मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता|
काय हो चमत्कार !

प्रकाशित कविता - काय हो चमत्कार !

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[वृत्त मृदङग]

कोठून ये मधुसुगन्ध असा मनोहर
आम्रावरील झडला जर सर्व मोहर ?

आहेत ते धवळले कडुनिम्ब मोहरें,
येती फुलूनि सुरऊ मधुगन्ध तो बरें.

का ये शिरीष अजुनी मग पालवीस न ?
निष्पर्ण हा अजि दिसे किति दीन भीषण !

दावी परी पळस तो मधुरङग केशरी
की प्रेमरङ्ग खुलवी न जया दिसे सरी.

या सान्ध्यवायु - लहरी गमतात शीतल,
स्पर्शूनि या निववितात अता महीतल,

या घालवूं न शकती हुरहूर दूर का ?
वाटे विलक्षण जिवास असें चुकूर का ?

‘कूऊ’ प्रबोधक मधुस्वर का न तो कुठे ?
आला वसन्त, कविकोकिल हाय तो कुठे ?

१९ मार्च १९३७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP