मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समग्र दिवाकर|मी माझ्याशी|
ही नोकरी आहे

ही नोकरी आहे

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे
‘ मी...माझ्याशी ‘ ही दिवाकरांनी लिहून ठेवलेली आत्मसंवाद मालिका आहे.


- हुश्श ! काय कडक ऊन लागत आहे नाही ?
- अजून तर काहीच नाही ! खरा उन्हाळा तर पुढेच....
- छे बुवा ! मी तर अगदी कंटाळून गेलो आहे.
- बाबारे, कंटाळून कसे चालेल ! हे आपले पोट आहे ना ?
चल लवकर.
- असे वाटते की, या झाडाखाली बसून अंमळ विसावा
घ्यावा, आणि मग....
- तर तर ! म्हणे मला विसावा घ्यावासा वाटतो ! हं, वेळ
झाली, उचल पाय लवकर ! येथे काही कविता ल्ह्यायच्या
नाहीत ! ही नोकरी आहे ! गरुड पक्ष्यावर आणि चंडोल
पक्ष्यावर कविता लिहितो ! नाही ! ही: ही: ही: कविराज !
चला लवकर !..... अस्से !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP