मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
झुला

झुला

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


श्रीसद्गुण गुणमंडित राघवराया । अवतरला तूं सज्जन ताप हराया । तुजविण कोणि न मज भवपार कराया । तारक निज पद मक्ति जगासि तराया ॥जय जय रघुवीर समर्थ॥१॥
मत्स्यावतार घेउनि असुरां असती । श्रुतिहर शंखासुर त्वां वधिला निश्चित्ति । विधि शिव इंद्रादिक सुरवर तुज ध्याती । निजावतार चरित्रें वदनी गाती ॥जय जय रघुवीर समर्थ॥२॥
समुद्रमथनी सुरासुरांच्या थाटी । कूर्मरुपें त्वां मंदर धरिता पाठी । वधुनि हिरण्याक्षातें भूमिसी गांठी । वराह रूपें क्रीडसि भक्तांसाठीं ॥जय जय रघुवीर समर्थ॥३॥
प्रकटसि कडकड शब्दें स्तंभामाजी । नृहरे हिरण्य कशिपु वधाच्या काजीं । प्रर्‍हाद तुज परमात्माजी । कळविसि देवा सकळां सुजन समाजीं ॥जय जय रघुवीर समर्थ॥४॥
छळिसि बळीसी वामन रूपें तो तूं । सच्चित्सुखमय मुळिंचा जो निर्हेतु । परिपूर्ण करिशि भक्तांचा जो हेतू । नाम तूझें संसार समुद्रीं सेतू ॥जय जय रघुवीर समर्थ॥५॥
अधर्म मार्गीं जे दुःष्कर्म पसारे । भार्गवरूपें वधिले क्षत्रीय सारे । कामक्रोध रिपु मत्सरादि सारे । गांजिति मज यां वधिसि न अजुनि कसारे ॥जय जय रघुवीर समर्थ॥६॥
दशरथ कौसल्येच्या प्रकटुनि ध्यानी । जन्मा येसि अजन्मा जानकि जानी । शोधुनि वधिले राक्षस अटंग रानीं । रावण मर्दन तूं आमुचा अभिमानी ॥जय जय रघुवीर समर्थ॥७॥
स्थापुनि लंकेमध्यें बिभीषणाला । ससीता पुष्पक विमानि आरुढ झाला । आनंद भरित व्हाया सकल जनाला । सुरनरवानर थाटीं अयोध्ये आला ॥जय जय रघुवीर समर्थ॥८॥
पूर्ण परात्पर परब्रह्म श्रीरामा । स्वभक्त रक्षक मुनिजन मन विश्रामा । विष्णु कृष्ण जगन्नाथ तुझ्या नामा । सदैव गातो ध्यातो सुखैक धामा ॥जय जय रघुवीर समर्थ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP