मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता| अतर्क्य प्रेम प्रकाशित संग्रहीत कविता दुबळ्यांचा संसार फोल समाधान रक्षिल कोण ? रक्षिल कोण ? अतर्क्य प्रेम देव्हारे ताजमहाल सुखरूप आहे ना ग ? सुखरूप आहे ना ग ? कोण्डमारा फटकळ अभङग १ फटकळ अभङग २ फटकळ अभङग ३ फटकळ अभङग ४ फटकळ अभङग ५ फटकळ अभङग ६ अवेळीं ओरडणार्या कोकिळास बाळाचें आजोळीं जाणें चित्रांचा रङगविलास मूक झुरणी जबला रमणी पश्चिमेच्या मारुताचे उच्छवास दुक्खान्तीं दुक्ख देवाची समाधि १ देवाची समाधि २ देवाची समाधि ३ देवाची समाधि ४ देवाची समाधि ५ माझी सानुली श्रावणांतलें ऊन काय हो चमत्कार ! साशीर्वाद निरोप सिंहाचा पाडाव रामद्वारीं दिपावली काही कणिका ऐक चान्दणी रात्र सामुदायिक प्रार्थना प्रकाशित कविता - अतर्क्य प्रेम डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन अतर्क्य प्रेम Translation - भाषांतर [वृत्त मन्दाकिनी]माझ्याकडे हे पाहती की हा कसा आला ऊथे,आनन्दही चर्या कशी याची खुलूनी दाविते,बोलावणें गेलें तरी नि:सत्त्व शिष्टाचार हा -भोळाच किंवा धूर्त ये घेऊनि तो आधार हा,अन सारिलें प्रेमासवें याला अधिक्षेपें दुरी,का स्वाभिमानाची छटा नाहीच ती याचे ऊरीं,का ये करुनी घ्यावया वाया स्वत:ची वञ्चना -स्वानन्दमग्ना मङगला याच्याकडे पाहीच ना,माला तिच्या कण्ठीं पडे बोचे कसा काटा न या, आशीर्वचांच्या वादळीं का ग्रासिती लाटा न या,सामान्य लोकद्दष्टिचे हे प्रश्न सारे पाहतोअन गुङगुनी या मङगलीं कौतूहलें मी राहतोंअन्याय तू केलास तो होता किती मोठा तरीत्याहून मोठें प्रेम हें आहे भरूनी अन्तरीं.तूतें करावें अडिकता प्रेमीं न माझ्या हेतु हा -सेवा तुझी माझ्या करें होवो अशी होती स्पृहा. तूतें नको सेवा, बरें ! मी ठेवितों ती दक्षता -ऊत्कर्षकालींही तुझ्या टाकूं नको का अक्षता !२३ एप्रिल १९३५ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP