मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे| श्री आर्या बांदकरमहाराजांची पदे श्रीगुरुबोध ग्रंथ ग्रंथार्पण पत्रिका लघु आत्ममथन प्रारंभः, मंगलाचरण अथ अधिष्ठाण कथन पिंड ब्रह्मांड निवारण सूक्ष्मदेह निवारण स्वमत मत निवारण कारणदेह निवारण महाकारण निरसन जिवन्मुक्ती निरूपणनाम श्रीलघुआत्ममथने स्वात्मतत्त्वामृतशतकम् श्री गणपतीचीं पदें विष्णु महाराज सोमण यांचीं पदें १ ते १० ११ ते २० २१ ते ३० ३१ ते ४० ४१ ते ५० ५१ ते ६० ६१ ते ६७ श्री मारुतीचीं पदें श्री दत्तात्रेयाचीं पदें साधनोपदेशपर पदें श्री संत लक्षणें पदें १ ते १५ १६ ते ३० ३१ ते ४८ श्रीदामोदराचीं पदें श्री नागेशाचीं पदें श्री लक्ष्मीव्यंकटेशाचीं पदें श्री लक्ष्मी नृसिंहाचीं पदें श्री नृहसिंहाचीं पदें श्रीकामाक्षेचीं पदें श्री कपिलेश्वराचीं पदें श्री जगदंबेचीं पदें श्री नारसिंहाचीं पदें श्री नवदुर्गेचीं पदें श्री चंद्रेश्वराचीं पदें श्री मंगेशाचें पद श्री बिंदुमाधवाचें पद श्री शांतादुर्गेचें पद श्री विजयादुर्गेचें पद श्री महालसेचीं पदें श्री महालक्ष्मीचें पद उपदेशपर संवाद श्री विरविठ्ठलाचीं पदें श्री पांडुरंगाचीं पदें श्री रामनाथाचीं पदें श्री मदनंताचीं पदें श्री लक्ष्मी नारायणाचीं पदें श्री पूर्णप्रज्ञतीर्थ स्वामीचें पद श्री पद्मनाभतीर्थ स्वामीचीं पदें श्री इंदिराकांततीर्थ स्वामीचीं पदें श्री नरहरितीर्थांचीं पदें श्रीमुकुंदराज श्रीशितलादेवीचें पद श्रीषष्टीचीं पदें श्री देवकीकृष्णाचीं पदें उपदेशपर पद श्रीजगदंबेचीं पदें श्री गणपतीचें पद श्रीरामाचें पद श्रीबांदकर महाराजांचे स्वतःबद्दलचे उद्गार श्री जगन्नाथ बोवा बोरीकर श्रीकृष्णाचीं पदें गवळण काल्यांतील पदें झुला १ ते १० ११ ते २० २१ ते ३० ३१ ते ४० ४१ ते ५० ५१ ते ६० ६१ ते ७० ७१ ते ८० ८१ ते ९० ९१ ते १०० १०१ ते ११० १११ ते १२० १२१ ते १३० १३१ ते १३९ श्री जगदंबेचे अभंग संतसंगाच्या महिमेचा अभंग शिष्याकरितां केलेला अभंग श्री राघवाष्टक ‘ पतीतपावनराम ’ श्लोकाष्टक ‘ जानकीजीवनराम ’ मंत्रार्याष्टक ‘ राजीवनयनराम ’ श्लोकाष्टक ‘ आनंदघनराम ’ मंत्रार्या श्लोक अभंग श्री आर्या पद श्री आर्या श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज. Tags : abhangbandkarpadअभंगपदबांदकर श्री आर्या Translation - भाषांतर अज नंदनात्मज श्री रामसदयहृदय अति भला साचा । अभय वरद हस्त सदा अभिमानी पूर्ण आत्म दासांचा ॥१॥भजन प्रेमसदारा किति माझ्या भक्तवत्सला रामा । भव भय हरूनि हृदयीं भजकांला दे अखंड आराम ॥२॥यन्नामी भव गिरिजा रात्रदिवस गुंग यत्सुखीं रमती । यद्गुण गण लंपट सुर यत्तेजें वीर वीर ते दमती ॥३॥वधि रावणासि वीरा सुर कल्याणार्थ वन्द्य तोचि मला । वरिला सचित्सुखमय वरिष्ठ तत्स्वरुपि जीव हा रमला ॥४॥रवि कुलभूषण तो म- त्प्रियात्म सुखकारि रजनि दिवस बरा । रक्षः कुल वधुनि सुरां रक्षण करि निज पराक्रमें जबरा ॥५॥दरति अघें यन्नामा प्रिय मज तो फार दर्शनास हरी । दडति जया शत्रु ससुह दमउनि मन उठवि आत्मसुख लहरी ॥६॥हर्षुनि यद्भक्त स्तवन करिति उभय हस्त जोडुनि ज्यां । हत शत्रु विजयि तो प्रभु हरुनि दुरित कळवि चित्सुखास निजा ॥७॥स्तव्य पदीं रमविती निज भक्त ध्व- स्त भय कळायास । स्तवनप्रिय राम सम स्त जना नामेचि अघजळायास ॥८॥श्री मद्राजारामा मारुतिसह सर्वदा करीं वास । हृदयीं विष्णू कृष्ण जगन्नाथा स्वमुख गोड जीवास ॥९॥------------------------------------------------॥ श्री आर्या ॥नव नव नवल सुखास्पद नक्रातक नम्र दास नम- न तया । नर सुरवर मन रमवी नश्वर न उरवुनि न ढळवी न तया ॥१॥रख रख रगडि मनातिल रमउनि पदिं रजनिदिवस रस रसवी । रवि वंशज नुर वुनि तम रघुपति रजनीश रत्न मधुर सवी ॥२॥हळ हळ हरिभक्तांची हटकुनि हर्ष मन हटें हटवी । हरि नर देव अह र्निशिं हसवि हतरिपू हराद्यनी हकवी ॥३॥रिपु रिपु रिपु षड्रिपु रिघुनि जनी रिष्ट करिति रि रि रिपणें । रीति अशीच तरि नुरवि रिष्टि ध- री नृहरि ह रि न तारि पणे ॥४॥प्रर्हाद वरद लक्ष्मी नरसिव्हा नरहरे रमारमणा । विष्णो कृष्ण जगन्नाथा लक्षुनि हरिं तमोमय भ्रमणा ॥५॥वरच्या आर्यानीं १३ तेरा खेपा ‘ नरहरी ’ हा मंत्र आला आहे.---------------------------------------------------॥ श्री आर्या ॥हर्षद हनुमान् मारुति बलभी- म समर्थ रामदास मला ॥ हरुनि त्रिविध तापांतें हतराक्षस रामिं जो सदा रमला ॥१॥नूतन नूतन रुचिकर लक्ष्य म-हा सुखद मेश मज दावी ॥ नूपुरु विभूषणान्वित नू नं मनरम्यता मतिस ठावी ॥२॥मंगल मंगल तीव्र न भी हर रुक् सौख्यकर मला नमवी ॥ मंत्र जपें षड्रिपु बल मंथी दाऊनि आत्मसुख रमवी ॥३॥तरवि- त दुःख समुद्रा मच्चित्ता द्रउनि साथ करि राम ॥ तन्मयपणें कळे मज तद्रस पानेंचि संसृति विराम ॥४॥रघुविर रामस्वामीत्यजुनि अहंकार मी तुला शरन ॥ चरण तुझे मज दावीं हरण करिति जे पुनर्जनन मरण ॥१॥विष्णो कृष्ण जगन्नाथा श्रीरामा निजात्मसुख देईं ॥ आर्या चार तुवां ज्या रचिल्या त्या तुज समर्पुनी घेईं ॥२॥वरच्या आर्यांत ४ वेळा ‘ हनूमंत ’ हा मंत्र व एक वेळा ‘ मारुति ’ ‘ बलभीम ’ ‘ महारुद्र ’ हे मंत्र आले आहेत.-----------------------------------------॥ श्री आर्या ॥श्री मद्राम रघुवर श्री सुखकर मन्मतीसि पदिं मुरवी ॥ श्रीश जगत्पति विजय श्रीनें षट् शत्रु समुह तो नुरवी ॥१॥सीमा न निजगुणाची सिद्ध शिरोमणि शिवासि रघुराया ॥ सीतापति निज नामचि सिद्धिप्रद विषय हेतु न उराया ॥२॥तारक तूं अरिमारक तारापति बंधु सुखकरा रामा ॥ ताराधिपानना मज तारिं सदय सज्जनांतरा रामा ॥३॥राक्षस लंकाधिप जो रावण त्या वधुनि तदनुजालंका ॥ रामा समर्पिली त्वां राजेंद्रा आत्म कीर्ति अकलंका ॥४॥मननें स्वचरित्रांच्या मन्मन करिं शुद्ध कळवीं निज नातें ॥ मळ नुरवुनि विस्मृति रुप मज लाविं अखंड आत्म भजनातें ॥५॥मानवसा दिससी परि माधव तूं आद्य सच्चिदानंद ॥ माता पिता निजजनां मारिसि अवतरुनि दुष्ट मतिमंद ॥६॥रुष्ट न होसि प्रिय जनि रुचिर निजस्वरुप आवडे मातें ॥ रुद्र प्रिय नाम तुझें रुचिकर गातों धरूनि प्रेमातें ॥७॥ती दे मनास भक्ती तीव्र विषय वासना सरायास ॥ तीनी गुण जींत विरति तीर कळविं आत्मसुख वरायास ॥८॥विष्णो कृष्ण जगन्नाथा श्रीरामा तुझ्या तुवां आर्या । रचिल्या समर्पिल्या तुज कारण तूं सर्व या जगत्कार्या ॥१॥या आर्यानीं ‘ श्री सीताराम मारुती ’ हा मंत्र ४ वेळा आला आहे. -----------------------------------श्री बांदकर महाराजानीं आपला पुण्य देह शके १८२४ आश्विन वद्य प्रतिपदा या दिवशी ठेविला ! खाली पद देह ठेवण्यापूर्वि फक्त तीन दिवस म्हणजे - आश्विन शुद्ध त्रयोदशी दिवशीं केलें आहे ! व हेंच पद त्यांचें शेवटचें होय !!! N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP