मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे| ४१ ते ५० बांदकरमहाराजांची पदे श्रीगुरुबोध ग्रंथ ग्रंथार्पण पत्रिका लघु आत्ममथन प्रारंभः, मंगलाचरण अथ अधिष्ठाण कथन पिंड ब्रह्मांड निवारण सूक्ष्मदेह निवारण स्वमत मत निवारण कारणदेह निवारण महाकारण निरसन जिवन्मुक्ती निरूपणनाम श्रीलघुआत्ममथने स्वात्मतत्त्वामृतशतकम् श्री गणपतीचीं पदें विष्णु महाराज सोमण यांचीं पदें १ ते १० ११ ते २० २१ ते ३० ३१ ते ४० ४१ ते ५० ५१ ते ६० ६१ ते ६७ श्री मारुतीचीं पदें श्री दत्तात्रेयाचीं पदें साधनोपदेशपर पदें श्री संत लक्षणें पदें १ ते १५ १६ ते ३० ३१ ते ४८ श्रीदामोदराचीं पदें श्री नागेशाचीं पदें श्री लक्ष्मीव्यंकटेशाचीं पदें श्री लक्ष्मी नृसिंहाचीं पदें श्री नृहसिंहाचीं पदें श्रीकामाक्षेचीं पदें श्री कपिलेश्वराचीं पदें श्री जगदंबेचीं पदें श्री नारसिंहाचीं पदें श्री नवदुर्गेचीं पदें श्री चंद्रेश्वराचीं पदें श्री मंगेशाचें पद श्री बिंदुमाधवाचें पद श्री शांतादुर्गेचें पद श्री विजयादुर्गेचें पद श्री महालसेचीं पदें श्री महालक्ष्मीचें पद उपदेशपर संवाद श्री विरविठ्ठलाचीं पदें श्री पांडुरंगाचीं पदें श्री रामनाथाचीं पदें श्री मदनंताचीं पदें श्री लक्ष्मी नारायणाचीं पदें श्री पूर्णप्रज्ञतीर्थ स्वामीचें पद श्री पद्मनाभतीर्थ स्वामीचीं पदें श्री इंदिराकांततीर्थ स्वामीचीं पदें श्री नरहरितीर्थांचीं पदें श्रीमुकुंदराज श्रीशितलादेवीचें पद श्रीषष्टीचीं पदें श्री देवकीकृष्णाचीं पदें उपदेशपर पद श्रीजगदंबेचीं पदें श्री गणपतीचें पद श्रीरामाचें पद श्रीबांदकर महाराजांचे स्वतःबद्दलचे उद्गार श्री जगन्नाथ बोवा बोरीकर श्रीकृष्णाचीं पदें गवळण काल्यांतील पदें झुला १ ते १० ११ ते २० २१ ते ३० ३१ ते ४० ४१ ते ५० ५१ ते ६० ६१ ते ७० ७१ ते ८० ८१ ते ९० ९१ ते १०० १०१ ते ११० १११ ते १२० १२१ ते १३० १३१ ते १३९ श्री जगदंबेचे अभंग संतसंगाच्या महिमेचा अभंग शिष्याकरितां केलेला अभंग श्री राघवाष्टक ‘ पतीतपावनराम ’ श्लोकाष्टक ‘ जानकीजीवनराम ’ मंत्रार्याष्टक ‘ राजीवनयनराम ’ श्लोकाष्टक ‘ आनंदघनराम ’ मंत्रार्या श्लोक अभंग श्री आर्या पद अभंग - ४१ ते ५० श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज. Tags : abhangbandkarpadअभंगपदबांदकर अभंग - ४१ ते ५० Translation - भाषांतर ४१ माझ्या जिवीच्या जिवलगा । येरे धांवत लगबगा ॥१॥जीव पावला हा कंठीं । आत्म दर्शन इच्छेनें काळकंठीं ॥२॥ निमिष लव पळ घडि दिवस जाय । तो मज तुजविण युग सम होय ॥३॥माझे अपराथ घालुनि पोटीं । देरे झडकरिं रामा भेटी ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । तुझे पाय वंदिन माथा ॥५॥४२ तुझा माझा हरिल वियोग । ऐसा होईल कधिं आत्मयोग ॥१॥आपुली वाट पाहुनि आहे सीतापती । कधीं करिसी स्थिर माझी मती ॥२॥आज किंवा ऊद्यां येसी । ऐसी जीवा या असोसी ॥३॥दर्शन इछा न भागली । माझी फुकट वयसा गेली ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । कळविलि माझी सर्व गाथा ॥५॥४३ पुरे पुरे केला हट । आतां धांउनि ये झटपट ॥१॥मज तुजविण कंठवेना । तुज असती भक्त नाना ॥२॥बहुत बायकांचा पती । स्त्रिवियोग दुःख नेणे त्याची मती ॥३॥तैसें तुज झालें देवा । मज विसरसि रे राघवा ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । सांगु कोणा माझी कथा ॥५॥४४ प्रभो जानकीच्या नाथा । मज दाखविं आत्म पथा ॥१॥दयासिंधू तूं साचार । मज कळवीं आत्म विचार ॥२॥तरिच माझें जन्म नराचें । होय नातरि पशु वानरांचें ॥३॥वानर उपमा मज न साजे । आत्म भक्त मारुति गाजे ॥४॥अंगद सुग्रिवादि नळनीळ । भक्त समूहचि वानर दळ ॥५॥पशुहुनि मी अज्ञान जड । शुद्ध जातीनें दगड ॥६॥तारिसि नाम बळें पाषाण । त्याहुनि वाटे मी मज ऊणा ॥७॥ऐसी अंतरिंची हरि माझी लाज । साधुनि आत्म दर्शन काज ॥८॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । निकट असुनि न भेटसी हृदयस्था ॥९॥४५ कोण कोणाचीं संसारीं । मिथ्या पुत्र कलत्रादि हीं सारीं ॥१॥एक आपण तारक मज साचा । साक्षी आनंदघन जीवाचा ॥२॥जें दिसतें तें सर्व खोटें । आपण माझें भाग्य मोठें ॥३॥ऐसें आठउनि डोळ्यां वाटे । भळ भळ अश्रु धारा सुटे ॥४॥आपणाविणा रहावेना सर्वथा । भेटी देरे विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥५॥४६ काय माझे दोष पहासी । ऐकुनि बोल उगीच रहासी ॥१॥करिं अपराधांची क्षमा । पदर पसरितों तुज रामा ॥२॥माझ्या जिवाच्या विश्रामा । दाविं आपणातें सुख धामा ॥३॥माझें मीपण जाळुनि टाकीं । भेट आपण येका येकीं ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । सच्चित्सुख ये आपण स्वता ॥५॥४७ ग्रासुनि माझा अहंकार । कळविं आपणचि सुख सार ॥१॥तरि या जन्माचें सार्थक । आपण भेटला जरि देव एक ॥२॥वृत्ती उठती त्या निवारीं । सच्चित्सुखमय आत्मविचारीं ॥३॥स्थीर करीं माझ्या मना । दुरउनि मज विषय कामना ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । करिं माझी सार्थकता ॥५॥४८ रात्र सरली दिवस आला । दिवससरतां रात्रि भाग झाला ॥१॥दिवे लाउनि जागोजागीं । पुढें जेवणाची लगबगी ॥२॥बरी करूनियां खटपट । यथा सांग भरिलें पोट ॥३॥पुढें मारुनि पोट सुस्ती । शयनीं घोरत पडावें निद्रिस्थी ॥४॥निद्रा सरतां जागा होउनि ओरडला । म्हणे कोंबडा आरवला ॥५॥अरे उठारे सकळ । होत आला प्रातः काळ ॥६॥पुढें जेवण्याचि तयारी । बाइकांसी दटवण भारीं ॥७॥नाना जिनसी मिष्ट सांबारीं । भुर्के मारुनि आयुष्य सारी ॥८॥मुर्ख ते वय गेलें सीता कांता । येउनि तारिं विष्णु कृष्ण जगन्नाथा ॥९॥४९ तुज कळविलें वृत्तांता । जें तूं करिसी तें करीं आतां ॥१॥माझा धरूनियां कळवळा । येसि निश्चय हा घननीळा ॥२॥तुज नमितों मी साष्टांग । सोडीं आला जरि तुज माझा राग ॥३॥माझे गुण दोष मज आठवती । करिं मज पावन सीतापती ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । डोळे भरी तुज पाहीन येतां ॥५॥५० आतां शरण मी कोणा जाऊं । तुजवीण प्रभू कैसा राहुं ॥१॥जिविं लागली तळमळ । परि तुज न येची कळवळ ॥२॥आपण सर्वांसी आरंभ । भेटि देरे न करीं विलंब ॥३॥वाट लक्षुनि आपुली आहें । कृपा दृष्टी येउनि पाहें ॥४॥विष्णु कृष्ण जगन्नाथा । तुजठावी अंतर्व्यथा ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP