मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे| ५१ ते ६० बांदकरमहाराजांची पदे श्रीगुरुबोध ग्रंथ ग्रंथार्पण पत्रिका लघु आत्ममथन प्रारंभः, मंगलाचरण अथ अधिष्ठाण कथन पिंड ब्रह्मांड निवारण सूक्ष्मदेह निवारण स्वमत मत निवारण कारणदेह निवारण महाकारण निरसन जिवन्मुक्ती निरूपणनाम श्रीलघुआत्ममथने स्वात्मतत्त्वामृतशतकम् श्री गणपतीचीं पदें विष्णु महाराज सोमण यांचीं पदें १ ते १० ११ ते २० २१ ते ३० ३१ ते ४० ४१ ते ५० ५१ ते ६० ६१ ते ६७ श्री मारुतीचीं पदें श्री दत्तात्रेयाचीं पदें साधनोपदेशपर पदें श्री संत लक्षणें पदें १ ते १५ १६ ते ३० ३१ ते ४८ श्रीदामोदराचीं पदें श्री नागेशाचीं पदें श्री लक्ष्मीव्यंकटेशाचीं पदें श्री लक्ष्मी नृसिंहाचीं पदें श्री नृहसिंहाचीं पदें श्रीकामाक्षेचीं पदें श्री कपिलेश्वराचीं पदें श्री जगदंबेचीं पदें श्री नारसिंहाचीं पदें श्री नवदुर्गेचीं पदें श्री चंद्रेश्वराचीं पदें श्री मंगेशाचें पद श्री बिंदुमाधवाचें पद श्री शांतादुर्गेचें पद श्री विजयादुर्गेचें पद श्री महालसेचीं पदें श्री महालक्ष्मीचें पद उपदेशपर संवाद श्री विरविठ्ठलाचीं पदें श्री पांडुरंगाचीं पदें श्री रामनाथाचीं पदें श्री मदनंताचीं पदें श्री लक्ष्मी नारायणाचीं पदें श्री पूर्णप्रज्ञतीर्थ स्वामीचें पद श्री पद्मनाभतीर्थ स्वामीचीं पदें श्री इंदिराकांततीर्थ स्वामीचीं पदें श्री नरहरितीर्थांचीं पदें श्रीमुकुंदराज श्रीशितलादेवीचें पद श्रीषष्टीचीं पदें श्री देवकीकृष्णाचीं पदें उपदेशपर पद श्रीजगदंबेचीं पदें श्री गणपतीचें पद श्रीरामाचें पद श्रीबांदकर महाराजांचे स्वतःबद्दलचे उद्गार श्री जगन्नाथ बोवा बोरीकर श्रीकृष्णाचीं पदें गवळण काल्यांतील पदें झुला १ ते १० ११ ते २० २१ ते ३० ३१ ते ४० ४१ ते ५० ५१ ते ६० ६१ ते ७० ७१ ते ८० ८१ ते ९० ९१ ते १०० १०१ ते ११० १११ ते १२० १२१ ते १३० १३१ ते १३९ श्री जगदंबेचे अभंग संतसंगाच्या महिमेचा अभंग शिष्याकरितां केलेला अभंग श्री राघवाष्टक ‘ पतीतपावनराम ’ श्लोकाष्टक ‘ जानकीजीवनराम ’ मंत्रार्याष्टक ‘ राजीवनयनराम ’ श्लोकाष्टक ‘ आनंदघनराम ’ मंत्रार्या श्लोक अभंग श्री आर्या पद श्री रामाचीं पदें - ५१ ते ६० श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज. Tags : abhangbandkarpadअभंगपदबांदकर श्री रामाचीं पदें - ५१ ते ६० Translation - भाषांतर पद ५१ वें - चिद्घन मेघश्याम राम आजि पाहुं । भक्त नमो विश्राम राम आजि पाहुं ॥धृ०॥नवरत्नान्वित दिव्य मुकुट । सुकटिं पीतपट भ्रुकुटी विराजित ॥चि०॥१॥कुंदरदन आनंद सदन प्रभु । मंद हसित मुख सुंदर शोभित ॥चि०॥२॥सनकादि स्तुत कनका लंकृत । जानकि जनक नृपसुतालिंगित ॥चि०॥३॥सुरनर कपि आनंद भरित । यत्पद रज भक्तिरसामृत सेवित ॥चि०॥४॥विष्णू कृष्ण जगन्नाथ । अखंड निजात्म सुखासनिं संस्थित ॥चि०॥५॥पद ५२ वें - तूं रामकृष्ण हरि मुखीं गाई रे । यासि कोणाचें कांहिं भय नाहीं रे ॥ सांग लाजसि कशास । जन हांसतिल वाटे कीं मी झटलों अशास ॥या०॥धृ०॥आईबाप बोलतिल या साठीं रे । तूं थरथर कांपसि पोटीं रे । काय करिसि तूं चोरी । उणेपणा पावे थोरी ॥या०॥१॥जिकडे तिकडे सोयरीं धायरीं आमची मोठीं रे । त्यांसि कळेल किं मारितिल सोटीं रे । किंवा घरची नष्टीं भारीं । जावय पुत्र कन्या नारी ॥या०॥२॥नको येउं देउं क्रोध मनामाजी रे । प्रश्नोक्ति हे समजेल सुज्ञ जिंवां माजी रे । सुंदर मनुष्य तनु भजनानंदाविण । आयुष्य व्यर्थ जाई रे ॥या०॥३॥प्रेमें वाजवितां कर टाळी हातीं रे । तरि कोण पहातिल येथें मातें रे । ऐसें दचकुनि मन । मी न करिंच भजन ॥या०॥४॥प्रेमें गाउनि वाजवुं कर टाळी रे । तुज रक्षिल श्रीराम वनमाळी रे । प्रभु विष्णु कृष्ण जगन्नाथ । होइल सहाय ॥या०॥५॥पद ५३ वें - नयनिं राम पाहुनि आनंद झाला ॥धृ०॥शामल सुंदर मूर्ति मनोहर । दर्शनेंचि जिव माझा धाला रे ॥न०॥१॥सच्चित्सुखमय आपण जो अद्वय । त्याचा अनुभव मज आला रे ॥न०॥२॥धन्य धन्य आजिचा दिवस माझा सोनियाचा । कल्पनापुंज निमाला रे ॥न०॥३॥विष्णु कृष्ण जगन्नाथ जाणे ही सकळ मात । उरों नेदी ठाव भवाला रे ॥न०॥४॥पद ५४ वें - जीव जीवन राजीवनयन माझि मनिच्छा पूरक राम । दूर करुनि संशय मी पाहिन, गाइन मज भव पारक राम ॥धृ०॥कायिक वाचिक मानसीक खरा, निश्चय माझा तारक राम । राजाधिराज रामचंद्र परमात्मा जगोद्धारक राम ॥जी०॥१॥पिंवळा पितांबर सांवळा सुंदर आवळावा मनहारक राम । कोटी सूर्य तेजोमय अगणित, लखलख सुखकारक राम ॥जी०॥२॥गार होय मति आनंदभरें, ठसतां हृदय विदारक राम । बसतां उठतां धंदा करितां, अखंड मनिचा स्मारक राम ॥जी०॥३॥साचें त्रिजग नगाचें अद्वय, अधिष्ठान चित्कनक राम । सनक सनंदन ध्याति वंदिति, मानिति जननि जनक राम ॥जी०॥४॥वानिति सुरनर कमलज शंकर, ध्याति सदा निष्कलंक राम । विष्णू कृष्ण जगन्नाथाचा, संकट विघ्न निवारक राम ॥जी०॥५॥पद ५५ वें - वैष्णव सद्गुरु निजला माझा रे । चिद्रत्नासनिं वीराजे आपण राजा रे ॥धृ०॥लक्ष लक्ष्मण चिच्छक्ती जानकि भजा रे । दृष्य अयोध्येचा साक्षी भक्त काजा रे ॥वै०॥१॥विवेक मारुति दीन सदा राम पदाला रे । कृष्ण जगन्नाथ घे आंगें दर्शनाला रे ॥वै०॥२॥पद ५६ वें - रामा दयाघना क्षमा करुनि मज पाहीं । जरि बहु अपराधी खराचि मी अन्यायी । तुजविण पहातां रे पहातां रे संसारीं सुख नाहीं, निमिषभर कांहीं निमिषभर कांहीं ॥रा०॥धृ०॥कोठिल कोण मी न जाणिला हा पत्ता । आजवरि व्यर्थ श्रमविली आई, हेंच मनि खाई ॥रामा०॥१॥नाथ अनाथ तूं माय बापही तैसा । परि मे उद्भवलों पतीत पापी ऐसा । तरि निज नामाचें महत्व सांडिसि कैसा । पावन नामा रे, जाच देति रिपु साही, साच वपु दाही ॥रामा०॥२॥करुणा सागरा राघवा रघुराजा । विषयीं पांगला नका करूं जिव माझा । भजनीं चांगला मिळवीं साधु समाजा । भुलुनि प्रपंचा रे, श्रमुनि भ्रमुनि ठायिं ठायीं, हरुनि वय जाई ॥रामा०॥३॥सच्चित्सुख तो तूं परब्रह्म केवळ । विश्वीं व्यापला तरंगिं जैसें जळ । अवतरतोसि हें उपासकाचें बळ । भक्तजनांला रे, चित्र विचित्र उपायिं, सतत सुखदायी ॥रामा०॥४॥विष्णू कृष्ण जगन्नाथ तुझा मी लेक । चरणीं शरण दे स्मरण आपुलें एक । हातीं संतांची सेवा घडविं अनेक ॥ जगदभिरामा रे, मानस हें तव पायीं, जडविं लवलाहीं ॥रामा०॥५॥पद ५७ वें - विश्वाचा विश्राम रे । स्वामी माझा राम रे । आनंदाचें धाम त्याचें, गाऊं वाचे नाम रे ॥धृ०॥चिद्रत्नाची खाण रे । एकाएकीं जाण रे । प्राणाचाही प्राण माझा । गड्या तुझी आण रे ॥वि०॥१॥देवाचा जो देव रे । तो हा स्वयंमेव रे । अलक्ष्य लक्षुनी साक्षी । घेऊं अंगें खेव रे ॥वि०॥२॥शिवाचा आराम रे । भक्त पूर्ण काम रे । मुक्त योगीजन गाती । जयासी निष्काम रे ॥वि०॥३॥मिथ्या हे अनेक रे । सत्य राम एक रे । विष्णु कृष्ण जगन्नाथ । करी हा विवेक रे ॥वि०॥४॥पद ५८ वें - ऐसा उपकार कैसा विसरूं श्रीरामा । बहुत भाग्यें भेटलासी देवा निजसुखधामा ॥धृ०॥दुर्लभ हे नरतनु देउनियां आह्मां । भक्तिमार्गें लावियलें पूर्ण परब्रह्मा ॥ऐसा०॥१॥घडी घडी कळविसी आपणचि सार । वळवुनी वृत्ति देसी आत्मपदीं थार ॥ऐसा०॥२॥विषय जनित सुख दुःख समजाया । भली युक्ति केली विरतारुनि मिथ्या माया ॥ऐसा०॥३॥धन्य हा प्रपंच केला आत्मदृष्टि सारा । अखंड आनंद दाटे करितां विचारा ॥ऐसा०॥४॥तुजविण देव दयाघन नाहीं कोणी । आत्मभावें कृष्ण जगन्नाथ लोटांगणीं ॥ऐसा०॥५॥पद ५९ वें - आला राम, मेघश्याम, सुंदर भक्त मनोविश्राम ॥धृ०॥टिळक रम्य कस्तुरी कपाळीं । मदन मनोहर मूर्ति सांवळी । भजकां जो सप्रेम आंवळी । पूर्ण करुनियां काम ॥सुं०॥१॥रत्नजडित शिरिं मुकुट विराजे । श्रवणि कुंडलें लखलख साजे । जनक जननि जो त्रिभुवन गाजे । अखंड ज्याचें नाम ॥सुं०॥२॥कंज नयन भव भंजन रघुविर । संत साधु मनरंजन रघुविर । आंजनेयसह जानकिचा वर । शिवगौरी सुखधाम ॥सुं०॥३॥चाप बाण धर त्रिविध ताप हर । कांपति ज्याला योद्धे दुर्धर । जय जयकारें गर्जति वानर । समर्थ ज्याचें नाम ॥सुं०॥४॥विष्णू कृष्ण जगन्नाथाचा । भजनी लंपट स्वभाव साचा । अखंड नाम स्मरणें नाचा । होइल विपद विराम ॥सुं०॥५॥पद ६० वें - रघुराय रघुराय मज दाखविं रे निज पाय ॥धृ०॥करिसि कोणा ठायीं आमुचा । जनक आणि तूं माय ॥मज०॥१॥सार नसुनि संसारीं विटलों । दार पुत्र धन चिंतुनि सुकलों । प्रापंचिक व्यवसाय ॥मज०॥२॥तारक पतितोद्धारक तूं तरि । तारक जन सुखकारक श्रीहरि । तुज न भजत वय जाय ॥मज०॥३॥फार दुष्ट समुदाय व्यापला । भार हरक अवतार आपुला । अजुनि उशिर तुज काय ॥मज०॥४॥वारंवार किति विनवुं आपणा । गार करीं मति हरुनि मीपणा । नुरउनि सर्व अपाय ॥मज०॥५॥विष्णु कृष्ण जगन्नाथ तुझा । आठव अंतरिं देवचि न दुजा । न सुचति अन्य उपाय ॥मज०॥६॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP