मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी|
ध्येयात्मक वाचन

ध्येयात्मक वाचन

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


शाबास ! चांगला तो म्हणतो आहे की, मला याची काही तरी गोडी लावा, तर...
भलतेच एखादे !
भलतेच काय ?
अरे चांगला संसार करतो आहे, तो या फंदात कशाला ? भिकेचे डोहाळे उगीच !
ते कसे काय ?... शेक्सपिअर, ब्राऊनिंग वाचणे...
म्हणजे वाजवीपेक्षा फाजील जिवंत होणे आणि भीक मागणे ! छे छे छे ! काय बोलतोस...का...ही कळत नाही !
चांगला तो व्यवहारात गुरफटलेला आहे... समाधानात आहे हेच ठीक आहे ! ध्येयात्मक वाचनाचा हा नसता गांजा कशाला आणखी ?
‘ गांजा !! ’
अरे चाक लागायचा अवकाश !... पचनी पडता पडत नाही... अन् अशी खायखाय सुटते की... !
ब्रह्मांडाची !
‘ आपण जिवंत व्हावे, संसार जिवंत असावा, स्वदेश जिवंत असावा, सृष्टीने स्वर्ग - परमेस्वर व्हावे ’... सारखे...!
संपत म्हणून नाही !
हे खा, ते खा; ‘ जड-मिथ्या ’ म्हणून काही वाटतच नाही ! सारखी तळमळ आणि धावपळ !... बरे सदा बेपर्वाई नाही तर...
बेशुद्धी !
आणि इकडे नशिबाचा शेवटीवर वरचेवर पाय !
झालंच मग
ते लचके तोडतेच आहे, हा पळतोच आहे, लपतोच आहे !
अशी धावपळ आणि अशा यातना ! हू ! ...!!

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP