मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे| श्री जगदंबेचीं पदें बांदकरमहाराजांची पदे श्रीगुरुबोध ग्रंथ ग्रंथार्पण पत्रिका लघु आत्ममथन प्रारंभः, मंगलाचरण अथ अधिष्ठाण कथन पिंड ब्रह्मांड निवारण सूक्ष्मदेह निवारण स्वमत मत निवारण कारणदेह निवारण महाकारण निरसन जिवन्मुक्ती निरूपणनाम श्रीलघुआत्ममथने स्वात्मतत्त्वामृतशतकम् श्री गणपतीचीं पदें विष्णु महाराज सोमण यांचीं पदें १ ते १० ११ ते २० २१ ते ३० ३१ ते ४० ४१ ते ५० ५१ ते ६० ६१ ते ६७ श्री मारुतीचीं पदें श्री दत्तात्रेयाचीं पदें साधनोपदेशपर पदें श्री संत लक्षणें पदें १ ते १५ १६ ते ३० ३१ ते ४८ श्रीदामोदराचीं पदें श्री नागेशाचीं पदें श्री लक्ष्मीव्यंकटेशाचीं पदें श्री लक्ष्मी नृसिंहाचीं पदें श्री नृहसिंहाचीं पदें श्रीकामाक्षेचीं पदें श्री कपिलेश्वराचीं पदें श्री जगदंबेचीं पदें श्री नारसिंहाचीं पदें श्री नवदुर्गेचीं पदें श्री चंद्रेश्वराचीं पदें श्री मंगेशाचें पद श्री बिंदुमाधवाचें पद श्री शांतादुर्गेचें पद श्री विजयादुर्गेचें पद श्री महालसेचीं पदें श्री महालक्ष्मीचें पद उपदेशपर संवाद श्री विरविठ्ठलाचीं पदें श्री पांडुरंगाचीं पदें श्री रामनाथाचीं पदें श्री मदनंताचीं पदें श्री लक्ष्मी नारायणाचीं पदें श्री पूर्णप्रज्ञतीर्थ स्वामीचें पद श्री पद्मनाभतीर्थ स्वामीचीं पदें श्री इंदिराकांततीर्थ स्वामीचीं पदें श्री नरहरितीर्थांचीं पदें श्रीमुकुंदराज श्रीशितलादेवीचें पद श्रीषष्टीचीं पदें श्री देवकीकृष्णाचीं पदें उपदेशपर पद श्रीजगदंबेचीं पदें श्री गणपतीचें पद श्रीरामाचें पद श्रीबांदकर महाराजांचे स्वतःबद्दलचे उद्गार श्री जगन्नाथ बोवा बोरीकर श्रीकृष्णाचीं पदें गवळण काल्यांतील पदें झुला १ ते १० ११ ते २० २१ ते ३० ३१ ते ४० ४१ ते ५० ५१ ते ६० ६१ ते ७० ७१ ते ८० ८१ ते ९० ९१ ते १०० १०१ ते ११० १११ ते १२० १२१ ते १३० १३१ ते १३९ श्री जगदंबेचे अभंग संतसंगाच्या महिमेचा अभंग शिष्याकरितां केलेला अभंग श्री राघवाष्टक ‘ पतीतपावनराम ’ श्लोकाष्टक ‘ जानकीजीवनराम ’ मंत्रार्याष्टक ‘ राजीवनयनराम ’ श्लोकाष्टक ‘ आनंदघनराम ’ मंत्रार्या श्लोक अभंग श्री आर्या पद श्री जगदंबेचीं पदें श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज. Tags : abhangbandkarpadअभंगपदबांदकर श्री जगदंबेचीं पदें Translation - भाषांतर पद १ लें - जगदंबा मूळ माया हे भक्तांसाठीं अवतरली ॥धृ०॥भोग सुखें जग हें नाचाया । जे नटली विषयां पांचा या । त्रिगुणात्मक जीवां वांचाया । सुविचारें उद्धराया, उपनिशदेंशास्त्रें विस्तरली ॥ज०॥१॥जे सदसत् कर्मातें फळवी । सुख विषयांतिल दुःखचि कळवी । सत्संगें आत्मपदीं वळवी । अद्वय आनंद व्हाया, विश्वीं विश्वात्मत्वें भरली ॥ज०॥२॥स्वानुभवें सेवुनि दिनराती । महिमा सज्जन वदती गाती । कृष्ण जगन्नाथा वरदांतीं । आठवितां विष्णु पाया, जन्म मरण भ्रांती निस्तरली ॥ज०॥३॥पद २ रें - आली उदयासि ईश्वर माया, हे निज सुख द्याया, नटली हें विश्व त्रिगुणमय काया, जीवासि रमाया । विषय भोग सुख सोंग वाटउनि, अखंड ब्रह्मानंदचि व्हाया ॥आ०॥१॥ऐसा महिमा सद्भक्त महंतां, आवडला संतां, भजती स्वानुभवें त्यजुनि अहंता, प्राण्या गुणवंता । पदोपदीं जे सदोदित विषय मदोन्मत्त दैत्यांसि वधाया ॥आ०॥२॥केला उपकारचि हा मज वाटे, आनंद दाटे, हरिले संसार दुःखमय कांटे, अद्वैत वाटे । राम विष्णु कृष्ण जगन्नाथ स्मरणें आत्मत्वांत मिळाया ॥आ०॥३॥पद ३ रें - महाकाली महा सरस्वति महालक्ष्मी जगदंबा । महा आवडी पहावया ज्या सहाय भक्त कदंबा ॥म०॥धृ०॥अघटित घटना शक्ति प्रगटल्या सच्चित्सुखा स्वयंभा । बाह्याभ्यंतर व्यापक लख लख प्रकाश विपुल नितंबा ॥म०॥१॥वानिति गुण सन्मान पुरःसर सुरवर अंबाबाई । उदोउदो हा शब्द करुनियां नाचति ठाईं ठाईं ॥म०॥२॥विष्णू कृष्ण जगन्नाथासि कळविति मिथ्या माया । शांत वृत्ति एकांत स्थितीनें आप्त सुखांत रमाया ॥म०॥३॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP