मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
उपदेशपर संवाद

उपदेशपर संवाद

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


पद १ लें -
गडे कसी ग तुला भुल पडली, असि अहंवृत्ति जडली ग ॥धृ०॥
मूळ सुखाचें विसरुनि नाचे, खूळ संगति घडली ग ॥ग०॥१॥
सांड विषय सुख हो अंतर सुख, आत्मस्थिति उडली ग ॥ग०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ स्मरीं, भवार्णवीं बुडली ग ॥ग०॥३॥

पद २ रें -
गडे भुवन सुंदर जानकिचा वर पाहूं सखि जाऊं । मोठा ग संसार जाच निरंतर यांत मी किति राहूं ॥ग०॥धृ०॥
त्रिविधा हूंकार षड्वैरी निष्ठुर गांजिति कसी साहूं । नको बाई येराजार वाटे सुख फार श्रीराम गावूं ॥ग०॥१॥
धनुर्बाणधर स्वामी रघुविर त्या पदिं लक्ष लावूं हा भव दुस्तर तरुनि सत्वर मोक्ष सुखचि पावूं ॥ग०॥२॥
अनंत अपार राघव साचार देखतां विसावूं । राम विष्णु परब्रह्म निरंतर कृष्ण अद्वय लावूं ॥ग०॥३॥

पद ३ रें -
कोटि मदन सम सुंदर राघव नयनीं पाहिला गडे ॥धृ०॥
सर्व त्यजुनि लंपट तप्तदिं मन विरमे अन्य नावडे ॥को०॥१॥
निज भक्तांचें जाणुनि बहुविधयुक्ती फेडि सांकडें ॥को०॥२॥
जे निष्काम तयांसचि या रामाची संगती घडे ॥को०॥३॥
दक्षिणांकिं लक्ष्मण वामांकीं सीता मारुती ज्या पदाकडे ॥को०॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ निज स्मरणें नित्य सांपडे ॥को०॥५॥

पद ४ थें -
आवडि राहिं जडुनि राघव पायीं । उगिच बसुनि कायि श्रमसि बाइ ॥धृ०॥
जन्मुनीं संसार केला, कर्ता नाहीं ओळखीला । विषयिं भुलल्या बय, फुकट जाइ ॥आ०॥१॥
सांडुनि वृत्तीचि पांग, आत्म स्वरुपिंच रांग । अनुभविं तिज आंग, नुरुनि ठायीं ॥आ०॥२॥
कृष्ण जगन्नाथ ह्मणे, मज तुज काय उणें । ऐसी हे स्थिति पावणें, बहू उपायीं ॥आ०॥३॥

पद ५ वें -
सरस एक नकल कधिं न सुमति । चालतां चालतां पथिं श्रमलें भारीं ॥धृ०॥
देह अभिमान खोटा, जाचला हा जिव मोठा । नाहिं आत्म सुखा तोटा, आपुले द्वारीं ॥स०॥१॥
पाहिलें कांहिं बहुत, नाहिंच विषयिं हित । बुडत्यासि देति हात, परोपकारी ॥स०॥२॥
विष्णु गुरुपदिं स्थिर, कृष्ण जगन्नाथ शिर । ह्मणउनी ऐसी नार, जोडली तारीं ॥स०॥३॥

पद ६ वें -
आइक गडि नकल सांगुन घडली । विकल न होयी स्थिर सकल वृत्ति करी ॥धृ०॥
असतां निज सदनिं उगिच उठली ध्वनी । राहिलि दृढ आसनीं, ढकलि चित्त जरि ॥आ०॥१॥
पहातां ग अवचितें, पुढें दिसत पंच भुतें । विचार केला निरुतें, चुकलि वस्तु खरी ॥आ०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ, पंचाक्षरी आला तेथ । दृष्य झडपिलें जेथ, एकलि आत्म उरी ॥आ०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP