मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक ३८

शतश्लोकी - श्लोक ३८

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


स्वप्ने मंत्रोपदेशः श्रवणपरिचितः सत्य एष प्रबोधे
स्वाप्नदेव प्रसादादभिलषितफलं सत्यतां प्रातरेति ।
सत्यप्राप्तिस्त्वसत्यादपि भवति तथा किं च तत्स्वप्रकाशं
येनेदं भाति सर्वं चरमचरमथोच्चावचं दृश्यजातम् ॥३८॥

अन्वयार्थ-‘स्वप्ने मंत्रोपदेशः श्रवणपरिचितः सन् एषः प्रबोधे सत्यः (भवति)-’ स्वप्नातील (गुरूंचा) मंत्रोपदेश कर्णगोचर झाल्यानें जागृत झाल्यावर प्रातःकालीं तो सत्य होतो. (जशाचा तसा आठवतो.) ‘तथा स्वप्नांत (ईश्वर-) प्रसादानें प्राप्त झालेलें इष्ट फल सकाळीं खरें ठरतें. ‘तथा (च) सत्यप्राप्तिः तु असल्यात् अपि भवति-’ त्याअर्थी सत्याची प्राप्ति असल्यापासून सुद्धां होते. ‘किंच येन इदं सर्वे चरं अचरं अथ उच्चवचं दृश्यजातं भाति तत् स्वप्रकाशं (अस्ति)’ शिवाय ज्याच्या योगानें हें सर्वही स्थावरजंगमात्मक व उच्च-नीच दृश्यजात भासते (प्रतीतीला येतें) तें आत्मस्वरूप स्वप्रकाश आहे. जग्रदवस्था मिथ्या आह असें स्वप्नदृष्टान्तानें सांगितलें असतां त्या अवस्थेमध्यें गुरूपदेशानें व उपनिषदांच्या विचारानें होणारा ब्रह्मबोध व ज्या ब्रह्माचा अशा मिथ्या जाग्रदवस्थेत बोध होणार तें ब्रह्म हीं दोन्ही वंध्यापुत्राप्रमाणें मिथ्याच असलीं पाहिजेत अशी शंका कोणी घेतील ह्मणून आचार्य म्हणतात- गुरु प्रिय शिष्याच्या स्वप्नांत येऊन त्याला मंत्राचा उपदेश करितात. तो मंत्र त्याच्या सूक्ष्म श्रवणेंद्रियाशीं परिचित झाल्यानें प्रातःकालीं जशाच्या तसा आठवतो. म्हणजे तो मंत्रोपदेश सत्य ठरतो. तसेंच, एखादा पुरुष ईश्वराच्या अनुग्रहानें स्वप्नांत इष्टफल मिळालेंसें पहातो व तीच गोष्ट सकाळी खरी ठरते (प्रत्ययाला येते). स्वप्नांत एखाद्याला मित्रादिकांचें पत्र आल्याचें दिसतें, किंवा कोणी रोगग्रस्त आप्त बरा होण्याचें शुभसूचक स्वप्न पहातो; व तसाच त्याला जागेपणीं पुढें अनुभवही येतो. सारांश असल्यापासून सुद्धां सत्याची प्राप्ति होते; ही गोष्ट सिद्ध झाली, त्याअर्थी मिथ्या जग्रदवस्थेमध्यें होणारा ब्रह्मबोध सत्य अशा तुरीयावस्थेत् सत्य ठरण्यास कांही प्रत्यवाय नाहीं. शिवाय ह्या सर्व दृश्य पदार्थांना प्रकाशित करणारा परमात्मा स्वप्रकाश आहे म्हणजे एका दिव्याला पहाण्याकरितां जशी दुसर्‍या दिव्याची आवश्यकता नसते तशीच याच्या ज्ञानाला दुसर्‍या कशाचीही अपेक्षा नाहीं.] ३८

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP