच्या आज लिहून टाक. पाहिजे तर खाली सही करू नकोस.
- नुसतेच ‘ आपला एक वर्गणीदार. ’
- हॉ हॉ असेच ! लिहून टाक आजच्या आज अगदी ! त्या साल्याची एकदा उडवायलाच पाहिजे ! फार माजला आहे !
- त्याला वाटते माझेच मासिक चांगले !
- नाहीतर काय ! माझ्या मनातून फार आहे की, ऐशी त्याची कोणीतरी उडवावी की, पार त्याचे मासिक बंदच पडले पाहिजे !
- वा ! काय पण बाळाची इच्छा !
- नाही खरेच !
- काय खरेच काय ! आपला मजकूर आताशा येत नाही की नाही म्हणूनच स्वारी इतकी खवळली आहे !
- नाही नाही, तसे नाही.
- तस्सेच आहे ! हः उगीच माझ्याशी लपवालपवी का ?

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP