मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|यशवंतराय महाकाव्य| सर्ग दहावा यशवंतराय महाकाव्य अनुक्रमणिका सर्ग पहिला सर्ग दुसरा सर्ग तिसरा सर्ग चवथा सर्ग पाचवा सर्ग सहावा सर्ग सातवा सर्ग आठवा सर्ग नववा सर्ग दहावा सर्ग अकरावा सर्ग बारावा सर्ग तेरावा सर्ग चौदावा सर्ग पंधरावा सर्ग सोळावा सर्ग सतरावा सर्ग अठरावा सर्ग एकोणिसावा सर्ग विसावा सर्ग एकविसावा सर्ग बाविसावा सर्ग तेविसावा सर्ग चोविसावा यशवंतराय महाकाव्य - सर्ग दहावा श्री. वासुदेव वामन शास्त्री खरे यांनीं रचिलेंले. Tags : marathiyashawantraiकाव्यमराठीमहाकाव्ययशवंतराय सर्ग दहावा Translation - भाषांतर शहराच्या तटावर लढण्याची तयारी - तट घेण्यासाठीं मराठ्यांचे निष्फळ प्रयत्न - मराठे तटास खिंडार पाहून हल्ला करितात - रजपूत मागें हटतात - यशवंतराय त्या स्थळीं येऊन रजपूत लोकांस उत्तेजन देतो - पुन्हा लढाई - मराठे मागें हटून आपल्या छावणींत येतात - मल्हारराव कोटा शहरास वेढा घालून पुन्हा बसतो.आर्या मल्हारराव कोटा - शहरींच्या वेढुनि तटा बसला ॥झटला हठें जरी तरि न चले त्याचा उपाय ही कसला ॥१॥जो काळ्या पाषाणीं बांधियला उंच पंधरा हात ॥वेढुन कोटा - शहरा सर्पासम ती कोसहि रहात ॥२॥डौलें बुरूज त्यावरि जाती गगनास काय भेटाया ॥उचलुन काय शिरें हीं बाहे पांथांस नगर ‘ भेटा !! या !!! ’ ॥३॥होत्या त्या शहराला एकंदर वेशि थोरशा चवदा ॥प्रत्येकीवर तोफा स्थापी यशवंत शत्रुला भयदा ॥४॥एकेका वेशीवर ठेवियले पांच पांच शत योध ॥त्यावरि कुलीन शूर स्वजन नियोजी स्वयें करुन बोध ॥५॥निवडुन चार हजार श्रुत - बल भट ठेविले महाभागें ॥मागें, कीं समयाला चालुन जातील अरिवरी रागें ॥६॥जी जी व्हावि तयारी युद्धाला हो तयार ती सगळी ॥श्रीमंत सभ्य लोकीं भांडारें उघडिलीं म्हणुन अपुलीं ॥७॥दिल्लिरखानें लोकां वागविलें दुष्ट रीतिनें म्हणुन ॥आधींच नागरांचें त्याविषयीं क्षुभित होय फार मन ॥८॥यशवंताच्या वाक्यें होता सर्वांस चेव बहु आला ॥जो तो सावध होत अकीम न पडो शत्रुचा पुरीं घाला ॥९॥कोटा - नगर पुन्हा जरि बादशहाच्या करामधें जातें ॥नाहीं धडगति आम्हां वाटे ऐसें पुरांतिल जनातें ॥१०॥स्वाधिन जालों जरि तरि करितिल जाळून सर्व ही राख ! ॥क्रूर मराठे नेतिल घरदार लुटून हा असे धाक ॥११॥त्यांतुन रजपूतांच्या शौर्याचा कीर्ति - दुंदुभी वाजे ॥झाले त्यास मराठे नाशक मत्सर असा मनींमाजे ॥१२॥होती हिंमत अंगीं भरली नूतन न जाहले क्लेश ॥होळकरातें यास्तव नागर भ्याले न शूर ते लेश ॥१३॥मल्हारराव ऐसें समजत होता मनामधें पूर्ण ॥पाहुन भाले भ्याले स्वाधिन करितील पुर अरी तूर्ण ॥१४॥जेव्हां परंतु त्यानें यशवंताचा निरोप आयकिला ॥झाला निराश मानी । वेढा घालुन तटा हठें बसला ॥१५॥रात्रंदिवस धडाडे तोफांचा मार मोर्चियांवरून ॥झणणण जाती गोळे आपटति तटावरि त्वरेंकरून ॥१६॥नेत्र - कटाक्षें पाहे जैसी रंभा बुधा शुका मोहूं ॥ब्रह्मानंद - परायण परि तो योगींद्र काय वद तो हूं ॥१७॥तैशाच मराठ्यांच्या तोफा भंगावया तटा बघती ॥पोक्त वयें वृद्ध असा स्थिर साहे तट विटंबना मग ती ॥१८॥कीं गलबलाट ऐकुनि पोरींचा कोप पावला वृद्ध ॥धिक्कारुनि डौलाने राहे जाग्यावरी उभा क्रुद्व ॥१९॥लावुनि शिड्या चढावें दह्रिला हट यापरी मराठ्यांनीं ॥ते झोडिले पुरजनीं सहज समे जेंवि काय काठ्यांनीं ॥२०॥धैर्ये रागांत उभे रजपूत अचंचल - स्थिति रहाती ॥येतां जवळ मराठे शस्त्रें धरितात एकदम हाती ॥२१॥भाले बर्च्या फेंकिति रागें धरिती मनीं अहंकार ॥‘ सूं सूं सणणण ’ सुटती बाण धनुष्यें करीति टंकार ॥२२॥संतप्त पौर वर्षति कढ्यांतुन फार तापलें तेल ॥ढकलिति दगड धडाधड ऐशा प्रळयांत कोण वांचेल ? ॥२३॥लावुन शिड्या तटाला वर जाणें कर्म हें असे खोटें ॥हटती शूर मराठे आश्चर्यें वदनिं घालिती बोटें ॥२४॥मग ते सुरुंग लावुनि यत्नें बघती तटीं करूं भंग ॥परि तो अभंग राहे घडिलें ओतून लोह जणु अंग ॥२५॥पहिल्या आठा दिवशीं युद्धांत सहस्र दोन भट पडले ॥मेले शूर गुणी किति त्यांचे बहु मित्र सोयरें रडले ॥२६॥मेले तसेचि समरी पौरांचे पांच सातशें वीर ॥हानी मोठी झाली परि त्यांनीं सोडिला न लव धीर ॥२७॥एके रात्रीं बसला होता तंबूंत वीर होळकर ॥ज्या पौर - शौर्य वदलें व्यर्थोद्यम तूं असाच चोळ कर ॥२८॥तों वार्ता त्यास कळे जिंकाया नगर युक्त हा समय ॥ईशान्येस सुरुंगें तट ढांसळला घडे महा प्रलय ॥२९॥आवेशें मग वदला “ जे माझे म्हणविती खरे मित्र ॥येतिल माझ्या मागुन ऐशा समयीं धरून करिं शस्त्र ” ॥३०॥ती भव्य दिव्य मूर्ति उत्साहें भरुन शोभली फार ॥गेली छाती दाटुन चमके नेत्रांत तेज अनिवार ॥३१॥तों सरदार विचारी वदले “ स्वामी दिसे न हें युक्त ॥जोडुनि करांस विनवूं ऐकावें आज आमुचें उक्त ॥३२॥कोटा धुळीस मिळवुन इच्छा आम्हांस बंड बुडवाया ॥आहे तुझ्यापरि पदीं समरीं रजपूत सर्व तुडवाया ॥३३॥ऐश्वर्य पेशव्याचें वाढावें म्हणुन आमुचा जन्म ॥हें बाण करिं सतीचें आचरिलों घेउनी समर कर्म ॥३४॥क्षुल्लक रजपूतांला भीतों वाटे असें तुला काय ? ॥जाइल जेथें भाला देतिल हरिचे तिथे विजय पाय ॥३५॥परि काळ वेळ पाहुन वागावें बोलती असें लोकीं ॥पश्चात्ताप न होवो संतत दुःखद कधीं मग विलोकीं ॥३६॥ही मध्य - रात्र झाली अंधारें सर्व भुवन भरणार ॥अज्ञात देश शत्रुहि मायावी घ्रो कर्म करणार ॥३७॥कोसळला तो तट जरि होइल रात्रींत नीट नच वाटे ॥भांडूं उद्यां सकाळीं नेऊं नगरीं स्व - सैन्य त्या वाटे ॥३८॥इच्छा जरि तव असली जातों आम्ही समस्त सरदार ॥मिळवावया यशःश्री आलों येथें त्यजून घरदार ॥३९॥वार्धक्य तुजसि आलें सोसूं न श्रम शरीर हें युक्त ॥होइल जिवा अपाय हि बाळगिती धाक हा तुझे भक्त ॥४०॥म्हणुनी विनंति करितों बाहेर पडूं नये तुवां आज ॥आज्ञा दे तव सेवक येतिल साधून सत्य हें काज ” ॥४१॥मल्हारराव बोले, “ ध्याया कोटा प्रसंग हा आहे ॥एकैक क्षण जातो भ्याडासम भीति दावितां कां हे ? ॥४२॥पुरुन उरेन जगाला झालों जरि वृद्ध केंस हे पिकले ॥किति देशांचीं दैवें असती माझ्या करांत हें न कळे ! ॥४३॥केला निश्चय जो कीं ब्रम्हा फिरवूं शकेल तो न लव ॥कां मी भोक्ता दवडिन आलें हातास जें यशोविभव ” ॥४४॥ऐसें वदे व्यवस्था सांगे त्यांतें करावया सिद्ध ॥कांहीं निवडुन घेतो संगें करण्यास रात्रिचें युद्ध ॥४५॥तों दिल्लिरखानानें अपकार समस्त पूर्व आठविले ॥होळकराच्या साह्या निवडक कांहीं पठाण पाठविले ॥४६॥वेगें पायदळाची टोळी घेऊन जाय मल्हार ॥करितें दिशा सुगंधी ज्याचें परिफुल्ल कीर्ति - कल्हार ॥४७॥विश्वासु स्वामीचें रक्षण करण्यास जीव देणार ॥होते त्या टोळिंतले ख्यात बळी माण देशचे वीर ॥४८॥दोन हजार असे हे एकंदर लोक जाहले संगे ॥घटकेंत एक आला गोटाबाहेर होळकर अंगें ॥४९॥सत्वर पाउल टाकी स्वीकारी आडमार्ग जायाला ॥गांठूं रजपूतांला हिंमत अत्यंत वीर - रायाला ॥५०॥जाऊन गुप्तमार्गें पोंहचला त्या तटासमीप बळीं ॥ ऐके कुणकुण कांहीं आंतुन तो कान देउनी जवळी ॥५१॥होता उजेड केला पेटवुनी आंत दीपक मशाला ॥जमलें पौर सभोंती नीट करूं भिंत पाहति विशाला ॥५२॥बोले एक “ गड्यांनो ! नीट मनुष्याकृती मला दिसती ॥वाटे खरेंच मजला येथ मराठे कुठे तरी असती ” ॥५३॥“ भितर्या जेथें तेथें दिसति मराठे ! न मार हांकेला ” ॥बोलून सोबत्यांनीं त्याच्या गोंगाट हांसुनी केला ॥५४॥हंसण्य़ाचा न प्रतिरव भिंतिस आपटुन पावला विलय ॥तों नगर - रक्षकांवर एकाएकींच जाहला प्रलय ॥५५॥होउन पुढें मराठे रांगें तसेच काढिती बार ॥शतसंख्य पौर मेले रंभा तत्कंठिं घालिती हार ॥५६॥इतक्यांत पौर आले धांवुन मागून ओरडत रागें ॥त्यांवरि निज वीरांतें जाया मल्हार त्या क्षणीं सांगे ॥५७॥मग शत्रुमित्र झाले एकाएकींच एकवट सुभट ॥करिती खटपड पटपड मरति हठें कपट दाविती निपट ॥५८॥मल्हार उग्रकर्मा रजपूतांतें कृतांत दिसताहे ॥भक्ति - रसें शत्रु - शिरें अमित तदा भूमि - देविला वाहे ॥५९॥ते नगर रक्षणारे धाकें सोडून समर पळतात ॥झाला गोंधळ तेव्हां हांका मारून कोण वळतात ? ॥६०॥यशवंतराय आला इतक्यांतच जेंवि मातला नाग ॥कीं अन्य गुहेंत शिरे म्हणुनि जणो काय खवळला वाघ ॥६१॥धांवे गर्जुनि सांगे मागें लोकांस धीट परताया ॥“ रजपूताच्या येउन जन्मास अयोग्य काय करितां ? या ॥६२॥पूर्वज लाजिरवाणें तुमचें हें कर्म पाहुनी सारें ॥रडतील वर बघा कीं शोभति जे दिव्य कांतिनें तारे ॥६३॥तुमचीं होऊन मुलें मोठीं घेतील शस्त्र ज्या कालीं ॥आठवुनी ही दुष्कृति लाजेनें मान घालतिल खालीं ॥६४॥केव्हां तरी मरावें जन्मा येउन न काय मनुजानें ॥धन्य म्हणावा देशा सोडविण्या अर्पिली स्वतनु जानें ॥६५॥जरि काळें मुख करूनी पुर देणें शत्रुच्या करीं द्यावें ॥तरवरा हीच घेउन मातें तोडून आज यश घ्यावें ” ॥६६॥यशवंतोक्ती ऐकुन लाजुन परतून धांवले पौर ॥ते दक्षणींस होती भयद जसे काय राशिला सौर ॥६७॥उठले जाले जागे नागर कोट्यांत गडबड उडाली ॥दुंदुभि वाजति गाजति तोफा, नगरी तया रविं बुडाली ॥६८॥झाला यशवंत पुढें सर्वांच्या झगडतो जिवापरता ॥लाजवि निजशत्रूतें अद्भुत करणी रणामधें करिता ॥६९॥तळपति त्या आपटती पाडिति ठिणग्याच काय तरवारी ॥धांवे एक कराया वार दुजा त्यास शीघ्रतर वारी ॥७०॥दोहन मान हि सागर संगें घेउन हजार दोन भट ॥यशवंताच्या आले साह्या झुंजोनि दावितात हठ ॥७१॥उत्साह पौर - पक्षीं तेव्हां युद्धार्थ तत्क्षणीं वाढे ॥अद्भुत साहस कृत्यें करितां कौशल्य दाविती गाढें ॥७२॥अरुणोदय तो झाला आशा - चंद्रास अस्त ये पूर्ण ॥गोटास मग निघाले त्यजुन मराठे रणांगणा तूर्ण ॥७३॥त्या दिवसापासुनियां मल्हार तटावरी करि न घाला ॥मोच्यावरून मात्रच तोफांचा मार ठेविता झाला ॥७४॥घालूनियां गराडा कोटा - शहरासभोवती बैसे ॥स्वांती संतत चिंती व्हावे हे नम्र नागरिक कैसे ? ॥७५॥श्लोकरक्षावया सतत चिंति असे उपाय ।राहून सावध पुरा यशवंतराय ॥आज्ञेंत वागुनि सहाय तयास होती ।ते पौर संकट - निवारणिं हेच रीती ॥७६॥ N/A References : N/A Last Updated : March 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP