मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
एकत्रिंशोsध्याय:

एकत्रिंशोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


म्हणे  तं  द्रि सोडुनि ऐक । वाढे विंध व्यापी अर्क ।
तेव्हां जाती वृंदारक । काशीमध्यें तद्गुरुपाशीं ॥१॥
स्तवि  वा  क्पति अगस्त्यातें । लोपामुद्रा । स्वाध्वीतें ।
त्वत्सम नान्या पतिव्रते । पतिदेवते तूं धन्या ॥२॥
कदा  पि  न स्वतंत्रता । पतिसेवन निरता ।
छायेपरी पतिदेवता । पतिव्रता ती पतिचित्ता ॥३॥
जेवि  भुं  जीतां पति । पतिपूर्वीं स्नान करी ती ।
उठे आधीं निजे उपरांतीं । न बसे ती पतिपुढें ॥४॥
जी न  जा  य घराबाहेर । करी पत्युच्छिष्टाहार ।
पतिवचनीं जी सादर । निरंतर अनुकूल ॥५॥
जी आ  नं  दे दैवलाभें । वस्त्रभूषणीं न क्षोभे ।
धर्म सोदिता देहलोभें । ती शोभे निजधर्में ॥६॥
न घे  वा  र्ता श्रीमंताची । मर्यादा धरी वडिलांची ।
स्वातंत्र्यें ती व्रताची । आशा साची नच करी ॥७॥
देव  गु  रू सर्व पती । मानुनी वाद न करिती ।
पतिसवें ज्या भांडती । भालु होती भुंगती त्या ॥८॥
न को  णा  सीं भेद कीजे । धवा वंचुनी खाइजे ।
वृक्षीं लोंबे वागुळी जे । खायी निजमळमूत्र ॥९॥
धर्मा  न्वि  त राहतां । दैवें पति मरतां ।
सवें जाय पतिव्रता । न वियुक्ता छायेपरी ॥१०॥
इतिश्री० प० वा० स० वि० सारे पतिव्रताधर्मनिरूपणं नाम एकत्रिंशो ॥३१॥ग्रं० सं०॥३५९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP