मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
पंचाशत्तमोsध्याय:

पंचाशत्तमोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


ज्या दे  ति  श्रीपाद वर । तो रजक जन्मांतर ।
करी हो म्लेंछ राजा शूर । धर्मावर मन ज्याचें ॥१॥
त्याचे  पु  रोहित म्हणती । हिंदु पाषाण पूजिती ।
भू गो जला देव म्हणती । ती दुर्मति न वंदावे ॥२॥
राजा  रु  सोनि बोलत । सत्य असे त्याचें मत ।
जे द्वेषिती तयांप्रत । मी प्राणान्त दंड करीन ॥३॥
द्या द्वे  षो  क्ति सोडुन । असें तयां कथीं ज्ञान ।
मांडीवर फोड होवून । तो पीडून राहें दैवें ॥४॥
त्या उ  त्त  म लेप करिती । परी त्याची नोहे शांति ।
राजा पुसे द्विजाप्रति । तो एकांतीं सांगूं म्हणे ॥५॥
राजा  मं  त्र्यांदिका त्यजून । एकलाची करी गमन ।
पापनाशतीर्थीं येऊन । पुसे वंदून तया विप्रा ॥६॥
आश्वा  स  न देयी द्विज । म्हणे सत्पुरुषासी भज ।
भवरोग हो निर्बीज । भय तुज कायसें ह्याचें ॥७॥
एक  स  र्वकर्महीन । उज्जनींत होता जाण ।
द्विज वेश्येसीं रमून । तद्गृहीं ये ऋषभयोगी ॥८॥
तत्पू  र्व  पुण्य उदेलें । म्हणोनि मुनि भेटले ।
दोघांनीं त्या पूजिलें । सेवियलें अहोरात्र ॥९॥
त्या से  वि  ल्या पुण्यानें । राजकुळीं जन्म घेणें ।
घडलें तयापरी भोगणें । आलें उणें जें स्वकर्म ॥१०॥
जो स  द्भ  क्त हो सकाम । त्या ये श्रीमत्कुळीं जन्म ।
मुत्की घेयी जो निष्कांम । सत्समागम व्यर्थ नोहे ॥११॥
द्विजा  ज  न्म दशार्णदेशीं । वज्रबाहुराजवंशीं ।
ज्येष्ठराणीच्या ये कुशीं । तें सवतीसी न रुचलें ॥१२॥
यत्नें  ति  णें गर्भिणीतें सर्पगरळ दिलें होतें ।
भेदलें परी न प्राणातें । हरि, तीतें देव राखी ॥१३॥
तिचें  मां  स रक्त बिघडे । तिला बहु कष्ट घडे ।
पुत्रा प्रसवली पुढें । व्रण पीडे उभयतां ॥१४॥
झाले  स  र्वोपाय अपाय । तयां आरोग्य न होय ।
एके दिनीं तयां राय । विजनारण्यदेशीं टाकी ॥१५॥
ती पू  र्व  कर्म स्मरून । बाळा कडेवर घेऊन ।
वनीं करी आक्रंदन । तों गोधन पुढें देखे ॥१६॥
राज  भा  मिनी गोपतीतें । पुसोनी ये नगरातें ।
वणिक्पती राखी तीतें । व्रणकष्टें पुत्र मेला ॥१७॥
तों दै  वे ऋषभयोगी । ती रडतां आला वेगीं ।
तिला म्हणे राहें उगी । शोक त्यागीं विवेकानें ॥१८॥
सांगो  न  सदुपदेश । स्मरे पूर्वोपकारास ।
जीववी तो त्या सुतास । त्या दोघांस दे आरोग्य ॥१९॥
असा  भा  ग्यें सत्पुरुष । भेटे, तरी जायी दोष ।
राजा पुसे सत्पुरुष । असे दोषहर कोठें ॥२०॥
भूसु  र  म्हणे भूपाप्रती । भीमातीरीं असे यती ।
नामें नृसिंहसरस्वती । तयाप्रति जा भेटाया ॥२१॥
राजा  त  थास्तु म्हणून । तया विप्रा सत्कारून ।
चतुरंग दळ घेऊन । भाव धरून पातला ॥२२॥
तो पा  इ  क दूरी करून । पायीं चालत येऊन ।
संगमीं देवा पाहून । करी नमन एकभावें ॥२३॥
म्हण  ति  श्रीगुरू रजका । कोठें वससी येसी न कां ।
भेटावया रे भाविका । तें ऐकुनी तो हो ज्ञानी ॥२४॥
निज  गु  ज प्राग्जन्मीचें । आठवी रूप श्रीपादाचें ।
त्या वळखूनी मृदु वाचें । करि त्यांचें तो स्तवन ॥२५॥
कां बा  ह्य  विषयाब्धींत । लोटिसी तूं कृपावंत ।
आतां धरी माझा हात । वरी त्वरीत काढी मज ॥२६॥
तूं हा  त  माझा धरितां । मी येईन हो वरता ।
मांडीवर फोड होतां । त्या निमित्तानें ही भेट ॥२७॥
माझा  मं  गळ हो भाव । गुरू म्हणे फोडा दाखिव ।
थेरू मांडी पाहे तंव । स्फोटकाभाव झालाची ॥२८॥
म्हणे  शा  बास हे भेट । माझा गमविला स्फोट ।
म्हणे नेणें मी हें कूट । द्यावी भेट हा तव हेतू ॥२९॥
मी शा  स्त्र  बाह्य जरी । गोहत्यादिक न करीं ।
म्हणे माझी पहा पुरी । नमस्कारी वारंवार ॥३०॥
तो अ  मि  त सेना दावी । तयां पालखींत बैसवी ।
स्वयें पायीं चाले पदवी । गुरु बैसवी यानीं तया ॥३१॥
पुढें  द  र्शन घे म्हणून । पापनाशतीर्थी येऊन ।
राहे गुरू त्या प्रार्थून । नागनाथ घरी नेयी ॥३२॥
गुरू  मु  ख्य शिष्यांसहित । जेवूनियां तीर्थीं येत ।
तो राजा त्या नगरांत । ने वाजत गाजत गात ॥३३॥
विवि  क्त  दृष्टि भगवान् । जाती पुरीं भक्ताधीन ।
दावी सर्वां भेटवोन । प्रीती करून निजैश्वर्या ॥३४॥
ती ग  म्म  त न बोलवे । महोत्सव केला रावें ।
आतां पाददास्य द्यावें । म्हणूनी भावें प्रार्थी भूप ॥३५॥
तन  या  राज्य देऊन । तूं श्रीशैलावर येऊन ।
घेयीं माझें दर्शन । राव ज्ञान असो म्हणे ॥३६॥
पदीं  न  म्र झाला राव । आश्वासून गुरुराव ।
गाणगापुरीं पुन: ठाव । घेयी देव भक्ताधीन ॥३७॥
तें अ  घ  हारै दर्शन । होतां जनही हर्षून ।
सर्व करिती नीरांजन । गुरुस्तवनपूर्वक ते ॥३८॥
इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे यवनोद्धरणं नाम पंचाशत्तमो० ॥५०॥ग्रं० सं०॥६९२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP