मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता|
माझी सानुली

प्रकाशित कविता - माझी सानुली

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[छन्द प्रसाद]

पोर ही सानुली
की सोन्याची बाहुली
देव हिच्यावर ठेवो मायेची साउली. १

सुन्दर हसते,
नि मोहक रुसते,
ठेपराआने ही कशी चालते बसते ! २

बोबडें बोलते
नि हृदय खोलते
मन माझें बोबडया या बोलांनी डोलतें. ३

साधेच कपडे
ही घालुनी बागडे;
गौरीहून ज्याला त्याला कशी ही आवडे. ४

या हो या पाहुणे
या नवे या, या जुने.
भण्डार्‍याचा प्रसाद घ्या, काहीही न अणें ५

२२ ऑगस्ट १९३६

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP