मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता| रक्षिल कोण ? प्रकाशित संग्रहीत कविता दुबळ्यांचा संसार फोल समाधान रक्षिल कोण ? रक्षिल कोण ? अतर्क्य प्रेम देव्हारे ताजमहाल सुखरूप आहे ना ग ? सुखरूप आहे ना ग ? कोण्डमारा फटकळ अभङग १ फटकळ अभङग २ फटकळ अभङग ३ फटकळ अभङग ४ फटकळ अभङग ५ फटकळ अभङग ६ अवेळीं ओरडणार्या कोकिळास बाळाचें आजोळीं जाणें चित्रांचा रङगविलास मूक झुरणी जबला रमणी पश्चिमेच्या मारुताचे उच्छवास दुक्खान्तीं दुक्ख देवाची समाधि १ देवाची समाधि २ देवाची समाधि ३ देवाची समाधि ४ देवाची समाधि ५ माझी सानुली श्रावणांतलें ऊन काय हो चमत्कार ! साशीर्वाद निरोप सिंहाचा पाडाव रामद्वारीं दिपावली काही कणिका ऐक चान्दणी रात्र सामुदायिक प्रार्थना प्रकाशित कविता - रक्षिल कोण ? डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन दुबळयांचा न्याय Translation - भाषांतर [जाति पञ्चकल्याणी]होऊ खेडयांतुनि बोभाटा,सर्जेराव मारितो वाटा,बन्दूक बाळगी, काडतुसांचा साठा. १कोणी बेरड हा न अडाणीयाचा वेष फाकडयावाणी.तोण्डावर खेळे किती शहरचें पाणी. २त्याला भीत सर्वही कां कीपटका, कोट, चोळणा खाकी,ऐटीने नियमितपणें पाऊलें टाकीं. ३लागे कुणी न त्या साङगातीजाऊनि तडक गुन्हाळें गाठीपैक्याच्या साठी करी कडक दमदाटी ४भरती हाट न आठवयाचेबसती बैल घरीं छकडयाचेदुर्दैव सदाचें या कष्टाळु गडयांचें ! ५वार्ता जाय मुख्य नगराला,चर्चाविषय नवीन जहाला.स्वस्थताच अजुनी, की पेठेंत न घाला. ६चाले राऊळांत जयघोषपोचे आंत न तो आक्रोशजरि शेतकर्यांच्या पडे घशाला शोष. ७अमुचे नि:शस्त्रांचे राजेय़ांचें वैभव काय विराजे !आसेतुहिमाचल यांचा महिमा गाजे. ८म्हणती शेषशायि भगवन्तन करी कलिकलहाची खन्तजो दुर्बल जन विश्वसे तयाचा अन्त ! ९येतां दुष्ट लहर माजाची सर्जेराव सतींना जाची;अबलाच कामनापूर्ति जगीं प्रबलांची ! १०घेतां लज्जा अशि लक्ष्मींची दीनहि कुठवर करितिल चीची ?गररक्त उसळतें. ऐकवे न ती छीछी ! ११मारूं अथवा मरुनी जाऊं,आला तोहि कुठून लढाऊ ?ही धार विळ्याची बन्दुकीस त्या दावूं १२पडला ऐक गडी घायाळ,अठला तोच दूसरा काळ.घालुनी पेच मोडिला हात तत्काळ. १३आता हाड हाड मोडा रे !मागुनी जिवानिशी सोडा रे,अन खेडयापाडयांतुनी यास ओढा रे. १४परि ही चीड ओसरुनि जातांहोतिल झणि मेण्ढयापरि आतासोसाया पुनरपि कष्टुनि नमवुनि माथा. १५७ मार्च १९३५ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP