TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|प्रकाशित संग्रहीत कविता|
देवाची समाधि ५

प्रकाशित कविता - देवाची समाधि ५

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


देवाची समाधि ५
देवा तुझ्यावरी माझा भक्तिभाव, घेतसे अठाव म्हणूनीच.
सम्राट विश्वम्भर रङकांचा किङकर, संन्यासी शङकर स्मशानींचा.
न लगे बळाने आणावया ओठीं, राजनिष्ठा खोटी कशीतरी.
न ये अपयोगीं येथे हांजी हांजी, कर्मदशा गाञ्जी ज्याची त्याला.
न तो अपकार लाभल्यास फळ, श्रेय तें केवळ ज्याचें त्याचें.
असून नसल्यासारखा आश्वर, घ्येयरूपधर स्फूर्तिदाता.
जेथे जातों तेथे तो माझा साङगाती, न धरीच हातीं. चाल म्हणे,
तो न पण्ढरींचा, तो न अम्बरींचा, धनी अन्तरींचा सर्वत्र तो.
३० जून १९३६


Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:50:20.4530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

डग्गा

  • पु. बाह्या ; तांबे , पितळ , खापर यांचे डेरेदार भांडे घेऊन त्यावर तबल्याप्रमाणे कातडी तोंड मढवून केलेले वाद्य ; तबल्याची शाई मधोमध असते व याची एका बाजूस असते . [ ध्व . सं . ढक्का ] 
RANDOM WORD

Did you know?

आत्म्याची किती आणि कोणती रूपे मानली गेली आहेत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.