मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी|

हिशोब

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


- चला थोडासा चहा पिऊ आता.
- कशाला उगीच ?
- चला रे !
- बरे तर चल, पण पैसा आहे का ?
- हो पैसा असेल तर काय झाले.
- आधी पहा बरे खिशात ?
- नाही बोवा, खिशात काही दिसत नाही.
- मग ?
- नसू दे नसला तर ! आईने मंडईला पैसे दिले आहेत ना ?
त्यातलाच एखादा काढू.
- ते कसे ?
- तुला काय करायचे आहे त्याच्याशी ? आपले तू माझे ऐक.
- पण हिशोब द्यावा लागेल ना ?
- ए: ! त्यात काय आहे एवढे ! चार पैशाचा कोबीचा कांदा
पाच पैशाला घेतला म्हणून सांगितले. अचरट !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.