मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|यशवंतराय महाकाव्य| सर्ग पाचवा यशवंतराय महाकाव्य अनुक्रमणिका सर्ग पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चवथा सर्ग पाचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सर्ग आठवा सर्ग नववा सर्ग दहावा सर्ग अकरावा सर्ग बारावा सर्ग तेरावा सर्ग चौदावा सर्ग पंधरावा सर्ग सोळावा सर्ग सतरावा सर्ग अठरावा सर्ग एकोणिसावा सर्ग विसावा सर्ग एकविसावा सर्ग बाविसावा सर्ग तेविसावा सर्ग चोविसावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग पाचवा श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले. Tags : marathiyashawantraiकाव्यमराठीमहाकाव्ययशवंतराय सर्ग पाचवा Translation - भाषांतर बंडाची बातमी ऐकून मुसलमान अमीर उमराव दिल्लिरखानास भेटण्याकरितां राजवाड्यांत जाण्यास निघतात - त्यांची वाटेंत झालेली दुर्दशा - राजवाड्याचें दर्शन - मुसलमानांनीं दिल्लिरखानाजवळ केलेलीं गार्हाणीं - त्याने केलेलें सांत्वन - दिल्लीच्या बादशाहाकडून आलेला हुकूम - कोटा शहरांतील लोकांचें बंड मोडण्यास बादशाहाचे हुकुमावरून मल्हारराव होळकर येणार - ही बातमी ऐकून मोंगलांस झालेला हर्ष - दिल्लिरखान यशवंतरायास बंडांतून फोडण्याचा निश्चय करितो.श्लोक कोटा या नगरिंतले समस्त पौर । त्या रात्रीं मसलत ती करीति थोर ॥दिल्लीरालयिं दुसर्या दिनीं सकाळीं । म्लेच्छांची अभिमत मंडळी निघाली ॥१॥सर्वांच्या प्रकट दिसून चेहर्यांत । ये चिंता सतत मनांत जी रहात ॥जाती ते पथिं उमराव थोर काजी । वेगानें उडवित वायु - तुल्य वाजी ॥२॥मार्गांत प्रळय उडे तयांसभोंतीं । पाषाण प्रचुर शिरावरून जाती ॥जाऊनी अडविति पौर धांव घेती । संतापें बघति शिव्याहि शाप देती ॥३॥तें झालें यवन जनां असह्य फार । कीं गेलें भरूनिच कर्दमें शरीर ॥क्रोधानें चरफडतात ते मनांत । “ होवो हें शहर जळून सर्व फस्त ! ” ॥४॥धिक्कारी गिरि - शिखरास तुंग -कायें । तो वाडा नयन - पथांत त्याचिया ये ॥सोळा ज्याप्रत अति थोर चौक होती । दिल्लीरें सुखकर केलि ज्यांत वरती / वस्ती ॥५॥कारंजी आणि जल - मंदिरें महाल । राजं - स्त्री - वसति - गृहें तशीं विशाल ॥होते त्या विलसत खांब चंदनाचे । कित्येक स्थळिं बहु शोभिवंत साचे ॥६॥स्तंभांती सुबक सुरूप सुप्रमाण । कोरील्या असति सुपुत्तली मधून ॥त्यागाती निजति कितीक नाचताती । की त्या त्या स्थिति परिपूर्ण दाविताती ॥७॥प्रत्येकी सुललित वापिका प्रकोष्ठीं । पुष्पांनीं नमित लता - समूह कांठीं ॥तच्छाया पडति जळांत रम्य फार । दे शोभा विकसित आंत पद्म - भार ॥८॥बर्फानें मढवुन काय शुभ्र केल्या । कीं चंद्रा पिळुन रसांत त्या भरील्या ! ॥वाड्याच्या शिरिं वसतात हंस - कांटी । गच्च्या कीं जणु गगनीं उडूं पहाती ॥९॥कीर्ती ज्या जनिं रजपूत - वंशिं केली । जे झाले महित जगांत पूर्व काळी ॥तत्पुण्य - स्थिति - कृति - दर्शकें पवित्रें । हीं भिंतीवर दिसतात चित्र चित्रें ॥१०॥मातीचा दृढ तट वर्तुलाकृतींत । होते त्यावरति बुरूजही अनंत ॥वेष्टोनी तट परिखा - जल - प्रवाह । वाहे कीं जणु बहु थोर सर्प - देह ॥११॥शेजारीं अरबलि घांट, दुर्ग, झाडी । कोटा, त्याजवळिल देश, दूर खेडो ॥उद्यानें, सुर - सदनें हि राज - पंथ । प्रासादावरून समस्त दीसतात ॥१२॥हा वाडा खरचुन संपदा अमूप । हौसेनें प्रथम रचीत पूर्व भूप ॥गेले ते दिन ! नृपशूर तोहि गेला ! । म्लेच्छांनीं मग वसतीस योग्य केला ॥१३॥ज्या स्थानीं बहु सुटले हुकूम जाया । शत्रूतें पळवुन कीर्ति लूट घ्याया ॥होते जें स्थळ नृप - पाल भूशवीत । दिल्लीप - प्रतिनिधि आज राहि तेथ ॥१४॥ज्या ठायीं बसुन बलाढ्य सिंह गर्जे । तो सिंह - ध्वनि भुवनांतरांत गाजे ॥तो त्याचे कुलजहि जाति काळ चाले । त्या ठायीं वसति करीति आज कोल्हे ! ॥१५॥दिल्लीर प्रतिदिनिं भीति बाळगीत । होता कीं, उठतिल पौर ते समस्त ॥पाहोनी निवडक शूर वीर अंगें । रक्षाया गृह दिनरात्र त्यांस सांगे ॥१६॥ते होते फिरतच पेटवून तोडा । स्वस्थानीं निशिदिन रक्षितात वाडा ॥खङ्गातें उपसुन तीनशें प्रसिद्ध । द्वारीं ते बसति शिपाइ लोक सिद्ध ॥१७॥निर्बंधाविण उमराव जाति आंत । स्व - स्वामि - प्रतिनिधि - शोध ते करीत ॥दिल्लीर श्रवुन तदागम - प्रवेश । भेटाया त्वरित तयार चारुवेष ॥१८॥“ आहे कीं सुख तुमच्या मुलां स्त्रियांतें । हें येवो प्रथम कळून शीघ्र मातें ” ॥कीं वार्ता नव नगरामधें उदेली । ज्या योगें प्रकट तुम्हांत भीति झाली ॥१९॥“ वार्ता ही भयकर दिल्लिरा उदारा । सांगाया तुज बघतों त्यजून धीरा ॥कोट्याचे जन करितात बंड थोर । उत्तेजी भट यशवंत त्यांस शूर ॥२०॥युद्धाची त्वरित तयारि होत आहे । क्रोधानें खवळुन लोक धुंद राहे ॥या कैसी तजविज सांग ती अम्हातें । हें येतें व्यसन गृहा धना जिवातें ॥२१॥ते निंदा करिति छळीति तापा देती । द्वेषातें उघडच पौर दाखवीती ॥ही रात्रंदिन मनिं काळजी वहावी । योजोनि कवण उपाय शांति यावी ! ॥२२॥राजाचा धरुनहि पक्ष हाल व्हावे । हें आम्हीं कुठवर दिल्लिरा सहावें ? ॥जें प्रेम प्रकट अम्हांत हिंदु लोकीं । होतें तें दिसत नसे कुठे विलोकीं ॥२३॥हे आहे अवगत आमुचे शिपाई । त्या दुष्टांसह करितील हातघाई ॥अंगारीं शलभसमान मृत्यु - पंथा । जातील क्षण न तयांस झुंज देतां ॥२४॥यासाठीं जरि करिसी न हा विचार । या वेळीं तरि घडतो अनर्थ घोर ॥हे आतां सकळ लिहून पाठवावें । श्रीदिल्लीश्वर - चरणांस जाणवावें ॥२५॥बंडाची कुणकुण चार पांच मास । ही होती विदित पुरामधें अम्हांस ॥या पंथावरि गमलें न गोष्टि येती । यासाठीं धरिली न लेशमात्र भीती ” ॥२६॥दिल्लीर स्वजन - मुखांतली सदुक्ती । ऐकून क्षण बसला उगा कुकीर्ती ॥कल्लोळे उठति मनांत चित्त - वृत्ती । तो बोले मग लटकी धरून शांती ॥२७॥“ सद्धर्म - प्रसर - परायणांस यावें । सद्भक्तां मरण हि काफरीं वधावें ।देवाच्या जरि असलें असें मनांत । शांतीनें तरि मग या मरूं समस्त ॥२८॥लोकांच्या हृदय - तलीं वितुष्ट राहे । हें चारी गत महिन्यांत पाहताहे ॥मी झालों लवहिन संकटीं निराश । हें केलें सुविदित बादशाह यास ॥२९॥शिक्षा मीं समुचित भूषणास केली । त्या योगें गडबड नागरीं उडाली ॥झालों मी चकित लिहून त्याच रात्रीं । दिल्लीशा कळविलि ती समग्र पत्रीं ॥३०॥‘ स्वामीच्या चरण - रजासमान दास । रक्षावें करून दया - सहाय यास ॥हें नोहे तरि रजपूत गांठितात । भांडोनी नगर सदेश जिंकितात ’ ॥३१॥ये साह्या जरि नृप - राज - राज - सेना । या आठा दिवशिं बहु प्रतीक्षमाणा ॥बंडाचे प्रमुख धरून लोक मारूं । शत्रूतें निवटुनि संकटास वारूं ॥३२॥आली ती नच तरि एक नीट पंथ । दिल्लीचा धरून पळूं सुटूं जिवंत ॥त्यापूर्वीं जरि करितील शत्रु चाल । स्व - स्थानीं बसुन लढून नेउं काळ ” ॥३३॥ऐसें जों वचन सुयुक्ति - सिद्धि बोले । वेगानें पळतच दूत आंत आले ॥धापांनीं स्फुट वदनी फुटे न वाचा । सांगाया न शकति ही निरोप त्यांचा ॥३४॥दिल्लीरें जंव पुशिलें तयांस काम । नम्रत्वें वदति करून ते सलाम ॥“ त्वत्पदें बघुन विचार फार केला । भूपाळें तुजसिं हुकुम हा लिहीला ” ॥३५॥हें कर्णामृत नृप - दूत - वाक्य ऐके । खानाच्या मुखिं हरिखें सुकांति फांके ॥वंदोनी शिरिं धरि भूप - शासनातें । उत्कंठाकुल मग ऐकवी जनातें ॥३६॥“ सद्धर्म - वर्धक रवि - प्रखर - प्रताप ।दिल्लीश्वर क्षिति - तलावर एक भूप ॥नैक - प्रसंग - रण - संहत - शत्रु - कीर्ति ।आज्ञा निज प्रतिनिधीस अशी करीति ॥३७॥एकत्र दुष्ट जन त्या नगरांत होती ।राजाविरूद्ध अपराध करूं पहाती ॥कोपास पात्र अमुच्या ह्मणुनीच झाले ।येईल दंड करण्यांत तयांस काळें ॥३८॥कोटा - पुरांतिल जनांप्रत दंडण्यास ।लागेल काळ पडतील महाप्रयास ॥सेना नसे जवळ आज तयार याया ।तेथें प्रसंगि उपयोगिं तुम्हां पडाया ॥३९॥जे शासितात नृप राजपुतानियास ।या गादिचे म्हणति अंकित आपणास ॥ते गर्व - मत्त करभार न देति काळीं ।तद्दंडनीं म्हणुन बुद्धि अम्हांस झाली ॥४०॥मल्हार होळकर थोर मराठियांत ।जो आमुचा परम मित्र म्हणों मनांत ॥त्या साठ लाख रूपये करितों बहाल ।येईल तो त्वरित दूर करील हाल ॥४१॥शत्रूंस धाडुन दिगंतर पाहण्यास ।देईल शांति सुख तोच तया पुरास ॥मार्गास मत्त नृप आणिल तोच वीर ।प्रख्यात - शौर्य - बल घेउन सैन्य - भार ॥४२॥तो येइ तों दिवस लोटति आठ चार ।आधीं उठून जरि शत्रु करील मार ।रक्षावया पुर तिथेच तुम्हीं रहावें ।होईल यत्न तितुका मरुनी लढावें ॥४३॥आटोपल्यावर तिथील समस्त काम ।मल्हार होळकर वीर - शिरो - ललाम ॥जाईल पश्चिम दिशे रजपूत - देशी ।पाहील कोण करि भूप लढाइ कैसी ॥४४॥ऐका अवश्य जरि कांहिं हुकूम सांगे ।द्या जें अवश्य तृण - धान्य - धनादि मागे ॥विश्वास त्याजवर पूर्ण तुम्हीं धरावा ।अल्प - श्रमें व्यसन - वारि - निधी तरावा ” ॥४५॥व्यक्तार्थ हा ऐकुन राज - लेख । गर्जोनि टाळ्या पिटितात लोक ॥ईश - स्तवातें करितात भावें । अनंद त्यांचा गगनीं न मावे ॥४६॥दिल्लीर बोले मग तो स्व - लोकां । “ नाहीं जिवाला किमपीहि धोका ॥हे बंड थोड्या दिवसांत मोडे । दंडूं तदग्रेसर उग्र दंडें ॥४७॥मल्हाररायास पुरांत घेऊं । त्या लागतें साह्य अवश्य देऊं ॥ते दोहनादी यशवंत आणी । जातील फांशी चदुनी मरूनी ॥४८॥परंतु तो येइल येथ तोंवरी । कसें रहावें सुखरूप या पुरीं ? ॥न काय हल्ला करितील येउनी । पुरस्थ ? भीती उपजे पुन्हा मनीं ॥४९॥अशा संकटीं एक युक्ती दिसून । मला येतसे ती पहावी करून ॥बळी बंडवाले दहा ते हजार । तयां शांत ठेवूं करावा विचार ॥५०॥साधा स्वभाव बहु वर्तन नम्र लोकीं ।ज्याचें तयांत यशवंत असा विलोकीं ॥आशांमधें परम दुस्तर जी धनाशा ।तीनें तया वळवितों न घडो निराशा ॥५१॥वळेल लोभें यशवंतराज । साधून घेऊं तरि कार्य आज ॥मल्हार आल्यावर सूड साधूं । धरून त्यातें कपटेंचि बांधूं ” ॥५२॥हत्तीतें कमलांतल्या मृदु अशा जो तंतुनीं बांधिता ।झंझावात धरून एक समयीं जाळ्यामधे कोंडिता ॥त्या मनी कमलात्मजास कुमती द्रव्यें विकाया बसे ।प्राण - प्राण - परायणांस यवनां दिल्लीर बोले असें ॥५३॥ N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP