मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
लघु आत्ममथन प्रारंभः, मंगलाचरण

लघु आत्ममथन प्रारंभः, मंगलाचरण

श्रीसद्गुरु विष्णुबोवा सोमणकृत


॥ श्री सीतारामचंद्र चरणारविंदा भ्यो नमः ॥
लघु आत्ममथन नामें । रचीं मी हा अनुक्रमें । यासि पाहतां आत्म भ्रमें । बाधिजे ना सर्वथा ॥१॥
याचा भूपाळी छंद । ह्मणतां भ्रांति निर्वाद । चारी चरण अभंग बद्ध । अथवा वाचा ओंवीतें ॥२॥
स्थूळ शरीरा पासोनी । पिंडीं देह जे का तिन्हीं । चारी ब्रह्मांडीं सांगूनीं । आत्मा मथिला आपणें ॥३॥
इति परिभाषा समाप्तः ॥
===========================
मंगलाचरण.
नरदेह अयोध्येसी । येवूनि भेटावें रामासीं । नाहीं तरी चौर्‍यांसीं । फिरणें लगे चुकेना ॥१॥
सीता चिच्छक्ती सहित । निर्गुण आसनीं बैसत । तेथूनि पाहतो सतत । चराचर आपणा ॥२॥
आधीं टांकितो दृश्यांसी । मग साधितो शद्बासी । निर्विकल्प समाधीसी । निवांत दीपा सारिखा ॥३॥
मग जिकडे जिकदे पाहे । तिकडे तिकडे आपण होये । होणें न होणें ही राहे । वैष्णवचि तो असे ॥४॥
इति मंगलाचरण समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP