मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
षड्विंशोsध्याय:

षड्विंशोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


वेद  के  वळ म्हणावया । हो सायास ऋषिवर्या ।
कलियुगीं अल्पायुष्यां । केवीं आम्नायातीं गती ॥१॥
चिरं  जी  व भरद्वाज । ब्रह्मा पुसे वेदगुज ।
तीन राशी दावी अज । ऋषी लाजला तेधवा ॥२॥
दे दे  व  मुष्टी तीन । न तया आले अजून ।
हे अनंत वेद जाण । विभागून ठेविले तूर्त ॥३॥
विष्णु  भू  तळीं व्यासरूपी । चौशिष्यां चार निरूपी ।
वेदशाखा विभागरूपी । पैला निरूपी ऋग्वेद ॥४॥
शुद्धां  त:  करणें पैला । ऐक सांगों ऋग्वेदाला ।
द्यरत्निमात्र रूप त्याला । व्यक्तगळा दीर्घदृष्टी ॥५॥
रवि  स  मान कांति ज्यांची । अत्रिगोत्र देवता ज्याची ।
ब्रह्मा गायत्री छंदची । आयुर्वेदचि उपवेद ॥६॥
शाखा  ना  में भेद पांच । सहा अंगें ब्राह्मणच ।
अरणेंशीं हो वेदच । पैलासच व्यास सांगे ॥७॥
शिष्य  त  याचा दुसरा । वैशंपायन नामें बरा ।
तया यजुर्वेद दुसरा । सांगे बरा विभागून ॥८॥
सुम  न:   प्रीती जो यजनें । करी पंचारत्नी मानें ।
भारद्वाज गोत्र जाणें । कृशपणें त्रिष्टुप्छंद ॥९॥
दैव  म  हा विष्णु ज्याचें । उपवेद धनु ज्याचें ।
सूर्याभ जो भेद त्याचे । जाण साचे श्याऐशींच ॥१०॥
सुम  न:  प्रीती दे स्तवनें । सामवेद अभिधानें ।
षडरत्निमितमानें । जैमिनीनें घेतला हा ॥११॥
विशे  ष  हा शांत दांत । असे चर्मदंडहस्त ।
गोत्र काश्यप दैवत । रुद्रख्यात जगतीछंद ॥१२॥
जो ओ  ष्ठा  रक्त असे । याच्या भेदां भिती नसे ।
ज्याचा उपवेद असे । गंधर्व असें सांगे व्यास ॥१३॥
भुव  नीं  सांग भेद याचे । कोण बोलेल वाचे ।
सांगोपांग वदतां वांचे । शेषाचेही ये शीण ॥१४॥
अतीं  द्रि  य ज्ञाता व्यास । ऐक म्हणे सुमंतूस ।
सांगे अथर्ववेदास । हो देवेश देव त्याचा ॥१५॥
असे  या  चा उपवेद । अस्त्र वेद तिसरा छंद ।
गोत्र बैजान स्वछंद । नऊ भेद कल्प पांच ॥१६॥
हे को  णि  चारही पूर्ण । एवढे न जाणिले जाण ।
एक शाखा ही अपूर्ण । तुम्हीं पढून सर्वज्ष कीं ॥१७॥
जे वि  प्र  धर्मयुक्त । विष्णु मानी त्यां दैवत ।
वेदबळें हस्तगत । तयां होत देवादिक ॥१८॥
जे स्व  कृ  त्या सोडुनी देती । म्लेच्छापुढें वेद पढती ।
ब्राह्मणातें जिंकिती । ते होती ब्रह्मराक्षस ॥१९॥
वद  ति  असें गुरु तरी । ते म्हणती वाद करीं ।
जयपत्र द्या नातरीं । आमुची थोरवी न राहे ॥२०॥
इतिश्री० प० वा० स० वि० चतुर्वेदकथनं नाम षड्विंशो० ॥२६॥ग्रं०॥२७५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP