मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे| बांदकरमहाराजांची पदे श्रीगुरुबोध ग्रंथ ग्रंथार्पण पत्रिका लघु आत्ममथन प्रारंभः, मंगलाचरण अथ अधिष्ठाण कथन पिंड ब्रह्मांड निवारण सूक्ष्मदेह निवारण स्वमत मत निवारण कारणदेह निवारण महाकारण निरसन जिवन्मुक्ती निरूपणनाम श्रीलघुआत्ममथने स्वात्मतत्त्वामृतशतकम् श्री गणपतीचीं पदें विष्णु महाराज सोमण यांचीं पदें १ ते १० ११ ते २० २१ ते ३० ३१ ते ४० ४१ ते ५० ५१ ते ६० ६१ ते ६७ श्री मारुतीचीं पदें श्री दत्तात्रेयाचीं पदें साधनोपदेशपर पदें श्री संत लक्षणें पदें १ ते १५ १६ ते ३० ३१ ते ४८ श्रीदामोदराचीं पदें श्री नागेशाचीं पदें श्री लक्ष्मीव्यंकटेशाचीं पदें श्री लक्ष्मी नृसिंहाचीं पदें श्री नृहसिंहाचीं पदें श्रीकामाक्षेचीं पदें श्री कपिलेश्वराचीं पदें श्री जगदंबेचीं पदें श्री नारसिंहाचीं पदें श्री नवदुर्गेचीं पदें श्री चंद्रेश्वराचीं पदें श्री मंगेशाचें पद श्री बिंदुमाधवाचें पद श्री शांतादुर्गेचें पद श्री विजयादुर्गेचें पद श्री महालसेचीं पदें श्री महालक्ष्मीचें पद उपदेशपर संवाद श्री विरविठ्ठलाचीं पदें श्री पांडुरंगाचीं पदें श्री रामनाथाचीं पदें श्री मदनंताचीं पदें श्री लक्ष्मी नारायणाचीं पदें श्री पूर्णप्रज्ञतीर्थ स्वामीचें पद श्री पद्मनाभतीर्थ स्वामीचीं पदें श्री इंदिराकांततीर्थ स्वामीचीं पदें श्री नरहरितीर्थांचीं पदें श्रीमुकुंदराज श्रीशितलादेवीचें पद श्रीषष्टीचीं पदें श्री देवकीकृष्णाचीं पदें उपदेशपर पद श्रीजगदंबेचीं पदें श्री गणपतीचें पद श्रीरामाचें पद श्रीबांदकर महाराजांचे स्वतःबद्दलचे उद्गार श्री जगन्नाथ बोवा बोरीकर श्रीकृष्णाचीं पदें गवळण काल्यांतील पदें झुला १ ते १० ११ ते २० २१ ते ३० ३१ ते ४० ४१ ते ५० ५१ ते ६० ६१ ते ७० ७१ ते ८० ८१ ते ९० ९१ ते १०० १०१ ते ११० १११ ते १२० १२१ ते १३० १३१ ते १३९ श्री जगदंबेचे अभंग संतसंगाच्या महिमेचा अभंग शिष्याकरितां केलेला अभंग श्री राघवाष्टक ‘ पतीतपावनराम ’ श्लोकाष्टक ‘ जानकीजीवनराम ’ मंत्रार्याष्टक ‘ राजीवनयनराम ’ श्लोकाष्टक ‘ आनंदघनराम ’ मंत्रार्या श्लोक अभंग श्री आर्या पद श्री रामाचीं पदें - ११ ते २० श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज. Tags : abhangbandkarpadअभंगपदबांदकर श्री रामाचीं पदें - ११ ते २० Translation - भाषांतर पद ११ वें -दिन रजनीं पाहुं राघवा राम मंदहसित मुख कमल लोचन दिन० ॥धृ०॥वामजानुवरी विराजे विमला सीता नारी रे । कोटि विद्युत्प्रकाश अंगीं दशदीशा फांके आघवा । दोघे चंवंरें ढाळिति ज्यासी भरत शत्रुघ्न ॥दि०॥१॥नित्य ध्यानीं मग्न जयासी जपतां मदनारी रे । विषताप निरसन झाला अनुभव हा गिरिजाधवा । सव्यभागिं लक्ष्मण करीं चाप बाण ॥दि०॥२॥राम विष्णु पादाब्जिं लंपट कृष्ण मधुहारि रे । तैसे वानरगण बिभीषण रामिं रमुनीं घेति वाहवा । पदीं ठेवुनि शिर न हाले अंजनिं नंदन ॥दि०॥३॥पद १२ वें - सुदिन हाचि मज वाटे धन्य धन्य बहु जन्म उपार्जित पुण्य पदरिं तेणें, राघव चरण आजि देखिले नयनीं ॥धृ०॥झग झगित मुकुट शिरीं कुंडलें कानीं । लख लख होति गळां माळ वैजयंति । सांवळा सुंदर ऐसा नाहिं त्रिभुवनीं ॥सु०॥१॥रत्न जडित सिंहासनीं श्रीरामधनी । भासे कोटि दिनमणी उदय चाप पाणी । वामजानुवरी सीता जनक नंदिनी ॥सु०॥२॥राम विष्णु पद कमलीं । कृष्ण अलि तेवि करुनी । शिर नम्र मारुति प्रेमें भक्तिसुख सेवि दिन रजनीं ॥सु०॥३॥पद १३ वें - रामीं रमवुं मना नाहीं सार ज्या विना ॥धृ०॥विषयिं न कांहीं सौख्य समजतां रे । किति भुलूं स्त्री सुत धना ॥रा०॥१॥नरतनु दुर्लभ अनुकूल असतां रे । वेगें साधूं आत्म साधनां ॥रा०॥२॥विष्णु गुरु कृपा कृष्ण विवरितां रे । पावे आंगें सुखसदना ॥रा०॥३॥पद १४ वें - धिकाये चित्स्वधन नित्य विचारें जन श्रीरामी रंगारे ॥धृ०॥साधिं साधि आत्मता सोहं प्रियें । सांडुनि कलित विषय संगा रे । न दीन व्हारे स्वसुखें डोलें उमजुनियां निज अंगा रे ॥धि०॥१॥नाधि व्याधि विवरितां स्वरूप स्वयें । सहजें जाति त्रिताप भंगा रे । कधीं न बारे दुर्दैवें पोळे सेविं अमृत चिद्गंगारे ॥धि०॥२॥विष्णु गुरु पदाब्ज मिळतां अद्वयें । कृष्ण भ्रमर प्रेमें गुंगारें । अधीक थोर चिन्मधु मोलें नुरवुनि मीपण चंगारे ॥धि०॥३॥पद १५ वें - नांदवि त्रिभुवन जो जगजीवन । पतितपावन दशमुख कंदन ॥धृ०॥मति वरि पसरा देव न दुसरा । हृदयिं न विसरा श्री रघुनंदन ॥नां०॥१॥सज्जन पालक ब्रह्मांड चालक । श्री राघव एक हरि भव बंधन ॥नां०॥२॥विष्णु गुरू तोच श्रीराम रुचतो । कृष्णा जगन्नाथ सुखरुप करि वंदन ॥नां०॥३॥पद १६ वें - नव नव सुख जिवलग रामीं रमतां । फिरतां संसारीं मन स्थिरता न कधिं वाटे ॥धृ०॥मानितां सुख विषय दुःख बहु विध होय । मुखचि न पाहूं यांचें लागती अंगासि कांटे ॥न०॥१॥सांडुनि देह मीपण असतां एक आपण । सहज सांपडे खुण आनंदें आनंद दाटे ॥न०॥२॥सदय विष्णु गुरु चरण हृदयिं धरुं । कृष्ण जगन्नाथ चाले ऐश्या या सुगम वाटे ॥न०॥३॥पद १७ वें - जिवलग रम पाहुं या चला । देह अयोध्येमाजी हृदयस्थानीं प्रगटला ॥धृ०॥दों दिवसांचें भाग्य न साचें । नाम वाचे उच्चारुनि पाउल ऊचला ॥जि०॥१॥द्वैत भावना जेथ शिरेना । पूर्ण ब्रह्मानंदरूप अद्वय संचला ॥जि०॥२॥विष्णुगुरु कृपा अक्षय रूपा । विवरितां कृष्ण जगन्नाथ हा वांचला ॥जि०॥३॥पद १८ वें - श्रीराम नाम गाउं सुखासाठीं ॥धृ०॥धरुनि संसार पोटीं वदतां विषय गोष्टि । काय लाभ हो शेवटिं उमजा मनासी ॥श्री०॥१॥करितां प्रपंच र्हाटी वय जाय आटाआटीं । काळ लागलासे पाठीं न कळतां ग्रासी ॥श्री०॥२॥वैष्णव सद्गुरु भेटी नुरवुनि दुःखें कोटी । कृष्ण जगन्नाथ घोंटी स्वरुपानंदासी ॥श्री०॥३॥पद १९ वें - उमज मनीं रामचि जग हें रामचि जग न धरिं कांहिं उबग । कीं रज्जु भुजग जेविं कनक नग ॥धृ०॥दृष्य पसारा द्रष्टा सारा । सूर्यकिरण मृगजल जैं झगझग ॥उ०॥१॥अद्वय आपण हे विवरीं खुण । ज्यापरि जलतरंग तेविं अनुभविं मग ॥उ०॥२॥विष्णुगुरु चरणिं कृष्ण जगन्नथ सहज । सुखाचा ढीग होय जाय तग मग ॥उ०॥३॥पद २० वें - केवल माझा प्राणसखा रघुवीर । ज्याविण एक क्षणही न धरवे धीर ॥के०॥धृ०॥इष्टमित्र सुहृदयात्पहि जिवलग, वाटति न जाणत्या जना । ऋणानुबंधें गांठी स्त्रीपुत्रांची, काय मोहुं या देहादिका धना, कळला प्रपंच मिथ्यामय मृगनीर ॥के०॥१॥मन पवनाचा संग सुटूनी, एकांति मीपणा विना । आपण आनंदमय स्वरूप अद्वय, अखंड भोगितां न उरे वासना, सर्वात्मत्वें नटला गुण गंभीर ॥के०॥२॥विष्णु गुरुपद प्रसाद ज्यावरी, त्याला जन्म ना पुन्हां । श्रीराम भक्ती निज आत्मैक्यें घडतां, समुळीं विवरे द्वैत भावना, अनुभव कृष्ण जगन्नाथाचा स्थीर ॥के०॥३॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP