मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे ८६ ते ९०

मराठी पदें - पदे ८६ ते ९०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद ८६
आह्मी झालों निर्भर सर्वापरी । पापपुण्य झोकुनि दिल्हें दूरी ॥धृ॥
सांडियले आश्रम वर्ण धर्म । स्नानसंध्या सर्वही कियाकर्म ॥१॥
नि:संगाचे संगती संग केला । ह्मणुनिया सर्वही संग गेला हो ॥२॥
निरंजनें रघुवीर अनुभविला । सर्वापरि निर्भय सदा झाला ॥३॥

पद ८७
संसार सोडुनि आतां । परमार्थी जाग रे ॥धृ॥
शिष्णोदरगोडीसाठीं । वेचिल्या आयुष्यकोटी ।
जिवित्वासी झाल्या तूटी । वृथा शीणभाग रे ॥१॥
आप्तवर्ग जाया पुत्र । धनासाठीं सर्व मित्र ।
दुष्टनष्ट अपवित्र । मेल्या देती आग रे ॥२॥
निरंजन ऐसें पाही । दुजे ठायीं सौख्य नाहीं ।
आतां विश्रांतिसी कांही । रघुवीरासि माग रे ॥३॥

पद ८८
दत्तात्रय चतुराक्षेरि मंत्र वाचे उच्चारा । निशिदिनिं हृदयी ध्यातां चुकवी जन्ममरणफेरा ॥धृ॥
दशदिशांप्रति अगमन ज्याचें एकट निर्द्वंद्व ।
दश अवतारा वरुते विष्णुस्वरुपाचा कंद ।
दत्तचित्त ज्या हृदयीं ध्यातां करि ब्रह्मानंद ॥१॥
तापसियांचा तापशमन जो सर्वांचा त्राता ।
तारितसे भवसागरिं जडमूढ नाम वदनिं गातां ।
तांतडिनें उडि घालित ज्यापरि बाळकासि माता ॥२॥
त्रै देवांचें स्वरूप तें हें जाणें एकत्र ।
त्रैलोक्याचा चाळक ह्मणवी अत्रीचा पुत्र ।
त्रैअवस्था स्वरूप प्रगटवी जेवि कां मित्र ॥३॥
एकचि स्वरूप सर्वांतरिं तो आहे अद्वय ।
यशकीर्ति तुह्मी गारे त्याची होउनि तन्मय ।
यमाचें भय नाहीं निरंजन जाला निर्भय ॥४॥

पद ८९
देव देवा मागणें हेंचि तुला । सोडवावें संसाराहुनि मला रे ॥धृ॥
कन्यापुत्र नलगेती संतान । वंश माझा होऊं दे नि:संतान ॥१॥
सरोनिया जाऊम दे सर्वधन । घरालागि लागूं दे हूताशन ॥२॥
मरोनिया जाऊं दे नजिकांता । वृत्ति सर्व होऊं दे वाताहाता ॥३॥
निरंजन इतुकें झाल्यावरी । सुखरुप होईल सर्वापरी ॥४॥

पद ९०
गुरुराज दयाळु ऐसा झाला । त्यानें बिंदू असताम केला ॥धृ॥
हृदाकाशीं दाविलें मज ध्यान । चिदाकाश व्यापिलेसें संपूर्ण ॥१॥
तेणें मनिं विस्मयसा वाटला । ब्रह्मानंद मानें यसी कोंदाटला ॥२॥
देहभाव सर्वहि लया गेले । योगनिद्रा समाधि आंगीं डोले ॥३॥
निरंजन जाली वृत्ति स्थीर । निश्चळत्वें पाहिला रघुवीर ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP