मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत मराठी पदें.|
पदे २४१ ते २४५

मराठी पदें - पदे २४१ ते २४५

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


पद २४१
रामसुंदर शामसीता वामलोचनि लक्षण हनुमान सुग्रिध
अंगदादिक सर्व वानर पुष्करारूढ होउनि अतिसंभ्रमें बहु
मंडळीसह विजयि होउनि राम ॥धृ॥
राम निजसुखधाम पूर्णकाम मनविश्राम पावननाम ऐकुनि
यम कांपत व्योमकेशा प्रेमसंभ्रम दैत्यकुळीचा होम होउनि
व्योमपंथें नेमरक्षित सांडुनि श्रम ॥१॥
भरत इच्छित संग सप्रजपुंग उडवित रंग चमूचतुरंग सुलक्षणरंग
बहुत तुरंग विराजित अंग तळपति मृंग निनदति
तुंग भेरि भृदुंग वेणुरव चंग अयोध्ये राम ॥२॥
देव किन्नर इंद्र अप्सर जानकिवर पूजुनि सुर गेलियावर
युक्त परिचर छत्रचामर टाळिती वर रूप नागर युवतिसुंदर सौध
शीखर राहुनि भर पुष्प वर्तति जोडुनि कर नीरंजनप्रभु राम ॥३॥

पद २४२
क्षेत्रपाळा रे भैरव कळिभाळा ॥धृ॥
इंद्रनीळसम कीळ वपूवरि पीळ मिशाचा भाळ विशाळा ॥१॥
भीमपराक्रम दंडभयंकर खंड करिसि दानव अवळीला ॥२॥
पुंगि नाद हरि खेद मनाचा भेद दवडुनि धरिसी त्रिशूळा ॥३॥
डमरुनिनदतव गोड करुनि बरि होउ निरंजन वर्णितसे लीळा ॥४॥

पद २४३
सांब गावारे शंकर हर भोळा ।
रुंडमाळा शिरिं व्याळ विराजित हळाहळ करि कंठिं झळाळा ॥१॥
जटाजूट शिरिं धुवट दिसतसे स्पष्टपणें श्रीविष्णूबाळा ॥२॥
व्याघ्रांबर गजचर्मांबर करि मृगवरसेवित चंडत्रिशूळा ॥३॥
नंदीवहन हारकामदहनकर निरंजन वर्णितसे लीळा ॥४॥

पद २४४
येई येई शिवविश्वनाथ देवा रे ।
काशिक्षेत्राधीप अविनाश मूर्ती रे ।
सर्व जगदांतरि तुझी ज्ञान स्फूर्ती रे ।
सिद्ध साधक जन वर्णिताति कीर्ती रे ।
सुरपति अहि किन्नरनर रजनीचर करिती सर्व सेवा रे ॥१॥
बाण रावण आणि चंडिनंदि ढवळा रे ।
भृंगि रिठी धुंडिदेवि शैल बाळा रे ।
ब्रह्मा हरि इंद्र वरुण करुनि भूतें गोळा रे ।
तालगीत बहु संगित नत्य करिसि करुनि हावभावा रे ॥२॥
नंदीवहन कामदहन रुद्र अक्षभूषा रे ।
भस्म गुंठुनिया वेष्टिसि अहीशा रे
भक्त कल्पद्रुम निजजन परितोषा रे ।
स्वपद शरन हरुनि मरण करुनि तरन देशी निजठेवा रे ॥३॥
सत्य निर्गुण निष्क्रिय सौख्यराशीरे ।
विष्व व्यापक तूं सर्वांतरवासी रे ।
नित्य निरंजनपणें राहिलाशी रे ।
मातातीत पूर्णब्रह्म द्वैतरहित एकपणें जीवावेसी जीवा रे ॥४॥

पद २४५
धन्य या नरदेहा आलों कृपा केलि देवा रे ।
सद्गुरुच्या योगें ठाई पडला निजठेवा रे ॥धृ॥
गजतुंगादि देही बरडावरती पेरुनि ओवा रे ।
ज्ञानजळाविण सुकोनि गेला पडोनि वरता मोवा रे ॥१॥
बहुजन्माचें सुकृत फळलें सांपडला देह केव्हां रे ।
श्रवणें मननें भगवद्भजनें घडली साधुसेवा रे ॥२॥
धनदारासुत संपत्तिचा बहु पडला होता गोवा रे ।
देहयंत्रावरि फिरोनि उलटा उडोनि गेला रावा रे ॥३॥
नामरुपात्मक मिथ्या अवघ्या समजुनि हरिच्या मावा रे ।
निरंजनिं रघुनाथप्रसादें जाला पूर्ण विसावा रे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP