मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे २७१ ते २७५

मराठी पदें - पदे २७१ ते २७५

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद २७१
बांधागे बाई या कृष्णाला रज्जुनें ॥धृ॥
आमुचे घरचें खातों लोणी । तेव्हां ह्मणतो मीच धनी ।
आतां दिसतो चोरावाणी । नलगे सांगणे यशोदे लागी ॥१॥
अनेक गोपी मिळोन आल्या । दावें घेउनी गोळा झाल्या ।
चोर ह्मणतां नाहीं भ्याला । घ्यागे उसने अपुलाले घ्यागे ॥२॥
प्रतिदाव्याच्या बंधनें । दोन बोटें दावे उणें ।
यशोदा श्रमली तेणें । आतां कैसें करणें । बंधनालागि आतां ॥३॥
बाळ नोहे हा परिपूर्ण । नित्य मुक्त निरंजन ।
याचा कैचे वो बंधन । सोडा मिपणें बांधा या लागिं तुह्मी सोडा मीपण ॥४॥

पद २७२
भक्तियोगें होतें सर्व । सोडुनि द्यारे तुह्मी गर्व ॥
साधा नरदेहाचें पर्व । देव जोडा खराखुरा ॥१॥
गवळियाचें भाग्य थोर । जाला श्रीहरी किशोर ॥
जावोनिया सर्व घोर । लाभ झाला दूसरा ॥१॥
दशरथाचें साधन । मारुनि तपस्वी श्रावण ॥
पोटा रामलक्षूण । आले काय विचारा ॥२॥
प्रल्हादाचे कुळीं काय । विष्णु द्वेषाचा उपाय ॥
तेथें नरसिंहाचे पाय । रक्षण करिती लेकुरा ॥३॥
निरंजनिं हाचि भाव । सर्वी वसतसें देवं ॥
भक्तिभावें प्रकट होय । लहानथोर पामरा ॥४॥

पद २७३
हरिचे गुण गाई । नरतनु गेल्यावरुतें मनुजा करसिल मग काई ॥
हस्तपादकर्णादिक इंद्रिय सावध जंव कांहीं ॥
तंववरि भगत्प्रसाद सत्वरिं संपादुनि घेई ॥१॥
वाणीचा व्यापार निरंतर सारा विषयीं ॥
मन चंचल चक्रापरि फिरतें विषयाचे ठायीं ॥२॥
श्रीहरिप्राप्तीसाठीं शरण संतातें जाई ॥
निरंजनपद अविनाशी मग पावसि लवलाही ॥३॥

पद २७४
अरे हरि । तुझि संगत नाहि रे बरी ॥धृ०॥
तूं शिरसि घरोघरीं । अरे हरि ॥ दहिदुधाचि करिसि चोरी । अरे हरी ॥
लोणि झुगारिसि दुरी । खाविसि माकडाकरीं ॥१॥
अह्मि गवळियाच्या नारी । फितविल्या अमच्या पोरी ॥
रस्त्यांत धरिसि पदरीं । अवळुनिया धरिसि उरीं ॥२॥
मूलाचि करिसि मस्करी । खिजविसी नानापरी ।
घेसि हीरोनि सीदुरि । तयांसि करिसि हुंबरी ॥३॥
गाई खाजविसि निजकरीं । तया धरुनिया आधरीं ।
दुध पिसी वरचेवरी । पाहतांचि मारिसि मुरी ॥४॥
यशोदे सांगिनं जरी । उसळासि बांधिन तरी ।
निरंजन अससि परी । तुझि जाइल मातबरी ॥५॥

पद २७५
स्थापियला हो आह्मि हृत्कमळीं रामघनश्यामहरी ॥धृ॥
जो कां नित्य निर्विकार । नाहीं ज्यासि अंतपार ।
शुद्ध ब्रह्म निराकार । साराचें निजसार हे ॥१॥
संकल्पें विश्व करी । रुद्रविरंचि होउनि हरी ।
प्रजन स्थिती प्रळय करी । नाना अवतार धरि हो ॥२॥
भक्तरक्षन हेचि कृती । धरूनि चापबाण हातीं ॥
पिशिताशन वधुनि किती । टाकियले नाहिं गणती हो ॥३॥
निरंजनी हेचि मति । रामनामीं परमप्रीति ।
गुरुवर हे सहजगती । ज्ञानध्यान आलें हातीं हो ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP