TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता|
देवाची समाधि १

प्रकाशित कविता - देवाची समाधि १

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


देवाची समाधि १
विटेवर अभा अठ्ठावीस युगें, होऊ तें तं बघे पाण्डुरङग,
जाणून नेणता नाना पूजाभोगीं, राहे ज्ञानयोगीं अदासीन,
डोळ्याचें पातेंही याच्या नव लवे. कोठून कालवे मग पोटीं
जात्यांत घालूनी भरडो अविन्ध, आनन्दी आनन्द निर्वाणींचा !
ब्रम्हानन्दीं अशी लागलिया टाळी, देहातें साम्भाळी कोण बरें ?
भक्त - योगक्षेम मग कोण पाहे ? हात कटीला हे चिकटले.
सोडिलें त्रैलोक्यराज्यसत्तालोभा, केली दिव्य शोभा आपुलीच.
ज्ञानराजावीण कोण अशी साधी, जिवन्त समाधि चिरन्तन ?

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:20.2030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

equivalent deviate

  • समतुल्य विचल 
RANDOM WORD

Did you know?

shatshastra konati?
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.