मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक ७९

शतश्लोकी - श्लोक ७९

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


रक्षन् प्राणैः कुलायं निजशयनगतं श्वासमात्रावशेषैर्मा-
भूत्तप्रेतकल्पाकृतकमिति पुनः सारमेयादिभक्ष्यम् ।
स्वप्ने स्वीयप्रभावात्सृजति हयरथान्निम्नगाः पल्वलानि
क्रीडास्थानान्यनेकान्यपि सुहृदबलापुत्रभित्रानुकारान् ॥७९॥

अन्वयार्थ-‘(इदं) प्रेतकल्पाकृतकं पुनः सारमेयादिभक्ष्यं मा भूत्  इति श्वासमात्रावशेषैः प्राणैः निजशयनगतं कुलायं रक्षन् (यत्र कुत्रापि याति इति पूर्वेण संबन्धः)-’ हें शरीर प्रेतासारखें अमंगल किंवा कोल्ह्या-कुत्र्यांचें भक्ष्य होऊं नये म्हणून केवल श्वासरूपानें अवशिष्ट रहाणार्‍या प्राण्यांच्या योगानें स्वतःच्या शय्येवर पडलेल्या शरीराचें रक्षण करणारा जीवात्मा हवा तेथें जातो. ‘स्वप्ने स्वीयप्रभावात् हयरस्थान् निम्रगाः पल्वलनि अनेकानि क्रीडास्थानानि अपि च सुहृदबलापुत्रामित्रानुकारन् सृजति-’तो स्वप्नावस्थेंत स्वतःच्या सामर्थ्यानें घोडे, रथ, नद्या लहान जलाशय, अनेक विहारस्थानें तसेंच सुहृद्, स्त्रिया, पुत्र, मित्र इत्यादिकांना पूर्वीच्या सुहृदादिकांप्रमाणेंच उत्पन्न करितो. पूर्व श्लोकांत देहाला पूर्वस्थळींच सोडून जीवात्मा जातो असें म्हटलें आहे. पण त्याविषयीं ‘तो ह्या देहाला जीवंत अवस्थेंत सोडतो कीं निर्जीव अवस्थेंत सोडतो? जिवंत अवस्थेंत सोडीत असल्यास पूर्वीप्रमाणें तो देहव्यापार कां करीत नाहीं? व निर्जीव अवस्थेंत सोडित असल्यास त्यामध्यें श्वास कसा राहतो?’ असे प्रश्र्न कोणी करतील म्हणून आचार्य ह्या व पुढच्या श्लोकांत त्यांना उत्तर देतात- पूर्वी निजलेल्या ठिकाणींच असणार्‍या निश्चेष्ट शरीराची आप्तांनी शवाप्रमाणें व्यवस्था करूं नये किंवा वासावरून शवाला ओळखणार्‍या पशुपक्ष्यांनीं त्याला खाऊं नये म्हणून केवल श्वासरूपानें मागें राहणार्‍या प्राणांनीं त्याचे रक्षण करून स्वाप्नभोग भोगण्याकरितां हा अंतरात्मा इष्ट स्थळीं जातो; व स्वतःच्या ज्ञानसामर्थ्यानेंच तो अनेक काल्पनिक विषय निर्माण करितो. प्राण जड असल्यामुळें त्यांना प्रेरणा करणारा कोणी तरी सचेतन असल्यावांचून त्यांची क्रिया होणें संभवनीय नाहीं, म्हणून ‘अंतरात्मा प्राणांना श्वासरूपानें शरीररक्षण करण्याकरितां ठेवून जातो’ असें म्हटलें आहे ७९


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP