TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार|
षोडशोsध्याय:

षोडशोsध्याय:

श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य


षोडशोsध्याय:
तो म  हा  त्मा लोटुनी शिष्यां । स्वयें कोठें राहोनियां ।
काय करी असे तया । विप्रें पुसतां सिद्ध सांगे ॥१॥
सवें  जि  तात्मा मी एक । वैजनाथीं गुरुनायक ।
असतां विप्र आला एक । सांगें दु:ख गुरुनें दिल्हें ॥२॥
गुरू  त  या  धिक्कारून । म्हणती तूं रे जा येथोन ।
येरु धरूनियां चरण । गुरुसेवन सांगा म्हणे ॥३॥
गुरु  सं  तोषें बोलती । ब्रह्मविष्णूशिवमूर्ति ।
गुरु ब्रह्म साक्षात् म्हणती । भक्तां देती ते सर्वार्थ ॥४॥
सेवा  ग  हन वाटे तरी । गुरु आपुल्या शिष्या तारी ।
कथा झालेले हे द्वापारीं । अवधारीं मी सांगतों ॥५॥
धौम्य  दो  षज्ञ गुरु भला । तिघे शिष्य होते त्याला ।
कठिण सेवा सांगे त्यांला । न वेदांसी सांगे पूर्वी ॥६॥
विशे  षा  र्थ न सांगती । हृच्छुघ्यर्थ सेवा घेती ।
वळखूनी प्रसन्न होती । रहाटी ऐसी गुरूची हे ॥७॥
घौम्य  अ  शा रीतीं शिष्या । अरुणा म्हणे शेतीं तोया ।
न्हेयी म्हणतां तो न्हें तोया । तें न जाय शेताकडे ॥८॥
मनीं  ध्या  यी गुरुपद । जलामध्यें पडे सानंद ।
जळ क्षेत्रीं ये स्वच्छंद । गुरु प्रसाद करी तेव्हां ॥९॥
अध्या  त्म  ज्ञानी तो झाला । तया गेहा पाठविला ।
धौम्य सांगे बैदाला । ह्या शेताला यत्नें राखीं ॥१०॥
राखो  नि  तो मळी धान । गुरुला तें दे सांगून ।
गाडा रेडा एक देऊन । म्हणे आण धान्य घरीं ॥११॥
गाडा  त्या  धान्यें भरून । आणितां पंकी तो गढून ।
गेला तंव गुरु येवून । त्या काढून प्रसन्न हो ॥१२॥
सर्व  वि  द्या आल्या त्याला । तया गेहीं पाठविला ।
गुरु म्हणे उपमन्यूला । तूं धेनूला वनीं चारीं ॥१३॥
नेवो  नि  तो गुरें रानीं । चरवी तेथें भिक्षा करूनी ।
गुरु मागए तें जाणुनी । भिक्षा आणुनि दे ती मला ॥१४॥
द्विरा  वृ  त्ती भिक्षा करी । शिष्य एक देई घरीं ।
तें जाणुनी गुरु दुसरी । भिक्शा घरीं देईं म्हणे ॥१५॥
दुश्चि  त्त  तो नच होई । दोनी भिक्षा घरीं देई ।
वत्सोच्छिष्टपय घेई । गुरुमायी वारी तया ॥१६॥
तो अर्  का  चें क्षीर पीतां । होई अंध कूपीं पडतां ।
कृपा आली गुरुनाथा । दृष्टी देता झाला मंत्रें ॥१७॥
सत्का  मा:  फलंतु ते । असें म्हणुनि धाडी त्यातें ।
तो हो कृतार्थ कीर्तीतें । तच्छिष्यें मिरविली ॥१८॥
जग  द्वं  द्य शिष्य झाला । सतक्षकेंद्र पाडिला ।
गुरुतोषाची ही कला । जा तूं गुरुला पुन: सेवीं ॥१९॥
तो  त  द्वै  रें अनुतापला । मग तारिती गुरु त्याला ।
आले भिल्लवाडीला । वास केला चार मास ॥२०॥
इतिश्री० प० प० वा० गु० सारे शिश्यत्रयाख्यानं नाम षोडशो० ॥१६॥ग्रं० सं०॥१९६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-05-21T02:26:00.7670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

जरणी

  • स्त्री. एक औषधी वनस्पति . 
RANDOM WORD

Did you know?

मृत व्यक्तिचे वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या दिवशी संस्कार कसे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.