मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्री गणपतीचें पद

श्री गणपतीचें पद

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


श्रीगणपति गणराया, भक्तांसी सौख्य व्हाया । अवतरला सिंधुरकमल गणाधिक दैत्य वधाया ॥धृ०॥
निजपदीं प्रेमजडला, त्यां आत्मलाभ घडला । अखंड सुखमय जो तूं आपण, तो मज सांपडला ॥श्री०॥१॥
प्रगटुनि मायबापा, तूं हरिसी त्रिविध तापा । प्रिय सुख रज्जु आपण नुरविसि, मिथ्या भय सापा ॥श्री०॥२॥
आनंद सुरसमाजा, त्वां केला गणराजा । विघ्न समूह परिहरुनि मनोरथ, पूर्ण करीं माझा ॥श्री०॥३॥
विष्णू कृष्ण जगन्नाथा कर ठेवीं वरद माथा । साच्चित्सुख आपण मजला भेटुनि वदविसि गुणगाथा ॥श्री०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP