मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी| कीस न् कीस मी माझ्याशी निव्वळ भ्रांती गंमत हिशोब अंदरकी बात ही नोकरी आहे विश्वास मी आणि ही सबब एळकोट बारीकसारीक गोष्टीमधचे समर्थन मी कोण ? ही आपली खुशाल हसत आहे ताडी आठवण चोरायचा ? आणि तो कुणाचा ? भलता नाद पाखरे यूसलेस छे, व्यवहार ढोंगी जग सहज बोलणी अगत्य आपली किंमत मुद्दामच ! आपला मार्ग कीस न् कीस अमावस्या ‘ मिस्टिक ’ अनुभव जिवंत जोडपी धड निजूसुद्धा खरे कारण निनावी प्रत्यक्ष त्याच्या वडिलांना विचारले होते आपल्या नाडीचे ठोके टोचणी नको पण - तुलाच कमीपणा पुढे काय ? असे बोलवते तरी कसे ध्येयात्मक वाचन कोण बोलवते ? स्वतःबद्दल स्वतःची कविता बंडखोर पशू भाव महत्त्वाकांक्षेपायी कीस न् कीस नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे. Tags : diwakarदिवाकरनाट्यछटामराठी कीस न् कीस Translation - भाषांतर - छानच उडवली पण त्याने आपली ?... नाही ?- अगदी सोळा आणे!- दुसर्याच्या बाबतीत नाक खुपसले म्हणजे हे असेच व्हायचे.- आधी त्याला विचारायचेच नाही. चुकलास तू.- पण आब केवढा आणला होता ! उलट त्याच्यावरच आपण गुरकावयाला लागलो.- हं पण ते काही साधले नाही.- साधेल कसे ? धडधडीत चूक जर आपली होती तर...- ‘ आपली ’ नाही, ‘ माझी ’ होती म्हण पाहिजे तर- बरे, माझी होती, मग तर झाले... आपण जर येवढे होता तर सुचवायचे होते आधी !- मी काय सुचविणार ?- की, ‘ बोबा चौकशी करू नकोस. उगीच फजिती होईल अशाने ! ’ येवढे सुचविले असते म्हणजे बस झाले असते !... आपण बसला स्वस्थ !- येः ! उलट माझ्यावरच...- तुझ्यावर नाही तर कोणावर ? तुला जे येवढे मी वरचेवर वरचेवर बजावत असतो, ते कशाकरता ?- काय, बजावीत काय असतोस ?- आणखी काय सांगायचे ? ‘ चुका व्हायची जेव्हा जेव्हा वेळ येईल, तेव्हा आपले बोवा आधी सुचवीत जा ’ असे नाही सांगत तुला ?- हो. सांगतोस, नाही कोण म्हणतो.- मग काही काही वेळेला असा मठ्ठासारखा बसतोस.- हें !- बरे, अक्कल नसते असे नाही. चूक झाली म्हणजे मग कळवायचे हा शहाणपणा कोठला ?- हे पहा, आता उगीच चिडवू नकोस. खरे सांगायचे, म्हणजे मलाच तुह्मी मधून मधून फजिती उडवावीशी वाटते.- ती काय म्हणून ?- तू माझ्या बारेकसारीक गोष्टी काढून वरचेवर माझे डोके उठवीत असतोस तेव्हा का नाही वाटणार मला ?...- अस्से !- म्हणून म्हणतो, माझ्या बारीकसारीक गोष्टींचा सारखा कीस न् कीस काढीत बसत जाऊ नको... ते चांगले आहे खरे. पण तितकेच ते उलट तापदायकही आहे ! N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP