TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता|
चित्रांचा रङगविलास

प्रकाशित कविता - चित्रांचा रङगविलास

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


चित्रांचा रङगविलास
[जाति अचलगति]

चित्रांचा हा सायडकाळ,
चित्रविचित्र पहा आभाळ,

रौप्य गिरीचा नभीं प्रसार,
खोरें वृक्षश्यामल फार,

क्षितिजीं कोठे दिसतो दूर
औलटा जणु ओघळतो धूर

नभोगिरीला तोण्ड पडून
कुठे रुपेरी वरसे अन.

चैतन्य पहा हें अनिवार
तळपे हिरवें गार शिवार.

घेती कणसें तेज पिऊन,
व्हाया पिवळीं सोन्याहून/

कारळिच्या पुष्पांत सवङग
होऊ सोन्याचा हा रङग

निम्नोन्नत हा कृष्णाकाठ
शरद्दतूचा दावी थाट.

मेघांचे हे चञ्चल रङग.
बघुनि गिरीसहि सुचती ढङग.

मेघांच्या पडछाया देख
गिरिदेहीं पडतात सुरेख,

डोङगर करडे वृक्षविहीन
डोङगर नील नभांत विलीन.

पालटती सरडयपरि रङग,
पाहुनि होऊ मानस दङग.

अस्तगिरीच्या भवती गोल
अडती रङगाचे कल्लोल -

निळे, जाम्भळे, काळे रङग,
राखी, ताम्बुस, पीत, पिशङग;

रुपें कुठे कोठे भिङगार
भूवर पाचू हिरवी गार.

सृष्टि रवीसह खेळे रङग
क्षणभरि सङगामधि निस्सङग !

जाय रङगुनी रवि अस्तास
रङगें भरुनी भू - आकाश.

रङग लुटा या रानोमाळ
चित्रांचा हा सायङकाळ.

२२ ऑक्टोबर १९३५

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:19.9200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शिपणी

  • स्त्री. सेक ; सिंचन ; प्रोक्षण ; सडा ; शिंपणें . ( क्रि० करणें ; टाकणें ; शिंपणें ). शिंपणें , शिपणें - क्रि . १ सिंचणें ; वर उडविणें ; सडा टाकणें ; प्रोक्षण करणें ; सिंचन करून ओलें करणें ; अभिषिक्त करणें . इथें वड शिंपीजे । - वसा ६० . शिपणें , शिंपणें - न . १ रंगपंचमीस किंवा शिमग्याच्या समाप्तीस अंगावर रंग उडवितात तें ; रंग उडविण्याचा खेळ . २ रंगपंचमी . शिंपण्या दिवशीं हल्ला नेमिली कुंप झाले तयार । - ऐपो ३५२ ३ ( कों . ) दांडयांतून पाणी वाहून नेऊन तें झाडांस देण्याची रीत . शिंपणपंचमी , शिंपणेंपंचमी - स्त्री . रंगपंचमी . शिपणीचा ऊस - पु . पाटाच्या पाण्यावर होणारा ऊंस . याच्या उलट - पुरणीचा ऊस . 
RANDOM WORD

Did you know?

जर सर्व प्राण्य़ांचा आत्मा एकच असेल तर प्राणी पक्ष्यांची भुते होतात काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.