मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक ७४

शतश्लोकी - श्लोक ७४

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


यद्वत्सौख्यं रतान्ते निमिषमिह मनस्येकताने रसे स्यात्स्थैर्यं
यावत्सुषुप्तौ सुखमनतिशयं तावदेवाथ मुक्तौ ।
नित्यानंदः प्रशांते हृदि तदिह सुखस्थैर्ययोः साहचर्यं
नित्यानंदस्य मात्रा विषयसुखमिदं युज्यते तेन वक्तुम् ॥७४॥

अन्वयार्थ-‘इह रतान्ते मनसि एकताने रसे सति यद्वत् निमिषं सौख्यं स्यात्-’ सर्वानुभवसिद्ध संभोगाच्या अंती मन शृंगार रसाशीं एकरूप (शृंगार रसमय) झालें असतां जसें क्षणभर सुख होतें; ‘तथा सुषुप्तौ मनसि यावत् स्थैर्य तावदेव अनतिशयं सुख भवति-’ तसेंच निद्रावस्थेंत मनामध्यें जेवढी स्थिरता तेवढेंच निरतिशय सुख जसें होतें, ‘अथ मुक्तौ हृदि प्रशांतेसिर्ति नित्यानंदःभिवर्ति-’
त्याचप्रमाणें मोक्षावस्थेमध्यें अंतःकरण शांत झालें असतां नित्यानंद होतो. ‘तत् सुखस्थैर्ययोः इह साहचर्ये अनुभवसिद्ध-’ त्याअर्थी सुख व चित्तस्थैर्य यांचें लोकांत साहचर्य आहे (हें अनुभवसिद्ध झालें.) ‘ तेन इदं विषयसुखं नित्यानंदस्य मात्रा इति वक्तुं युज्यते-’ ह्यावरून हें विषयजन्य सुख हा नित्यानंदाचा एक अंश (कला), असें म्हणणें युक्त आहे. आतां ह्या श्लोकांत विषयसुखें नित्यानंदाच्या कला आहेत; हें दाखविण्याकरितांच आणखीं दोन-तीन दृष्टांत देतात. स्त्रीसंभोगाचे अंती मन विषय रसांत तल्लीन (एकाग्र) होऊन गेलें असतां एक क्षणभर सुख होतें. गाढ निद्रा लागली असतांहि मन स्थिर होतें व तें स्थिर असेपर्यंत जीवाला अत्यंत आनंद होतो. मुक्तीमध्येंहि अंतःकरण अत्यन्त शांत झाल्यामुळें नित्यानंदाचा अनुभव येतो. त्याअर्थी चित्तस्थैर्य असेल तर आनंद व तें नसेल तर आनंदाचा अभाव असें अन्वयव्यतिरेकानें यांचें साहचर्य (व्याप्ति) सिद्ध झालें; आणि याच कारणास्तव विषयसुख ही नित्यानंदाची एक कला आहे असें ह्मणणें संयुक्तिक होय. येथें आनंदकोश प्रकरण समाप्त झालें] ७४


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP