मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी|
स्वतःबद्दल स्वतःची कविता

स्वतःबद्दल स्वतःची कविता

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


“ शास्त्रज्ञांच्या, तत्त्वज्ञांच्या पलीकडे संचार ! दिक्कालाने अप्रतिहत तो ज्याचा स्वैर विहार ” सत्यलोक, वा - अरे बापरे !
का रे दचकलास ?
खाली रस्त्यातून तर प्रेत चालले आहे !
मग असा लाजून दडतोस ?
नको बोवा ! प्रेत नेणारांपैकी जर कोणी मान वर करून सहज मजकडे पाहिले तर -
तर काय होईल ?
अगदी मेल्यापेक्षाही मेल्यासारखे होऊन जाईल. छेः खिडकीतून बाहेर तोंड काढायची काही छाती होत नाही आता आपली !
प्रेत किती नव्या तरण्या माणसाचे होते !
च्य् ! मी कविता म्हणताना खरेच कोणी ऐकले असेल का ?
हो, चांगली मोठ्याने तर म्हणत होतास.
खरेच ?... कसेसेच वाटते बोवा...

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP