मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|यशवंतराय महाकाव्य| सर्ग एकविसावा यशवंतराय महाकाव्य अनुक्रमणिका सर्ग पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चवथा सर्ग पाचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सर्ग आठवा सर्ग नववा सर्ग दहावा सर्ग अकरावा सर्ग बारावा सर्ग तेरावा सर्ग चौदावा सर्ग पंधरावा सर्ग सोळावा सर्ग सतरावा सर्ग अठरावा सर्ग एकोणिसावा सर्ग विसावा सर्ग एकविसावा सर्ग बाविसावा सर्ग तेविसावा सर्ग चोविसावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग एकविसावा श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले. Tags : marathiyashawantraiकाव्यमराठीमहाकाव्ययशवंतराय सर्ग एकविसावा Translation - भाषांतर मल्हारराव आनंदरावानें सांगितलेल्या वृत्तांताबद्दल खात्री करून घेतो - यशवंतरावाच्या पायांतील बेडी तोडून त्यास मल्हारराव होळकराकडे नेतात - तेथें मल्हारराव होळकराचे व आनंदराव डफळे ( वैराग्याचा वेष घेतलेला ) याचें आपल्याशीं खरें नातें काय आहे हें यशवंतरावास कळतें - हें वर्तमान ऐकून यशवंतरायाची झालेली स्थिति - मल्हाररावाचें प्रेमळ भाषण - मल्हारराव, आनंदराव व यशवंतराव हे कमलेस भेटण्याकरितां कोटाशहरांत जाण्यास निघतात.श्लोक असें आनंदाचें वचन परिसोनी प्रियकर ।अकस्मान्मल्हारी चकित उठला तो झडकर ॥तटस्थ स्वस्थानीं क्षणभरि महावीर बसला ।स्थिती त्याची झाली कवण कवि वर्णील तिजला ? ॥१॥उभा राहे तेथें जणु अचल पाषाणच असे ! ।स्थिती शोभा - स्थानीं वदनिं हृदयींची दिसतसे ॥महाहर्षें नेत्रें टवटवित मुद्राहि दिसती ।तदा आश्चर्यानें निरखि डफळ्यातें क्षण कृती ॥२॥म्हणे “ हे आनंदा सुचरित सख्या ! पुष्पपुरुषा ! ।पहासी तूं आजी मजसिं ठकवाया तरि कसा ? ॥असंभाव्या गोष्टी घडतिल मला हें कळविसी ।मम स्वांता रक्षूं व्यसनिं यशवंता वळविसी ? ॥३॥अगाधा ज्या लीला असति अथवा कीं प्रभुचिया ।शके अल्पज्ञानें न नर समजूं पामर तयां ॥न जाणो तूं होसी अमृत - घनसा वत्सल महा ।हरीच्या संकेतें करिसि गमना या स्थळिं पहा ॥४॥जनांतें कोत्याच्या त्रसित यवनांच्या कर - तळीं ।बघे यत्नें नूत्नें झठुनि जपुनी सोडवुं बळी ॥म्हणोनी ते गाती निशिदिन जयाचें सुचरित ।असे कीं तो माझा सुमति मुलगा ? सांग खचित ॥५॥जयाच्या शौर्याचें स्तवन करणें प्राप्त मजला ।स्व - राज्याच्या पाया निज नगरिं जो घालुं सजला ॥प्रतापी ही म्याले थरथर सदा मोंगल जया ।असे कीं तो माझा सुत बहुगुणी ? सांग सखया ! ॥६॥बळाचा शौर्याचा निधि विदित तो बादल मला ।असा ज्या वीरानें झगडुन रणीं भिल्ल वधिला ॥जयाच्या हातानें कुमति खळ तो दिल्लिर मरे ।असे कीं तो गाजी ममसुत ? सख्या सांगसि खरें ? ॥७॥कसा नाचे झेंडा सतत भगवा भूपति - शिरीं ।प्रचंडें स्वारांची प्रबळ पथकें ठेविं पदरीं ॥असे जिंकूं आम्ही परि न शकलों तीन महिने ।जया, कीं तो माझा प्रिय सुत असे ? सत्य कथणें ॥८॥जया माझे स्नेही प्रबळ हटवूं नित्य झटले ।न शौर्यानें कोटा झगडुन तयांला परि मिळे ॥मराठे लोकांचे सकल करिता यत्न विफळ ।असे कीं तो माझा तनुज यशवंत श्रुत - बल ? ” ॥९॥असे नाना प्रश्न प्रथम करि मल्हार डफळ्या ।तयाच्या हर्षाच्या हृदयिं उठती थोर उकळ्या ॥महौत्सुक्यें तेव्हां झटपट पदें टाकित फिरे ।निराशा शंका ही पुनरपि मनीं येउन भरे ॥१०॥वदे तों आनंद स्व - जन - गण - संताप हरिता ।खरें जें मी पूर्वीं तुजसिं वदलों तें जन - मता ! ॥असा हा सोन्याच अदिवस बघतों धन्य सखया ! ।प्रसादें ईशाच्या; म्हणून सदया आठविं तया ॥११॥असे येथें देवालय जवळ कोसांवर दहा ।सकाळीं मी तेथें करित बसलों पूजन पहा ॥तिथें येतां कोणी तरुण पुरूषाला बघितलें ।मना माझ्या त्याचेम अनुपम असें रूप गमलें ॥१२॥स्थिती रीती त्याची बघुन गति ही वेष वचन ।गमे मोठा कोणी तरि व्यसनिं हा मग्न सुजन ॥सभोंते राहोनी सततच त्तथा भिल्ल जपती ।बिड्या हातीं पायीं जड बहुत ही त्यास असती ॥१३॥स्वभावें ती त्याची स्थिति बघुन आला कळवळा ।पुढें त्यातें याया जवळ कर - संकेत दिधला ॥विचारीलें ‘ सुज्ञा ! तव तनु कशी बंदिंत पडे ? ।पिता आई कोठें असति ? तव कोठें जनि घडे ? ’ ॥१४॥मला आलें तेव्हां कळुन सुख झालें अतिशय ।कृपा - वृष्टी माझ्यावरि करि कसा श्रीश सदय ? ॥गुणी कन्या माझी स्थळिं कवण राहे मज कळे ।तिच्या पुत्रा दुःखी बघुन मन भारी कळवळे ॥१५॥तुझ्या हातीं त्यांचे मरण जगणें राहत असें ।कळे तेव्हां माझें स्थितिवर कसें चित्त निवसे ? ॥तया ‘ भीती सोडीं ’ म्हणुन मग आश्वासन - पर ।सुखाचें बोलोनी वचन उठवीलें झडकर ॥१६॥तुझा माझा होता बहुत दिवस स्नेह बरवा ।भरे तेणें चित्तीं ह्मणुन मग उत्साह हि नवा ॥प्रयन्तें रक्षावा तनुज कमलेचा म्हणुनियां ।तुला आलों प्रार्थूं प्रथम कथिलें तें च सदया ! ॥१७॥असे एकाएकीं सुखद नव वृत्तांत कळती ।जणो कीं हीं स्वप्नें सुखवुन मनाला फसविती ॥असो आतां पायाम पडुन तुजला हेंच विनवीं ।तुझी भार्या देखो तुजसिं यशवंतास सुखवीं ” ॥१८॥महात्मा मल्हारी वचन वदला होळकर तो ।“ जिवांचा प्राण्यांच्या विधि तरि कसा घोळ करितो ! ॥जयाच्या दृष्टीनें नयन सुखवावे हरहर ! ।अतया मारूं हातीं धरवित हत्यारा खरतर ॥१९॥वहातां ओघानें प्रबळ नदिच्या मृन्मय घट ।जसे अन्योन्यांला बघति थडकूं येति निकट ॥तसा मी संसारीं झटपट कराया झट निघे ।स्वपुत्राला नेणें जवळ यशवंता जरि बघें ॥२०॥किती पुण्यें केलीं ? कितिक तरि मी जन्म जपलों ।प्रभो ! त्वत्सेवेला, किती तरि तपें घोर तपलों ? ॥जयांचीं हीं आलीं अवचित अशीं सुंदर फळें ।तुझी लीला देवा ! मजसिं मति - मंदास न कळे ! ।२१॥मनीं इच्छा नाना धरून जन संसार - गहनीं ।पुढें जातां जातां थकुन बसती वाट चुकुनी ॥पिता पुत्रां गांठी पडति समयी त्या अवचित ।प्रभूचीं हीं सूत्रें अवघड कळायास खचित ॥२२॥जशीं कांटेझाडें जवळ पळतां फाडिति तनू ।तशीं दुःखें पीडा करिति किति मी त्यांप्रत गणूं ? ॥अशाही संसारीं परि न जन राहील कवण ? ।जरी देवा ! त्यातें सुखकर असा दाविसि दिन ॥२३॥सुखें स्वर्गीं नाना असति कथिती ग्रंथ अवघे ।तयांची य अलोकीं तरि कवण तो धन्य चव घे ? ॥अहाहा ! आनंदा ! सुख मजसिं जें आज मिळतें ।तयाच्या योगानें महि-तल मला श्रेष्ठ गमतें ॥२४॥नियंता पौरांचा सुभग मतिमंतांत पहिला ।अहंता भिल्लाची हरित सुख - संतान महिला ॥विहंता खानाचा निज यश समंतात् पसरितो ।जयंता त्या जैसा मुरप यशवंतास बघतों ॥२५॥अहो ! आणा कोणी सुजन यशवंता झडकरी ।बिड्या तोडा वत्सा असुख न घडो लेशहि भरी ॥उठा आणा माझ्या सकळ सरदारांस जवळ ।तयांतें पाहूं दे प्रिय तनुज माझा श्रुत - बल ! ” ॥२६॥असें जों मल्हारी वचन वदला गद्गद मुखें ।कुणी गेले आणूं त्वरित यशवंताप्रत सुखें ॥प्रयत्नें काढोनी कर - चरणिंचें घट्ट निगड ।तया नेती स्वामीजवळ पळती ते धडधड ॥२७॥तयांची ती मुद्रा बघुन यशवंतास नवल ।गमे जों ते आले सविनय तयाच्याच जवळ ॥तिथे पाहे पौराधिप चकित बैरागि मुदित ।महात्मा मल्हार स्थित सदय दृष्टी निरखित ॥२८॥म्हणे तों आनंद प्रथम “ यशवंता ! प्रिय - गुणा ! ।नको वाटूं देऊं मज बघुनियां विस्मय मना ॥नसें मी बैरागी जरि तुजसिं बाहेरून दिसें ।मला आनंदाख्या समज तव मातामह असें ” ॥२९॥उठे तों मल्हारी दिसलि तरि त्याची स्थिति कशी ।पडे गालीं बाष्प प्रचुर घडते वृष्टिच जशी ! ॥गळां दाटे वाटे कठिण भरला त्या गहिंवर ।म्हणे “ बा ! ये पुत्रा ! मज कर सुखी या महिवर ॥३०॥मनाची जी माझ्या स्थिति घडतसे पाहुन तुला ।मनीं प्रेमाचा जो खळबळुनियां लोट उठला ॥अशा गोष्टी मातें सुचविति खरा तूं मम सुत ।न कां आनंदाचें मग वचन ऐकेन विहित ॥३१॥तुला वत्सा ! झालों प्रसवुन सुखी या महि - तळीं ।न जाणें दुर्दैवें परि असुनि तूं नित्य जवळी ॥तुझी आई तूं मी मिळुन सगळा काळ दवडूं ।मरायाच्या पूर्वीं मम हृदयिं हें इच्छित घडू ॥३२॥गुणी विद्वान्मानी कुशल व्यवहारांत सुकृती ।पुरस्कर्ता धर्मा नय - पटु उदार - स्थिति - मती ॥बळें गाढा शौर्यें अतुल सकल - ज्ञान - महित ।असा माझा पाहें तरुण अणखी सुंदर सुत ॥३३॥जशी रानीं कोठें पडलि ठिणगी कोण बघतो ! ।क्रमें काळें तीचा भयंकर असा लोळ बनतो ॥मराठा तूं तैसा पडुन परदेशीं निज गुणें ।अतिप्रख्यातीला चढसि यश तें यास्तव दुणें ॥३४॥विचित्रा ज्या गोष्टी कथितिल पुराणांतिल जन ।कथा वैचित्र्यानें मम अधिक त्यांतें म्हणविन ॥जसे झोंके खातां चपळ गगनीं वावडि फिरे ।मनुष्या आयुष्य - क्रम घडतसे त्यापस्चि रे ! ॥३५॥तुझी आई तूतें धरि जंव न गर्भीं बहु दिन । तिला केलें तेथें त्यजुन नृप कार्यार्थ गमन ॥तयानें हा झाला विरह कमलेचा बहुदिन ।असो क्षात्रा धर्मा सतत मम धिक्कार कठिण ! ॥३६॥हंसावें बोलावें क्षणभर बसावें न निचळ । रडावें रांगावें दुडदुड पळावें हि चपळ ॥अशी लीला बाल्यीं तव नच पहाया मज मिळे ।पिता हा मी तूझा किती तरि अभागी नच कळे ! ॥३७॥तुला अंकीं माझ्या बसवुन शिकूं साह्य करणें । तुवां केल्या प्रश्ना परिसुन विचित्रांस हंसणें ॥तुवां जें मागावें धरून हठ त्यातें पुरवणें ।न होतें हें दैवीं म्हणुन गमते व्यर्थचि जिणे ! ॥३८॥पित्यानें पुत्राला सकळ शिकवावें समुचित ।तया शस्त्रें शास्त्रें विविध करवावीं अवगत ॥मराठ्यांच्या रीती असुन सरदारांत असली ।न संधी दुर्दैवें तुजसिं शिकवूं म्यां बघितली ! ॥३९॥‘ जिथें नाहीं पाणी स्थळिं तरू अशा एक उठला ।न माळी त्या पाहे न जल लव ओपी न जपला ॥परंतु स्वानंदे प्रति दिन चढे तोच वरती ।सुगंधें तत्पूष्पांतिल मग दिशा सर्व भरती ’ ॥४०॥ तुझ्या कंठीं विद्या सहजचि पडे मोहित तुला ।धरी ही तारूण्यामधिं हि तव त्या अद्भुत फळा ॥मना आली प्रौढी सरळपण औदार्य अवघें ।रणीं या कोट्याच्या तुमुल महिने तीनहि बघे ॥४१॥स्वराज्य स्थापावें ह्मणुन झटलासी प्रतिदिन ।करावें मीं याचें उचित असतां नित्य मनन ॥तुझ्या मार्गी ती ती अडचण पुढें मीं ढकलिली ।अशा गोष्टी आतां स्मरुनच मना खंत जडली ! ॥४२॥कशाला मीं केलें समर असतें तुंबळ ? मुला ! ।तुझी कांहीं पूर्वीं जरि मिळवती माहिती मला ॥कशाला जीवाचा अमित हरिला प्राण असता ? ।अनार्थाचा झाला कहर शहरीं सज्जन - मता ! ॥४३॥असो जी जी झाली मजकडुन पीडा प्रतिदिनीं ।नव्हे ती मीं केली समज पुरतें हें समजुनी ॥तुवां सौख्यें आयुःक्रम चिर करावा म्हणुनियां ।विनंती त्या ईशाजवळ करितों पूर्ण सदया ! ” ॥४४॥वदे ऐसें प्रेमें रडुनि रडुनी होळकर तो ।स्वहस्तें सन्मानें धरून यशवंता बसवितो ! ॥तिघे एकमेकां बघुन सुख - सिंधूंत बुडले ! । तयाच्या योगानें सकळ गत गोष्टी विसरले ॥४५॥अभागी तृष्णेनें तळमळत पांथस्त पडतो ।‘ अहो ! द्याहो पाणी लव तरि ’ असे शब्द करितो ॥अशा वेळीं लोंढा प्रबळ नदिचा येउन भिडे ।तसे झाले पौराधिपति यशवंता मग पुढें ॥४६॥सुखाब्धीच्या लाटांमधिं बुचकळे मारि मिटक्या ।रडे हांसे झाली स्थिति बहु चमत्कारिक तया ॥धरी आजोबाचे चरण मग वंदी स्वजनका ।गळा दाटे प्रेमें म्हणुन बसला तो क्षण मुका ॥४७॥“ अहो ! आलें माझें सुकृत अवघें आजच फळा ।तुम्हां दोघांच्या मी म्हणुन बघतों मूर्ति विमळा ॥अहो ताता ! केले बहुत अपराध प्रतिदिन ।क्षमा व्हावी त्यांची म्हणुन चरणांतें विनविन ॥४८॥जयांच्या म्यां पायां पडुन सुखवावें घडिघडी ।कराया त्यांच्याशीं सतत झटलों मी वरचढी ॥पितापुत्रीं झालें रण नवल हें लोक म्हणती ।अहाहा ! दैवाची किति तरि चमत्कारिक गती ! ॥४९॥अहो ताता ! मातामह लवकरी येथुन चला ।सुखी माझी जावी बुडुन जननी पूर्ण कमला ॥न जाणो ती कांहीं करिल भय वाटे मज असें ।चला जाऊं कोट्यामधिं म्हणूनियां ” तो वदतसे ॥५०॥आनंद, मल्हार, पुराधिकारी ।घेऊनियां मंडळि अन्य सारी ॥घोड्यांवरी बैसुनियां निघाले ।वेगें बघाया कमलेस आले ॥५१॥ N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP